शहरं
Join us  
Trending Stories
1
ISI नं का घडवला मुंबईवर हल्ला?; पाकिस्तानी राष्ट्रपती जरदारीच्या प्रवक्त्याचा मोठा दावा
2
१७ वर्षे एकाच कंपनीत काम केले, अचानक काढून टाकले, कर्मचाऱ्याने लाख मोलाचा दिला सल्ला, पोस्ट व्हायरल
3
Student Death: स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या सागरने आईच्या साडीनेच संपवले आयुष्य; एका तरुणीमुळे...
4
देव तारी त्याला कोण मारी! भीषण रेल्वे अपघातात ढिगाऱ्याजवळ जिवंत सापडला चिमुकला, पण...
5
भाजपाची महिला पदाधिकारी, नेत्यांना पुरवायची मुली; बिहार निवडणुकीत वरिष्ठांनी दिली जबाबदारी
6
लाडकी बहीण अन् काय काय...! वर्षात १२ राज्यांनी महिलांना वाटले तब्बल १.६८ लाख कोटी रुपये
7
तो, ती आणि प्रेमाची बहार! पांड्यानं शेअर केला गर्लफ्रेंडसोबतचा खास व्हिडिओ
8
क्या बात! रितेश देशमुखच्या आईसाहेबांनी बल्बच्या प्रकाशात घेतलं ड्रॅगन फ्रूटचं पीक; सूनबाईंना कौतुक, शेअर केला व्हिडीओ
9
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?
10
Viral Video : नवी नवरी सोबत बॉयफ्रेंडलाही घेऊन आली; सासरच्या घरात कुठे लपवला व्हिडीओ बघाच
11
...तर १ जानेवारी २०२६ पासून तुमचं पॅन बंद होईल; बँक व्यवहारांसह सर्व महत्त्वाची कामं अडकतील
12
राहुल गांधींच्या 'हायड्रोजन बॉम्ब'ला निवडणूक आयोगाचे प्रत्युत्तर; 15 मुद्दे मांडत सर्व आरोप फेटाळले
13
Claudia Sheinbaum: सुरक्षा भेदून क्लाउडिया शीनबामपर्यंत पोहोचला; भररस्त्यात स्पर्श आणि चुंबनाचा प्रयत्न!
14
भाजीवाल्याने मित्राकडून पैसे उधार घेतले अन् जिंकले ११ कोटी; आता देणार मोठं 'थँक यू' गिफ्ट
15
Numerology: अंकशास्त्रानुसार आपल्यासाठी कोणत्या जन्मतारखेची व्यक्ती परफेक्ट जोडीदार असते?
16
सोनाराच्या दुकानात ४ वर्ष काम केलं, रोज थोडं थोडं करून २.५ कोटींचं सोनं गायब केलं! कशी पकडली गेली चोरी?
17
पाकिस्तानातील सर्वात श्रीमंत महिला क्रिकेटर, जिचं नाव कायम चर्चेत; किती संपत्तीची आहे मालकीण?
18
१०० हून अधिक देशांमध्ये २०,००० स्टोअर्स, जागतिक विक्रीत २ टक्के वाढ; तरी का काढलंय विकायला?
19
अमेरिकेतील महापौर भारतातील महापौरापेक्षा किती पॉवरफुल असतो? जगभर इतकी चर्चा का होते?
20
"मी तेजश्रीच्या लग्नासाठी उत्सुक...", सुबोध भावे असं म्हणताच अभिनेत्री काय म्हणाली?

नात्यांची गुंतागुंत! पूनमनं तिसऱ्या पतीच्या मृतदेहाचे १० तुकडे फ्रिजमध्ये ठेवले

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 28, 2022 14:40 IST

पोलिसांनी चौकशीची व्याप्ती वाढवली तेव्हा अंजन दुसऱ्या पत्नीसोबत दिल्लीत राहत होता असं पुढे आले.

नवी दिल्ली - श्रद्धा हत्याकांड देशभरात गाजत असताना दिल्लीत आणखी एक असाच प्रकार समोर आला आहे. याठिकाणी पतीच्या हत्येच्या आरोपात महिला आणि तिच्या मुलाला ताब्यात घेण्यात आले आहे. नशेच्या अवस्थेत दोन्ही आरोपींनी पतीचा गळा कापून हत्या केली. त्यानंतर त्याच्या मृतदेहाचे तुकडे करून फ्रिजमध्ये ठेवले. दोघंही लपूनछपून मृतदेहाचे तुकडे मैदानात फेकून देत होते. दिल्ली क्राईम ब्रांचनं या प्रकरणाचा उलगडा केला आहे. 

काय आहे प्रकरण?५ जून रोजी पोलिसांना रामलीला मैदानात काही शरीराचे अवयव सापडल्याची बातमी मिळाली. पुढील३-४ दिवस हे तुकडे मिळत होते. पोलिसांनी हे प्रकरण गांभीर्याने घेतले. मृतदेहाची ओळख पटवणे पोलिसांसमोर आव्हान होते. परंतु ओळख पटत नव्हती. प्रकरण गुंतागुंतीचे होत चालले होते. तेव्हा पोलिसांनी मैदानाच्या आसपासचे सीसीटीव्ही फुटेज तपासले. चौकशीच्या आधारे मृतदेह अंजन नावाच्या व्यक्तीचा असल्याचा संशय आला. त्यानंतर अंजनचा शोध घेण्यास सुरुवात केली असता तो ५-६ महिन्यापासून बेपत्ता असून त्याची तक्रारही पोलीस ठाण्यात नोंद नसल्याचं समोर आले. 

पोलिसांनी चौकशीची व्याप्ती वाढवली तेव्हा अंजन दुसऱ्या पत्नीसोबत दिल्लीत राहत होता असं पुढे आले. पोलिसांनी पत्नी पूनम आणि मुलगा दीपकची चौकशी केली. तेव्हा त्यांच्या तपासातून सगळ्या गोष्टींचा उलगडा झाला. बिहारमध्ये राहणाऱ्या पूनमचं वयाच्या १३ व्या वर्षी सुखदेवसोबत लग्न झाले होते. दोघांना एक मुलगाही होता. परंतु सुखदेव पूनमला सोडून दिल्लीला आला. पूनम दिल्लीला त्याचा शोध घेण्यासाठी आली पण सुखदेव सापडला नाही. परंतु तिची जवळीक कल्लूशी वाढली. दोघांनी लग्न केले. या दोघांना ३ मुले होते. त्यातील एक आरोपी मुलगा दीपक होता. २०१६ मध्ये कल्लूचा आजारामुळे मृत्यू झाला. त्यानंतर पूनम अंजनसोबत राहू लागली. २०१७ मध्ये या दोघांनी लग्न केले. हे पूनमचं तिसरं लग्न होते. दुसरीकडे अंजनने बिहारमध्ये पहिलं लग्न केले होते. त्याला ८ मुलेही होती. परंतु ही गोष्ट अंजनने पूनमपासून लपवून ठेवली. 

दोघांमध्ये व्हायचा वादपोलिसांच्या माहितीनुसार, अंजन काहीही काम करायचा नाही. तो पूनमवर अवलंबून असायचा. पूनमचे दागिने विकून त्याने बिहारला पैसे पाठवले होते. त्यावरून दोघांमध्ये वाद झाला होता. यादरम्यान दीपकचं लग्न झाले. दीपकच्या पत्नी आणि बहिणीवर अंजनची वाकडी नजर होती असा संशय पूनमला होता. त्यामुळे पूनम आणि दीपकने मिळून अंजनच्या हत्येचा कट रचला. 

नशेत केली हत्या पूनम आणि दीपकने अंजनला पहिले घरी बोलावलं. त्याला नशेचं औषध दिले. त्यानंतर गळा कापून त्याची हत्या केली. इतकेच नाही तर दोघांनी रक्त गोठेपर्यंत वाट पाहिली. दुसऱ्यादिवशी रक्त स्वच्छ केले. त्यानंतर मृतदेहाचे तुकडे केले. पांडव नगर भागात रामलीला मैदानाजवळ दोघांनी मृतदेहाचे तुकडे फेकले. शरीराचे ८-१० तुकडे केले होते. विविध ठिकाणी ते फेकले. पोलिसांनी हे तुकडे ताब्यात घेत चौकशी सुरू केली. आता मृतदेहाचे तुकडे आणि अंजन दासच्या कुटुंबीयांची डीएनए चाचणी केली जाणार आहे. 

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"