शहरं
Join us  
Trending Stories
1
सैन्याला फ्री हँड देताच युएनची फोनाफोनी! संयुक्त राष्ट्रांच्या महासचिवांना निषेधासाठी ९ दिवस लागले
2
"पुढील २४ ते ३६ तासांत...", पाकिस्तानी मंत्र्यांची झोप उडाली; मध्यरात्री घेतली पत्रकार परिषद
3
२०१९ पासून सोने २०० टक्के महागले, तरी अक्षय्य तृतीयेच्या खरेदीसाठी उत्साह
4
Kolkata hotel Fire: कोलकातामधील हॉटेलमध्ये लागली भयंकर आग, १४ जणांचा होरपळून मृत्यू
5
मैसूरच्या उद्योजकाने अमेरिकेत पत्नी आणि मुलाला घातल्या गोळ्या; नंतर स्वतः केली आत्महत्या, एक मुलगा वाचला
6
पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर द्यायला सैन्याला संपूर्ण मुभा; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कठोर पवित्रा
7
पोलिसांचा अघटित घडल्याचा फोन आला अन् आदित्यच्या आई वडिलांनी धावत पळत सोलापूर गाठलं
8
आजचे राशीभविष्य, ३० एप्रिल २०२५: उत्पन्न वाढेल, इतर मार्गानी पण आर्थिक लाभ होतील
9
आरटीआय अर्ज अन् उत्तरेही वेबसाइटवरच; मुख्यमंत्र्यांच्या चिंतेनंतर माहिती आयुक्तांचे निर्देश
10
इलेक्ट्रिक वाहनांना मिळेल करात सूट आणि टोलमाफी; राज्य सरकारने जाहीर केले ईव्ही धोरण
11
लेकीच्या डोईवर अक्षता टाकून वधुपित्याने लग्न मांडवातच सोडले प्राण
12
एक रुपयात विम्याची योजना अखेर गुंडाळली; राज्यामध्ये आता पूर्वीचीच पीक विमा योजना लागू करणार
13
पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंग; मंत्रालयातून चक्रे फिरल्यावर घेतली दखल
14
नस कापली... नंतर गळा चिरून डॉक्टरची आत्महत्या; डॉ. वळसंगकरांनंतर १२ दिवसांत दुसरी घटना
15
हवाई सीमेवर बंदी पाकच्याच मुळावर; पाकिस्तानच उत्पन्न स्रोत बंद होणार
16
अतिरेक्यांविरोधात स्पायवेअर वापरात चूक काय? पेगॅससप्रकरणी सुप्रीम कोर्टाने केला सवाल
17
शुभ मुहूर्तावर सोनेखरेदीसाठी बाजार सज्ज; अमेरिकन टॅरिफमुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत चढ-उतार
18
फिअरलेस ‘वैभव’; ‘एक बिहारी सौ पर भारी!’ म्हणत १४ वर्षांच्या वैभव सूर्यवंशीचं शतकी यश
19
‘सोन्या’चे तात्पर्य?- बायका पुरुषांपेक्षा हुशारच!
20
ग्राहकांना योग्य किमतीत वीज मिळूच नये की काय?

कार चालकाने सायकलला धडक दिली, विद्यार्थ्याला 1 किमी फरफटत नेलं; थरकाप उडवणारा Video

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 7, 2023 14:04 IST

सायकलने क्लासला जाणाऱ्या विद्यार्थ्याला एका कार चालकाने धडक दिली आणि अपघातानंतर कार विद्यार्थ्याला जवळपास एक किलोमीटर फरफटत घेऊन गेल्याची धक्कादायक घटना घडली आहे.

दिल्लीप्रमाणेच उत्तर प्रदेशातील हरदोईमध्येही हृदयद्रावक घटना समोर आली आहे. सायकलने क्लासला जाणाऱ्या विद्यार्थ्याला एका कार चालकाने धडक दिली आणि अपघातानंतर कार विद्यार्थ्याला जवळपास एक किलोमीटर फरफटत घेऊन गेल्याची धक्कादायक घटना घडली आहे. कार बाजारपेठेत आल्यानंतर स्थानिक लोकांनी गाडी थांबवली. यानंतर विद्यार्थ्याला बाहेर काढण्यात आले. स्थानिक लोकांनी गाडीची तोडफोड केली. तसेच चालकाला बेदम मारहाण केली. 

पोलिसांना माहिती मिळताच कार चालकाला ताब्यात घेण्यात आले आहे. तर जखमी विद्यार्थ्याला वैद्यकीय महाविद्यालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, कोतवालीच्या झाबरा पूर्वा परिसरात ही घटना घडली आहे. येथे राहणाऱ्या हरिनाम यांचा 15 वर्षीय मुलगा केतन हा नववीमध्ये शिकत आहे. शुक्रवारी सायंकाळी तो सायकलवरून कोचिंगला जात होता. 

रस्त्यात सोल्जर बोर्ड चौकात भरधाव वेगात आलेल्या कारने त्याच्या सायकलला धडक दिली. याच दरम्यान सायकल पडली आणि केतनचा पाय गाडीत अडकला. विद्यार्थ्याचा पाय कारमध्ये अडकल्याचे पाहून स्थानिक लोकांनी कार चालकाला थांबवण्याचा प्रयत्न केला. पण, तरुणाने भरधाव वेगाने कार चालवली. विद्यार्थ्याला जवळपास एक किलोमीटर ओढत नेल्यानंतर गाडी बाजारात भागात पोहोचली. तिथे स्थानिक लोकांनी गाडी थांबवली. यानंतर विद्यार्थ्याला बाहेर काढण्यात आले. 

घटनास्थळी उपस्थित लोकांनी कार चालक जितेंद्र शुक्लाला पकडून बेदम मारहाण केली. माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळ गाठून कार चालकाची लोकांच्या तावडीतून सुटका करून त्याला ताब्यात घेतले. त्याचवेळी जखमी विद्यार्थी केतनला वैद्यकीय महाविद्यालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत असून घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी