शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
3
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
4
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
5
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
6
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
7
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
8
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
9
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
10
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
11
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
12
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
13
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
14
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
15
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
16
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
17
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
18
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
19
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
20
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

अरविंद केजरीवालांना जीवे मारण्याची धमकी, पोलीस तत्काळ आरोपीपर्यंत पोहोचले, पण...

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 31, 2023 13:06 IST

Arvind Kejriwal : अरविंद केजरीवाल यांना सोमवारी रात्री उशिरा जीवे मारण्याची धमकी मिळाली होती.

नवी दिल्ली : दिल्लीचे मुख्यमंत्री  (Delhi Chief Minister) अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal) यांना जीवे मारण्याची धमकी देणाऱ्या व्यक्तीपर्यंत पोलीस पोहोचले. पण, त्याला अटक केली नसून त्याची चौकशी पोलिसांकडून सुरू आहे. अरविंद केजरीवाल यांना धमकी देणारी व्यक्ती मानसिक आजारी असून त्याच्यावर दिल्लीतील रुग्णालयात उपचारही सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले.

अरविंद केजरीवाल यांना सोमवारी रात्री उशिरा जीवे मारण्याची धमकी मिळाली होती. त्यानंतर दिल्ली पोलिसांनी कारवाई करत त्या व्यक्तीला ताब्यात घेतले. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फोनवरून धमकी देणारा 38 वर्षीय व्यक्ती हा मानसिक आजारी असून त्याच्यावर दिल्लीतील गुलाबी बाग येथे उपचार सुरू आहेत, त्यामुळे त्याला अटक केली नाही. रात्री उशिरा पोलिसांना पीसीआरवर कॉल आला होता, ज्यामध्ये त्या व्यक्तीने मुख्यमंत्र्यांना जीवे मारण्याची धमकी दिली होती.

पोलिसांनी सांगितले की, सोमवारी रात्री 12 वाजता आरोपींनी पोलिसांना फोन करून अरविंद केजरीवाल यांना जीवे मारण्याची धमकी दिली. यानंतर पोलीस सतर्क झाले आणि त्यांनी आरोपींचा शोध घेण्याचा प्रयत्न सुरू केला. यानंतर आरोपी हा मुंडका येथील रहिवासी असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्याची मानसिक स्थिती ठीक नसल्यामुळे त्याला अटक करण्यात आली नसल्याचे पोलिसांचे सांगितले. मात्र, पोलिसांचे पथक त्याची चौकशी करत आहे.

मुख्यमंत्र्यांना दुसऱ्यांदा धमकीदरम्यान, मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना जीवे मारण्याची धमकी देण्याची ही दुसरी वेळ आहे. याआधी 2019 मध्येही त्यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली होती. त्यांच्या कार्यालयातील एका निनावी मेल आयडीवरून दोन धमकीचे मेल पाठवण्यात आले होते, ज्यामध्ये त्यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली होती. या मेलनंतर दिल्ली पोलिस अधिकाऱ्यांमध्ये खळबळ उडाली होती. प्रकरणाचे गांभीर्य पाहून दिल्ली पोलिसांनी अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करून आरोपीचा शोध सुरू केला होता.

टॅग्स :Arvind Kejriwalअरविंद केजरीवालCrime Newsगुन्हेगारीdelhiदिल्ली