शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
3
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाद यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
4
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
5
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
6
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
7
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
8
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
9
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
10
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
11
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
12
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
13
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
14
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
15
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
16
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
17
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
18
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
19
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
20
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
Daily Top 2Weekly Top 5

नवा ट्विस्ट! "मनिकाच्या वडिलांना दिले १.६५ कोटी"; पुनीत खुरानाच्या कुटुंबीयांचा गंभीर आरोप

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 1, 2025 15:06 IST

पुनीतचं लग्न मॉडेल टाऊनमध्ये राहणाऱ्या मनिका पाहवासोबत झालं होतं. सुरुवातीला सर्व काही ठीक चाललं होतं, मात्र त्यानंतर त्यांच्यात वाद होऊ लागले.

दिल्लीतील मॉडेल टाऊन भागातील कल्याण विहारमध्ये पुनीत खुराना नावाच्या व्यक्तीने आत्महत्या केली. या प्रकरणाचा अधिक तपास केला जात असल्याचं पोलिसांचं म्हणणं आहे. पुनीतचं २०१६ मध्ये लग्न झालं होतं आणि घटस्फोटाची केस सुरू होती. पुनीत पत्नीमुळे त्रस्त असल्याचा पुनीतच्या कुटुंबीयांचा आरोप आहे. कुटुंबीयांच्या म्हणण्यानुसार, पुनीतचं पत्नीशी फोनवर शेवटचं बोलणं झालं होतं. 

मिळालेल्या माहितीनुसार, पुनीतचं लग्न मॉडेल टाऊनमध्ये राहणाऱ्या मनिका पाहवासोबत झालं होतं. सुरुवातीला सर्व काही ठीक चाललं होतं, मात्र त्यानंतर त्यांच्यात वाद होऊ लागले. दोन वर्षे पुनीत आई-वडिलांशिवाय पत्नीसोबत राहत होता, पण त्यानंतर पुनीत घरी आला आणि मनिका तिच्या आई-वडिलांच्या घरी गेली. दोघांनी कोर्टात घटस्फोटाचा दावाही केला होता. पुनीतच्या कुटुंबीयांचा आरोप आहे की, मनिका आणि तिच्या कुटुंबीयांनी पुनीतला इतका त्रास दिला की त्याने आत्महत्या केली.

पुनीत हा मॉडेल टाऊन परिसरात बेकरी चालवायचा, ३१ डिसेंबरला पहाटे ३ वाजता तो घरी पोहोचला आणि खोलीत झोपला. दुपारी १२ वाजेपर्यंत खोली न उघडल्याने आईला काळजी वाटली. फोन केला, पण प्रतिसाद मिळाला नाही. यानंतर तिने पतीला फोन केला. सायंकाळी ३.३० च्या सुमारास दरवाजा तोडला असता आत पुनीत लटकलेल्या अवस्थेत आढळून आला. यानंतर पुनीतला तात्काळ रुग्णालयात नेलं असता डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केलं.

पुनीतच्या कुटुंबीयांचं म्हणणं आहे की, आत्महत्या करण्यापूर्वी पुनीतने एक तासाचा व्हिडीओ बनवला होता. पुनीतचा पत्नीसोबत दोन वर्षांपासून घटस्फोटाचा सुरू होता. व्हिडिओमध्ये त्याने पत्नी आणि तिच्या पालकांकडून होणाऱ्या छळाची संपूर्ण माहिती दिली आहे. पुनीतच्या आईचं म्हणणं आहे की, मला आता न्याय हवा आहे, माझा मुलगा गेला आहे.

पुनीत आणि मनिका यांचं कुटुंबीय एकमेकांना लग्नापूर्वी ओळखत होतं. पुनीतच्या वडिलांचा दावा आहे की, मालमत्ता विकून मिळालेले १ कोटी ५६ लाख रुपये त्यांनी मनिकाच्या वडिलांना कर्ज म्हणून दिले होते. लग्नानंतर पुनीत आणि मनिकाने एक कॅफे सुरू केला, पण काही दिवसांनी तो बंद झाला. या मालमत्तेतील काही पैसे कॅफेमध्येही वापरले गेले. पुनीत आपल्या कुटुंबासह राहत होता ते घर मनिकाच्या नावावर आहे. आता पोलीस या मालमत्तेच्या वादाचाही तपास करत आहेत.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीdelhiदिल्ली