शहरं
Join us  
Trending Stories
1
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
2
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
3
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
4
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
5
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
6
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
7
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
8
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
9
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
10
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
11
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
14
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
15
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
16
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
17
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
18
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
19
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
20
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
Daily Top 2Weekly Top 5

धक्कादायक! टिकटॉक स्टार फेसबुकवर तरुणीच्या पडला प्रेमात; लग्न केलं, दोघेही झाले बाईक चोर

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 23, 2023 11:48 IST

चोरी प्रकरणी एका जोडप्याला अटक करण्यात आली आहे. या जोडप्याकडून चोरीची बाईक जप्त करण्यात आली आहे.

नवी दिल्लीत चोरी प्रकरणी एका जोडप्याला अटक करण्यात आली आहे. या जोडप्याकडून चोरीची बाईक जप्त करण्यात आली आहे. आरोपी टिकटॉक स्टार असल्याचं पोलिसांचं म्हणणं आहे. त्याची फेसबुकवर एका मुलीशी ओळख झाली, जिच्याशी त्याने लग्न केलं. यानंतर दोघांनी मिळून बाईक चोरण्यास सुरुवात केली.

मिळालेल्या माहितीनुसार, 14-15 ऑगस्टच्या मध्यरात्री बीएचडी नगर पोलीस ठाण्यात बाईक चोरीची तक्रार दाखल करण्यात आली होती. तक्रार मिळाल्यानंतर पोलिसांचे पथक घटनास्थळी पोहोचले आणि त्यांनी पाहणी केली. यासोबतच जवळपास लावण्यात आलेल्या सीसीटीव्ही फुटेजची तपासणी करण्यात आली.

सीसीटीव्हीमध्ये पाहिले असता बाईक एका जोडप्याने चोरल्याचे दिसून आले. यानंतर परिसरातील सीसीटीव्हीच्या आधारे आरोपींचा पाठलाग करण्यात आला. तपासाअंती आरोपींपैकी दीपक उर्फ ​​सुक्खू याची ओळख पटली. 

पोलिसांनी यानंतर तात्काळ ग्रेन मार्केट नजफगडजवळ पथक पाठवून सापळा रचून दोन्ही आरोपींना चोरीच्या बाईकसह पकडलं. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दीपक राणा उर्फ ​​सुक्खू आणि 25 वर्षीय प्रीती अशी आरोपींची नावे आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी दीपक हा टिकटॉक स्टार आहे. तो इन्स्टाग्रामवर व्हिडिओही अपलोड करायचा. फेसबुकच्या माध्यमातून तो प्रितीच्या संपर्कात आला. मैत्रीनंतर ते एकमेकांना भेटले आणि लग्न केलं. लग्नानंतर ते कुटुंबापासून वेगळे भाड्याच्या घरात राहत होते.

बाईक चोरीचे दोन्ही आरोपी हे व्यसनी असून त्यांच्या आर्थिक गरजा भागवण्यासाठी दोघेही एका कारखान्यात काम करू लागले, असे पोलिसांचे म्हणणे आहे. घटनेच्या दिवशी तो ड्रग्ज खरेदी करण्यासाठी नजफगडला पोहोचला होता. रात्री उशिरा तो रोहतकला जात असताना त्याने बाईक चोरली. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.  

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी