शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

धक्कादायक! 'तो' वाद टोकाला गेला; पत्नीने पतीचा कान चावला अन्...

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 27, 2023 12:38 IST

महिलेने आपल्या पतीच्या कानाचा इतक्या जोरात चावा घेतला की कानाचा तुकडाच खाली पडला.

दिल्लीतील सुलतानपुरी येथून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. येथे एका महिलेने रागाच्या भरात पतीचा कान चावला. महिलेने आपल्या पतीच्या कानाचा इतक्या जोरात चावा घेतला की कानाचा तुकडाच खाली पडला. यानंतर महिलेच्या पतीवर सर्जरी करावी लागली. उपचारानंतर त्याने पत्नीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी महिलेच्या पतीने दिलेल्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे. पतीने पोलिसांना सांगितलं की, तो 20 नोव्हेंबरला सकाळी घराबाहेर कचरा टाकण्यासाठी गेला होता. त्यानंतर त्याने पत्नीला घर साफ करण्यास सांगितलं. मात्र घरी परतताच पत्नीने भांडण सुरू केलं.

पोलिसांकडे केलेल्या तक्रारीत, व्यक्तीने सांगितलं की, पत्नीने त्याला त्याचं घर विकून तिला तिचा हिस्सा देण्यास सांगितलं जेणेकरून ती आपल्या मुलांसोबत वेगळी राहू शकेल. त्याने पत्नीची समजूत काढण्याचा प्रयत्न केला, मात्र पत्नी सतत वाद घालत राहिली.

पत्नीने त्याला मारण्याचा प्रयत्न केला. पण त्याने तिला दूर ढकलले. यानंतर तो घराबाहेर पडू लागला असता त्याच्या पत्नीने त्याला मागून पकडून त्याच्या कानाचा चावा घेतला. यानंतर मुलगा त्याला मंगोलपुरी येथील रुग्णालयात उपचारासाठी घेऊन गेला. रुग्णालयात त्याच्यावर सर्जरी करण्यात आली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 20 नोव्हेंबर रोजी त्यांना हॉस्पिटलमधून या घटनेची माहिती मिळाली होती आणि त्यानंतर एक टीम गेली. व्यक्तीने आपला जबाब देण्यासाठी पोलीस ठाण्यात येणार असल्याचं पोलिसांना सांगितलं. यानंतर 22 नोव्हेंबर रोजी त्याने पोलिसांशी संपर्क साधून लेखी तक्रार दिली. पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.  

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी