शहरं
Join us  
Trending Stories
1
'भारताच्या दोन्ही शत्रूंकडे न्यूक्लिअर वेपन', CDS अनिल चौहान यांचे भविष्यातील युद्धाबाबत मोठे वक्तव्य
2
T20I पदार्पणात वर्ल्ड रेकॉर्ड! या पठ्ठ्यानं पहिल्याच षटकात ५ विकेट्स घेत फिरवली मॅच
3
चिनी शस्त्रास्त्रे विकून पाकिस्तान मिळवतोय पैसे; लिबियाशी केला ४ अब्ज डॉलर्सचा लष्करी करार
4
ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित साहित्यिक विनोद कुमार शुक्ल यांचे निधन, पीएम मोदींनी वाहिली श्रद्धांजली
5
लेकीला शाळेत सोडण्यासाठी आलेल्या वडिलांचा गेटवर अचानक मृत्यू; Video पाहून पाणावतील डोळे
6
गोल्डन बॉय नीरज चोप्राने सपत्निक घेतली पंतप्रधान मोदींची भेट, खास फोटो सोशल मीडियावर पोस्ट
7
मुंबईतील एवढ्या वॉर्डात मुस्लिम मतदार निर्णायक, काँग्रेस उद्धवसेनेसह 'या' पक्षांची मुस्लिम मतांवर नजर
8
फास्ट फूड बनलं सायलेंट किलर; चाऊमीन, पिझ्झा-बर्गरमुळे आतड्यांना छिद्र; १६ वर्षीय मुलीचा मृत्यू
9
राहुल गांधींनी जर्मनीत उपस्थित केला 'व्होट चोरी'चा मुद्दा; देशाची बदनामी केल्याचा भाजपचा आरोप
10
Beed: सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणी वाल्मिक कराडसह सर्व आरोपींवर आरोप निश्चित
11
भारतीय रेल्वेच नंबर १… चीन, रशिया, जपान देशांना धोबीपछाड दिली; नवा मोठा वर्ल्ड रेकॉर्ड केला!
12
सायबर भामट्यांकडून IPS अधिकाऱ्याला ८ कोटींना गंडा; १२ पानांच्या चिठ्ठीत सगळं लिहिलं अन्...
13
Prashant Jagtap: अजित पवारांसोबत जाण्याला विरोध का? प्रशांत जगतापांनी अखेर कारण सांगितलं, पुणेकरांचा मांडला मुद्दा
14
सोने, स्टॉक की बिटकॉइन? अब्जाधीश गुंतवणूकदार रे डॅलिओ यांनी निखिल कामतसोबत उलगडली गुपिते
15
अदानींच्या 'या' उद्योगासंदर्भात मोठी अपडेट, ₹62 चा शेअर खरेदी करण्यासाठी उडाली लोकांची झुंबड
16
राज्यातील महानगरपालिका निवडणुकीसाठी काँग्रेसचे ४० स्टार प्रचारक जाहीर; पाहा, संपूर्ण यादी
17
Palmistry: तुमच्या हातावरील 'शुक्र पर्वत' सांगतो विवाहसौख्याचे गुपित; खडतर जीवन की श्रीमंती?
18
ठाकरे एकत्र, युती लवकरच; पण मनसेला समाधानकारक जागा मिळतील का?; संदीप देशपांडेचे मोठे विधान
19
DJ वाजवण्यापासून रोखलं, लग्नाची मिरवणूक निघण्यापूर्वीच नवरदेवानं उचललं टोकाचं पाऊल
20
संघर्षाचं सोनं झालं अन् 'आशा' बनली नगराध्यक्ष, नीलडोहच्या भूमिका मंडपेंची प्रेरणादायी वाटचाल 
Daily Top 2Weekly Top 5

Deepali Chavan Suicide: आणखी कोणाला आत्महत्या करावी लागणार नाही; प्रधान मुख्य वनसंरक्षक साईप्रसादांची ग्वाही

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 27, 2021 06:15 IST

दीपाली आत्महत्या प्रकरण : दीपाली यांच्या आत्महत्येची माहिती मिळताच परिस्थितीचे गांभीर्य ओळखून साईप्रसाद यांनी त्वरेने अमरावती गाठले.

अमरावती : मेळघाट व्याघ्र प्रकल्पांतर्गत हरिसाल येथील वनपरिक्षेत्र अधिकारी दीपाली चव्हाण यांच्या आत्महत्येच्या घटनेबाबत मुख्यमंत्री कार्यालयाला कळविले आहे. राज्याच्या प्रधान मुख्य सचिवांशी बोलणे झाले असून, दोषींवर कठोर कारवाई केली जाईल. वनविभागात अशाप्रकारच्या घटना घडणार नाही, याची दक्षता घेऊ, अशी ग्वाही राज्याचे प्रधान मुख्य वनसंरक्षक (वनबल) पी. साईप्रसाद यांनी शुक्रवारी येथे दिली.दीपाली यांच्या आत्महत्येची माहिती मिळताच परिस्थितीचे गांभीर्य ओळखून साईप्रसाद यांनी त्वरेने अमरावती गाठले. सायंकाळी ५ वाजताच्या सुमारास वनपरिक्षेत्राधिकारी संघटना आणि दीपाली यांच्या नातेवाईकांची साईप्रसाद, नितीन काकोडकर यांनी भेट घेतली. आत्महत्येला शिवकुमारसह मेळघाट व्याघ्र प्रकल्पाचे अपर प्रधान मुख्य वनसंरक्षक एम. एस. रेड्डी तितकेच जबाबदार असल्याची कैफियत मांडली. यावेळी बोलताना साईप्रसाद यांनी दीपाली यांची आत्महत्या वनविभागासाठी फार दुर्दैवी घटना असल्याची भावना व्यक्त केली. यावेळी उपवनसंरक्षक पियूषा जगताप, चंद्रशेखरन बाला आदी उपस्थित होते.

या आत्महत्या प्रकरणानंतर वनविभागात महिला अधिकारी असुरक्षित असल्याची बाब समोर आली आहे. त्याअनुषंगाने उपवनसंरक्षक, अपर प्रधान मुख्य वनसंरक्षक या स्तरावर दरमहा विशाखा समितीचा आढावा घेण्यात येईल, असे राज्याचे अपर प्रधान मुख्य वनसंरक्षक (वन्यजीव) नितीन काकोडकर यांनी सांगितले.मोबाइल जप्त, सीडीआर काढणारदीपाली यांचा मोबाइल फोन जप्त करण्यात आला. सुसाइड नोटमध्ये नमूद रेकार्डिंग, आरोपी विनोद शिवकुमार याचेसह वरिष्ठ वनाधिकाऱ्यांशी झालेला संवाद व अन्य बाबींची खातरजमा करण्यात येणार आहे. मोबाइलचा सीडीआर, हरिसाल वनपरिक्षेत्र अधिकारी कार्यालय परिसरातील सीसीटीव्ही फुटेज घेणे हा चौकशीचा एक भाग असल्याचे स्थानिक पोलिसांनी सांगितले. चौकशीसाठी आवश्यक असलेल्यांचे बयानदेखील नोंदविण्यात येणार आहेत.

खासदार राणा म्हणतात.. मी रेड्डींशी अनेकदा बोललेदीपाली यांनी सदर प्रकार आपल्याला सांगितला. विनोद शिवकुमार यांच्याशी त्यांच्या संवादाचे रेकार्डिंगदेखील मी ऐकली आहेत. त्यावर एम. एस. रेड्डी यांना दोन-तीनदा फोन लावले. चव्हाण यांची बदली करून द्या, अशी मागणीदेखील केली. मात्र, रेड्डी यांनी शिवकुमार यांचीच बाजू घेतल्याची माहिती खासदार नवनीत राणा यांनी ‘लोकमत’ला दिली. आमदार रवि राणा हेदेखील रेड्डी यांच्यासह तत्कालीन वनमंत्री संजय राठोड यांचेशी बोलल्याचे त्या म्हणाल्या.

टॅग्स :Deepali chavanदीपाली चव्हाणforestजंगल