शहरं
Join us  
Trending Stories
1
'किंग' खानच्या राजमुकुटाला राष्ट्रीय पुरस्काराचं 'कोंदण'; विक्रांत मेस्सी, राणी मुखर्जी यांचाही सर्वोच्च सन्मान
2
तुर्भ्यात एनएमएमटीच्या भरधाव बसनं ६ जणांना उडवलं, चालकाविरोधात गुन्हा दाखल
3
शेतकऱ्यांच्या हिताशी तडजोड नाही, दबावाखाली करार करणार नाही, २५% टॅरिफबाबत भारताची स्पष्ट भूमिका
4
Daya Nayak: थर्टी फर्स्टची रात्र अन् छोटा राजन गँगचे दोन शूटर; दया नायक यांच्या पहिल्या एन्काऊंटरची गोष्ट
5
'भारत-रशिया वेळोवेळी एकमेकांच्या बाजूने उभे', डोनाल्ड ट्रम्प यांच्या टीकेनंतर भारताचे प्रत्युत्तर
6
'फुटबॉलसम्राट' मेस्सी भारतात येणार.. रोहित, विराट, सचिनसोबत वानखेडेवर क्रिकेट मॅच खेळणार!
7
"माझ्याकडे मुस्लीम कामगार, कुणीतरी ओरडलं ही बेकरी..."; यवतमध्ये जमावाने जाळलेल्या बेकरीचं सत्य समोर
8
IND vs ENG : आता कसं वाटतंय...! डकेटचा वचपा काढल्यावर आकाशदीपनं त्याच्या खांद्यावर हात टाकला अन्... (VIDEO)
9
"घासीराम कोतवाल'च्या प्रयोगासाठी देशभर...", संजय मिश्रांचं ३० वर्षांनंतर रंगभूमीवर पुनरागमन
10
तिवारी, शुक्ला, थरुर..; मोदी सरकारविरोधात राहुल गांधींना स्वकीयांनीच दिला घरचा आहेर
11
'निराधार आणि बेजबाबदार'; राहुल गांधींच्या आरोपांवर निवडणूक आयोगाने सोडले मौन, काय दिले उत्तर?
12
IND vs ENG 5th Test: Gus Atkinson चा 'पंजा'! टीम इंडियानं २० धावांत गमावल्या ४ विकेट्स! अन्...
13
सेबीच्या नियमांना फाटा देऊन शेअर्सची खरेदी-विक्री, पण धोकाही मोठा! 'ग्रे मार्केट'ची Inside Story
14
Shravan Shanivar 2025: शनिवारी कसे करावे अश्वत्थ मारुती पूजन? पिंपळाच्या झाडाचीही पूजा महत्त्वाची!
15
नागरिकांची झोप उडवणाऱ्या चड्डी- बनियान टोळीला पकडण्यात पोलिसांना यश!
16
आशा भोसलेंनी पुण्यातील आलिशान फ्लॅट विकला! एकाच झटक्यात कमावले इतके कोटी, तब्बल ४२ टक्के वाढ
17
कुठल्याही देवावर विश्वास नाही, कुठलाही धर्म मानत नाही, या १० देशांमधील बहुतांश लोक आहेत नास्तिक
18
Viral Video: भल्यामोठ्या अजगराला दुचाकीला बांधून फरफटत नेलं, संतापजनक प्रकार कॅमेऱ्यात रेकॉर्ड!
19
वानखेडे स्टेडियममध्ये सुनील गावसकर, शरद पवार यांचा होणार गौरव, MCA उभारणार पुतळा
20
जुहूच्या समुद्रात दोन अल्पवयीन मुले बुडाली; एकाला वाचवलं, दुसऱ्याचा शोध सुरू!

एसआरए सदनिका ट्रान्सफर करण्यासाठी एक लाख रुपयांची मागणी, दहिसर उपजिल्हाधिकारी कार्यालयावर खासदारांचे भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप 

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 22, 2021 22:59 IST

Mumbai News:

मुंबई-एसआरएचे घर 10 वर्षे विकत येत नाही आणि विकत घेणाऱ्याच्या नावावर ट्रान्सफर होत नाही असा कायदा आहे. सरकारकडे एसआरएचे घर ट्रान्सफर करण्याचा प्रस्ताव प्रलंबित असतांना मात्र दहिसरच्या उपजिल्हाधिकारी कार्यालयाचे काही अधिकारी दहिसर येथील एसआरए वसाहतीत जाऊन दरवाज्यावर एक लाख रुपये भरा अश्या नोटिसा लावून जात आहेत. विशेष म्हणजे या नोटिसवरील जानेवारी २०२१ची तारीख कट करून यावर पाचव्या महिन्याची तारिख टाकण्यात आली आहे,आणि या नोटीसा नवव्या महिन्यात एसआरए सदनिका धारकांना देण्यात आल्या. त्यामुळे अश्याप्रकारे भ्रष्टाचार करणाऱ्या येथील अधिकाऱ्यांना जाब विचारण्यासाठी उत्तर मुंबईचे भाजपा खासदार गोपाळ शेट्टी यांनी चक्क दहिसरच्या उपजिल्हाधिकारी कार्यालयावर आज आपला मोर्चा वळवला.आणि सोशल मीडियावर व्हिडिओ जारी करून त्यांनी येथील भ्रष्टाचार उघडकीस आणला. याप्रकरणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी जातीने लक्ष घालून झोपडपट्टीवासीयांना दिलासा द्यावा अशी मागणी त्यांनी केली.

येथील अधिकारी हरिश्चंद्र पाटील आणि गुलाम परदेशी या अधिकाऱ्यांची बदली झाली असून येथे नवीन अधिकाऱ्यांची अजून नियुक्ती झाली नाही. त्यामुळे येथील अधिकाऱ्यांना तर भ्रष्टाचाराला कुरण मिळाले असा आरोप त्यांनी केला.

झोपडपट्टीवासीयांनी एसआरएतून घेतलेली सदनिका विक्रीची सध्याची  १० वर्षांची मर्यादा ५ वर्षे करावी आणि सदनिका ट्रान्सफर शुल्क कमी करण्याच्या माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रस्तावाला आघाडी सरकारने अजून मंजूरी दिली नाही अशी माहिती त्यांनी दिली. मग कोणत्या आधारावर सदर सदनिका ट्रान्सफरच्या नावाखाली येथील उपजिल्हाधिकारी कार्यालयाच्या अधिकाऱ्यांनी एक लाख रुपयांची मागणी करण्याचे नवे षडयंत्र सुरू करून झोपडपट्टीवासीयांना घाबरवण्याचा प्रयत्न करत असल्याची माहिती भाजपा व शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी आपल्याला दिली. त्यामुळे असे प्रकार जर दहिसरला सुरू असतील तर मुंबईत देखिल सुरू असतील असा टोला त्यांनी लगावला.जर झोपडपट्टीधारकांकडून कोणी अश्या प्रकारे पैसे मागायला घरी येत असतील तर त्यांनी मला थेट फोन करावा, मी स्वतः त्यांच्याकडे येईल आणि संबंधित अधिकाऱ्यांना जाब विचारेल असे आवाहन त्यांनी केले.

टॅग्स :Corruptionभ्रष्टाचारMumbaiमुंबई