शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
4
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
5
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
6
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
7
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
8
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
9
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
10
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
11
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
12
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
13
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
14
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
15
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
16
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
17
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
18
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
19
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
20
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

भयावह! ३५० रुपयांसाठी युवकाला १०० वेळा चाकूने भोसकले; मृतदेहाजवळ केला डान्स

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 23, 2023 13:28 IST

राजधानी दिल्लीतील या हत्याकांडाने सर्वांनाच हादरवून सोडले आहे.

नवी दिल्ली : राजधानी दिल्ली एका भयानक हत्याकांडाने हादरली आहे. दिल्लीच्या ईशान्य भागात एका व्यक्तीची हत्या करण्यात आल्याची घटना समोर आली आहे. चोरीच्या उद्देशाने अल्पवयीन मुलाने एका युवकावर चाकूने १०० वेळा वार करून त्याची हत्या केली. एवढेच नाही तर या हत्येनंतर अल्पवयीन आरोपी मृतदेहाजवळ नाचला. दरम्यान, आता या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

२१ नोव्हेंबरला रात्री उशिरा मृत युवक आपल्या घराकडे जात होता. हा भाग झोपडपट्ट्यांचा परिसर आहे आणि अतिशय अरुंद गल्ल्या आहेत. या युवकाला जाताना पाहताच त्याच परिसरातील एका अल्पवयीन मुलाने चोरी करण्याच्या उद्देशाने त्याच्यावर आधी मागून हल्ला केला. त्यानंतर युवक बेशुद्ध पडण्याच्या मार्गावर येताच अल्पवयीन आरोपीने त्याच्यावर कटरसारख्या चाकूने हल्ला करण्यास सुरुवात केली. जवळपास १०० हून अधिक वेळा युवकावर वार केले. या घटनेनंतर परिसरातील लोकांना आरोपीने धमकावले आणि मृत युवकाजवळ मोठमोठ्याने ओवरडून नाचू लागला.

दरम्यान, या घनटेनंतर काही तासातच पोलिसांनी अल्पवयीन आरोपीला त्याच परिसरातून अटक केली आहे. चौकशीत त्याने दारूच्या नशेत हा गुन्हा केल्याचे उघड झाले. तसेच, युवकाची हत्या केल्यानंतर त्याच्या खिशातील ३५० रुपये लुटून पळ काढला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही घटना केवळ लुटण्याच्या उद्देशाने घडली असून, मयत आणि आरोपी एकमेकांना ओळखत नव्हते किंवा त्यांच्यात कोणतेही वैर नव्हते.

काय म्हणाले परिसरातील नागरिक?राजधानी दिल्लीतील या हत्याकांडाने सर्वांनाच हादरवून सोडले आहे. या घटनेनंतर परिसरातील महिलांनी सांगितले की, मारेकरी वेडा दिसत होता, दारूच्या नशेत होता, मारल्यानंतर तो नाचत होता आणि ओरडत होता. मी खून केला आहे, आता मी जेलमध्ये जाणार आहे, असे म्हणत होता. 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीdelhiदिल्ली