शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून अज्ञात कार घुसली आत, तपास सुरू!
2
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
3
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
4
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
5
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
6
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
7
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
8
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
9
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
10
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
11
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
12
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
13
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
14
Petrol Price In US: ट्रम्प यांच्या निर्णयाचा अमेरिकेच्या लोकांनाच फटका; पेट्रोलच्या दरात जून २०२२ नंतरची सर्वात मोठी वाढ
15
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
16
बंगळुरू-चेन्नई लढतीत पाण्याच्या बाटलीवरून वाद, RCBचा कर्णधार पंचावर भडकला, नेमकं घडलं काय?
17
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
18
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
19
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
20
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
Daily Top 2Weekly Top 5

पेपर फुटी प्रकरण : १० एजंटांमार्फत देशमुख फोडणार होता म्हाडाचे पेपर

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 15, 2021 07:33 IST

उत्तरपत्रिका कोरी ठेवण्याचा दिला होता सल्ला.

पुणे : जी. ए. सॉफ्टवेअरचा डॉ. प्रीतिश देशमुख याने म्हाडाचा पेपर फोडण्यासाठी जवळपास १० एजंटांशी संपर्क केला होता. त्यांच्यामार्फत पेपर फोडण्याचा त्याचा कट असल्याचे तपासात उघडकीस आले आहे. या एजंटांनी परीक्षार्थींशी संपर्क साधून त्यांना पेपर कोरा साेडण्यास सांगण्यात येणार होते. त्यानंतर ओएमआरशीटमध्ये देशमुख फेरफार करून परीक्षार्थींना पास करणार होता. हा त्यांचा बदललेला प्लॅन होता. ४ पेन ड्राईव्ह, टॅब, मोबाइल जप्त सायबर पोलिसांनी डॉ. देशमुख याच्या खराळवाडी येथील घराची सोमवारी रात्री झडती घेतली. त्यात ४ पेन ड्राईव्ह, एक टॅब, एक मोबाइल सापडला आहे. हे साहित्य जप्त केले असून, पंचनामा करून पंचांसमोर ओपन करून पाहिल्यानंतर त्यामध्ये नक्की काय आहे हे समजू शकेल, असे पोलिसांनी सांगितले.

‘घरातील वस्तू’ कोडवर्डडॉ. प्रीतिश देशमुख याने काही एजंटांशी संधान साधले होते. त्यासाठी त्यांनी कोडवर्डचा वापर केला होता. त्यात त्यांनी ‘घरातील वस्तू’ असे सांकेतिक शब्दांचा वापर केला होता. घर म्हणजे म्हाडा आणि वस्तू म्हणजे पेपर असा त्याचा अर्थ होता. प्रीतिश याला ताब्यात घेतल्यानंतर काही एजंटांचे फोन आले होते. त्यात त्यांनी ‘घरातील वस्तू’ कधी मिळणार, अशी विचारणा केली होती. असे चौकशीत समोर आले आहे.

आरोग्य पेपरफुटीनंतर बदलला प्लॅनदेशमुख याच्या जी. ए. सॉफ्टवेअर या कंपनीला म्हाडाची लेखी परीक्षा आयोजित करून तिच्या निकालापर्यंत सर्व कामांचे कंत्राट दिले होते. देशमुखने राज्यभरातील एजंट टोळीकडून सावज हेरण्यास सुरुवात केली. एका परीक्षार्थीमागे दहा लाखांचा रेट ठरविला. परीक्षार्थीमागे किती पैसे घ्यायचे हे एजंटवर सोपवले. उत्तरपत्रिका कोऱ्या ठेवण्यास  सांगितले होते. पुढे कंपनीच्या ताब्यात आल्यावर गुण भरून तो फेरफार करणार होता. परंतु तोपर्यंतचे पोलिसांनी माहिती लागल्याने बिंग फुटले.

टॅग्स :mhadaम्हाडाexamपरीक्षाPuneपुणे