शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
4
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
5
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
6
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
7
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
8
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
9
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
10
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
11
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
12
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
13
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
14
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
15
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
16
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
17
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
18
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
19
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
20
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
Daily Top 2Weekly Top 5

हिरा ग्रुपने गुंतवणूकदारांना लावला ५०० कोटींना चुना, आर्थिक गुन्हे शाखा करणार तपास 

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 24, 2018 18:31 IST

मुंबईत १ हजाराहून अधिक नागरिकांनी हिरा ग्रुपच्या वेगवेगळ्या कंपन्यांमध्ये गुंतवणूक केली आहे. या पूर्वी नौहिरा यांच्यावर फसवणूकीचा गुन्हा हैद्राबाद येथे नोंदवण्यात आला आहे. या कंपनीत गुंतवणूक करणाऱ्यांमध्ये बहुसंख्य मुस्लिम समुदयाचे लोक आहेत. 

मुंबई - विविध राज्यातील नागरिकांची जवळजवळ  ५०० कोटी रुपयांना फसवणूक करणाऱ्या हिरा ग्रुपच्या संचालिका नौहिरा शेख यांच्या विरोधात अखेर आज गुन्हा नोंदवण्यात आला आहे. जे. जे. मार्ग पोलीस ठाणे आणि आर्थिक गुन्हे शाखेकडे याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला असून आर्थिक गुन्हे शाखेचे पथक या गुन्ह्याचा तपास करणार आहे. त्यामुळे गुंतवणूकदारांना तसूभर दिलासा मिळाला आहे. मुंबईत १ हजाराहून अधिक नागरिकांनी हिरा ग्रुपच्या वेगवेगळ्या कंपन्यांमध्ये गुंतवणूक केली आहे. या पूर्वी नौहिरा यांच्यावर फसवणूकीचा गुन्हा हैद्राबाद येथे नोंदवण्यात आला आहे. या कंपनीत गुंतवणूक करणाऱ्यांमध्ये बहुसंख्य मुस्लिम समुदयाचे लोक आहेत. 

मुस्लिम धर्मात बॅकेत पैसे ठेवणं आणि त्याचं व्याज घेणं हे अमान्य आहे. याच संधीचा फायदा घेऊऩ नौहिरा याने २००८ मध्ये हिरा ग्रुप कंपनीची स्थापना केली. या ग्रुपच्या हीरा गोल्ड एक्झिम लि., हीरा रिटेल प्रा. लि., हीरा टेक्सटाईल लि., हीरा फ़ुटेक्स लि. आदी २० हून अधिक कंपन्या आहेत. त्यानंतर नौहिराने कंपनीतील व्याजऐवजी नफ्याचा वाटा देण्याच्या नावाखाली लाखो मुस्लिम नागरिकांना पैसे गुंतवणूक करण्याचे आवाहन केले. या आवाहनानंतर देशातील विविध राज्यासह आखाती देशातील मुस्लिम नागरिकांनी देखील मोठ्या प्रमाणात लाखो रुपये गुंतवले. त्यानुसार पहिले वर्षभर सर्वांना व्यवस्थित कंपनीकडून मोबदला देऊन विश्वास संपादन करून नौहिरा पसार झाली. तसेच नोटबंदीनंतर कंपनीची आर्थिक स्थिती बिकट झाल्यामुळे कंपनीने गुंतवणूकदारांना आर्थिक मोबदला दिला नाही. 

मागील सहा महिन्यांपासून अनेकांना पैसे येणे बंद झाल्यानंतर अनेक गुंतवणूकदारांनी पुढे येऊन आवाज उठवला. या प्रकरणी पहिला गुन्हा हा हैद्राबादमध्ये कंपनीविरोधात नोंदवला गेला. या गुंतवणूकदारांमध्ये मुंबईतील एक हजाहून अधिक नागरिकांनी पैसे गुंतवले होते. त्यातील जे.जे.मार्ग पोलिस ठाणे येथे एका बुट विक्रेत्याने मोठ्या प्रमाणात पैसे गुंतवले होते. काही दिवस मोबदला मिळाला. मात्र नंतर जून २०१८ पासून मोबदला मिळणं बंद झाल्याने त्याने जे.जे.मार्ग पोलीस ठाण्यात कंपनीची संचालिका नौहिरा शेख हिच्याविरोधात गुन्हा नोंदवला. हा गुन्हा हीरा ग्रुपच्या संचालिका नौहिरा शेख आणि पणन अधिकारी सलिम अन्सारी यांच्याविरोधात दाखल करण्यात आला आहे. याबाबत आर्थिक गुन्हे शाखेने देखील गुन्हा दाखल करून घेतला असून तपास देखील या शाखेचे पथक करणार आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीEconomic Offence Wingआर्थिक गुन्हे शाखाfraudधोकेबाजी