शहरं
Join us  
Trending Stories
1
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
4
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
5
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
6
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
7
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
8
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
9
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
10
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
11
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
12
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
13
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
14
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
15
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
16
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
17
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
18
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
19
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
20
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
Daily Top 2Weekly Top 5

आयफोन हिसकावण्यासाठी ऑटोमधल्या महिलेवर स्नॅचरने केला हल्ला; फरफटत नेलं, नाक तुटलं

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 14, 2023 12:04 IST

योविका चौधरी असं तिचं नाव असून ती शाळेतून घरी जात असताना बाईकवरून आलेल्या दोघांनी तिचा आयफोन हिसकावण्याचा प्रयत्न केला.

दिल्लीत एक शिक्षिका ऑटोमध्ये बसून प्रवास करत असताना तिचा मोबाईल हिसकावून घेतल्याची भयंकर घटना समोर आली आहे. यावेळी शिक्षिकेच्या नाकाला फ्रॅक्चर आणि चेहऱ्यावर अनेक जखमा झाल्या आहेत. शिक्षिकेला दक्षिण दिल्लीतील साकेत येथील मॅक्स रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. योविका चौधरी असं तिचं नाव असून ती शाळेतून घरी जात असताना बाईकवरून आलेल्या दोघांनी तिचा आयफोन हिसकावण्याचा प्रयत्न केला.

देवली येथील रहिवासी असलेली योविका चौधरी ही शाळेनंतर घरी परतत असताना शुक्रवारी ही घटना घडली. याच दरम्यान, वाटेत दोन बाईकस्वारांनी तिचा आयफोन हिसकावण्याचा प्रयत्न केला. या झटापटीत योविका ऑटोतून खाली पडली आणि तिला काही अंतरापर्यंत फरफटत नेण्यात आलं. यानंतर चोरट्यांनी तिचा मोबाईल हिसकावून घेतला. या घटनेत योविकाच्या नाकाला फ्रॅक्चर होऊन अनेक ठिकाणी दुखापत झाली आहे. ती साकेत येथील ज्ञान भारती शाळेत शिक्षिका आहे.

योविकाने दिलेल्या माहितीनुसार, ती साकेत येथून ऑटो घेऊन तिच्या घरी निघाली. दरम्यान, स्प्लेंडर बाईकवरून आलेल्या दोन चोरट्यांनी खोखा मार्केटजवळ ऑटोच्या मागे येऊन तिचा आयफोन 13 हिसकावून नेला. आयफोन वाचवण्याच्या प्रयत्नात योविका ऑटोमधून खाली पडली आणि फरफटत गेली. यामुळे योविका जखमी झाली.

याप्रकरणी साकेत पोलीस ठाण्यात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस या प्रकरणाचा तपास करत असून आरोपींची ओळख पटवण्याचा प्रयत्न करत आहेत. मात्र, याप्रकरणी अद्याप कोणालाही अटक करण्यात आलेली नाही. ही घटना साकेत येथील खोखा मार्केटजवळील चॅरिटन हॉटेलजवळ घडली. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.  

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीdelhiदिल्ली