शहरं
Join us  
Trending Stories
1
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
2
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
3
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
4
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
5
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
6
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
7
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
8
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
9
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
10
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
11
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
12
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
13
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
14
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
15
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
16
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
17
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
18
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
19
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
20
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
Daily Top 2Weekly Top 5

प्यार तूने क्या किया! गर्लफ्रेंडला iPhone गिफ्ट देण्यासाठी अल्पवयीन मुलाने उचललं टोकाचं पाऊल

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 8, 2024 14:56 IST

दिल्लीमध्ये धक्कादायक घटना समोर आली आहे. पोलिसांनी एका मुलाला अटक केली आहे

दिल्लीमध्ये धक्कादायक घटना समोर आली आहे. पोलिसांनी एका मुलाला अटक केली आहे. या मुलाने आपल्या गर्लफ्रेंडला आयफोन गिफ्ट करण्यासाठी आणि तिच्या वाढदिवसाच्या पार्टीसाठी पैसे गोळा करण्यासाठी आपल्या आईचे दागिने चोरले होते. दिल्लीतील नजफगडमध्ये ही घटना घडली. दागिने गायब झाल्याची तक्रार मुलाच्या आईने पोलिसात केली होती. सोन्याचे झुमके, सोन्याची अंगठी आणि एक चेन गायब होती. पोलिसांनी तपास सुरू करून दोन सोनारांकडून हे दागिने जप्त केले. तसेच एका सोनारालाही अटक करण्यात आली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ३ ऑगस्ट रोजी एका महिलेने आपल्या घरात चोरी झाल्याची तक्रार नोंदवली होती. तिने सांगितलं होतं की, २ ऑगस्ट रोजी सकाळी ८ ते दुपारी ३ वाजण्याच्या दरम्यान कोणीतरी तिच्या घरातून सोन्याची चेन, सोन्याचे झुमके आणि सोन्याची अंगठी चोरून नेली. पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज तपासले. मात्र घरात कोणीही आलं नसल्याचं पोलिसांना आढळून आलं. यानंतर या गुन्ह्यात घरातील व्यक्तींचा सहभाग असल्याचा संशय तपास पथकाला आला.

पोलिसांनी तपास सुरू केला. तपासादरम्यान, गुन्हा घडल्यापासून अल्पवयीन मुलगा बेपत्ता असल्याचं पोलिसांना आढळून आलं. यानंतर टीमने त्याच्याविषयी माहिती गोळा करण्यास सुरुवात केली. याप्रकरणी पोलिसांनी त्याच्यासोबत शाळेत शिकणाऱ्या मुलाच्या मित्रांचीही चौकशी केली. त्याने ५० हजार रुपये किमतीचा नवीन आयफोन खरेदी केल्याचं तपास पथकाला समजलं.

पोलिसांच्या पथकाने यानंतर धरमपुरा, काक्रोला आणि नजफगडमधील तो लपलेल्या ठिकाणांवर अनेक छापे टाकले, परंतु प्रत्येक वेळी तो पळून जाण्यात यशस्वी झाला. मंगळवारी सायंकाळी सहाच्या सुमारास अल्पवयीन मुलगा आपल्या घरी येणार असल्याची माहिती पोलीस पथकाला मिळाली. यानंतर घराजवळ सापळा रचण्यात आला. पोलिसांनी आरोपींकडून आयफोन जप्त केला आहे.

अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, चौकशीदरम्यान मुलाने खुलासा केला की तो एका खासगी शाळेत नववीचा विद्यार्थी आहे. वडिलांचं आजारपणामुळे निधन झालं. अभ्यासात त्याचं अजिबात मन लागत नाही. मुलगा त्याच वर्गात शिकणाऱ्या मुलीसोबत रिलेशनशिपमध्ये असल्याचं त्याच्या मित्रांनी पोलिसांना सांगितलं. त्याला गर्लफ्रेंडला वाढदिवसाचं काहीतरी गिफ्ट द्यायचं होतं. आईकडे पैसे मागितले, मात्र आईने पैसे देण्यास नकार दिला. नकार दिल्याने संतापलेल्या मुलाने आपल्याच घरात चोरी करण्याचा निर्णय घेतला. 

टॅग्स :delhiदिल्लीCrime Newsगुन्हेगारी