शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
2
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
3
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
4
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
5
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
6
शालेय सहलींनी भरली एसटीची तिजोरी, मिळाले तब्बल १२७ कोटी रुपयांचे उत्पन्न
7
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
8
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खोळतात? असं आहे यामागचं गुपित
9
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
10
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
11
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
12
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
13
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
14
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
15
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
16
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
17
VIRAL : लेकाच्या कष्टाचे फळ! मुलगा घरी घेऊन आला पहिला फ्रीज; आईच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून व्हाल भावुक 
18
Video - संतापजनक! फक्त एक पेरू तोडला म्हणून ४ वर्षांच्या मुलीला दोरीने बांधून बेदम मारहाण
19
भिवंडीत तरुणाचा मृत्यू झाल्यानंतर विशेष सुरक्षा; भाड्यात दरवर्षी १० टक्के वाढ
20
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
Daily Top 2Weekly Top 5

भयंकर! तालिबानी पद्धतीने युवकाची हत्या; मृतदेह पाहून सगळेच हादरले, पोलिसही हैराण

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 28, 2022 13:32 IST

शेजारील गावात राहणाऱ्या दुसऱ्या जातीतील मुलीसोबत दीपकचे प्रेमसंबंध होते. मुलीचे वडील हेयर ड्रेसर होते.

मेरठ - उत्तर प्रदेशच्या मेरठ इथं दीपक त्यागी नावाच्या युवकाचा तालिबानी पद्धतीने खून करण्यात आला आहे. शिर नसलेला मृतदेह पाहून पाहणाऱ्याच्या अंगावरही काटा आला. दीपकच्या आरोपींपूर्वी मृतदेहाचं शिर शोधणं पोलिसांसाठी आव्हानात्मक बनलं आहे. पोलिसांनी या प्रकरणी सर्च ऑपरेशन सुरू केले आहे. आतापर्यंतच्या तपासामध्ये दीपकच्या हत्येमागं प्रेम प्रकरण अथवा एखाद्याशी शत्रूत्व असण्याचा पोलिसांना संशय आहे. 

पोलिसांनी या प्रकरणी एका युवतीसह काही जणांना ताब्यात घेऊन चौकशी केली परंतु काहीही पुरावा हाती लागला नाही. मुख्य रस्त्यापासून ऊसाच्या शेतापर्यंत रक्ताचे डाग पाहून ही घटना ही गंभीर आहे याचा प्रत्यय येतो. फॉरेन्सिक टीमच्या अंदाजानुसार, शिरच्छेद केल्यानंतर आरोपींनी मृतदेह २० मीटरपर्यंत त्याला फरफटत नेला असावा. या घटनेनंतर संतापलेल्या लोकांनी पोलिसांविरोधात घोषणाबाजी केली. शिर नसलेल्या मृतदेहाचं अंत्यसंस्कार करण्यास नातेवाईकांनी नकार दिला. या घटनेने गावकरी स्तब्ध झाले आहेत. सध्या गावात पोलिसांचा बंदोबस्त वाढवण्यात आला आहे. 

गावकऱ्यांनी सांगितले की, दीपकची निर्दयी हत्या करत आरोपींनी त्याचे शिर कापून घेऊन गेले. सध्या त्याचा मृतदेह शवागृहात ठेवण्यात आला आहे. दीपकच्या हत्येमुळे गावात दहशतीचं वातावरण पसरलं आहे. मृतदेहावर अंत्यसंस्कार करावे यासाठी पोलिसांनी कुटुंबाला विनंती केली. परंतु आरोपींना जोवर पकडलं जात नाही. दीपकचे शिर मिळत नाही तोपर्यंत त्याच्यावर अंत्यसंस्कार करणार नाही अशी भूमिका कुटुंबाने घेतली आहे. 

दीपकचे युवतीसोबत प्रेमसंबंधएसपी देहात केशव कुमार यांच्यानुसार, शेजारील गावात राहणाऱ्या दुसऱ्या जातीतील मुलीसोबत दीपकचे प्रेमसंबंध होते. मुलीचे वडील हेयर ड्रेसर होते. दीपकच्या नातेवाईकांना ही बाब कळताच ते नाराज झाले. मुलाचा मोबाईलही त्याच्याकडून काढून घेण्यात आला. पोलीस दोघांच्या मोबाईलचा सीडीआर तपासत आहेत. युवती आणि तिच्या नातेवाईकांना ताब्यात घेतले आहे. पीडित कुटुंबानेही युवतीच्या अँगलने पोलीस तपास करण्याची मागणी केली आहे. दीपकविरोधात पोलीस ठाण्यात २ गुन्हे दाखल होते. दीपक दबंग होता आणि दारू पिऊन मारामारी करायचा. आईवडिलांनी अनेकदा रागाने दीपकला ओरडले आहेत. दबंग असल्याने अनेकांशी त्याचे शत्रूत्व होते. त्यामुळे पूर्व वैमनस्यातून ही हत्या झालीय का या अँगलनेही पोलीस तपास करत आहेत. 

मध्यरात्रीपर्यंत राज्यमंत्र्यांचा ठिय्यामंत्री दिनेश खटीक आणि कार्यकर्त्यांनी रात्री उशिरापर्यंत गावात ठिय्या मांडला होता. आरोपींना लवकरात लवकर पकडावं अशी मागणी त्यांनी केली. दीपकचे वडील धीरेंद्र त्यागी शांत स्वभावाचे व्यक्ती आहेत. दीपक हा लहान मुलगा होता. २ मुलींचे लग्न झाले. शेतात दीपकचा शिर नसलेला मृतदेह पाहून शेतकऱ्यांमध्ये भीतीचं वातावरण आहे. ज्याने दीपकचा मृतदेह पाहिला तो थरथर कापला. 

टॅग्स :Policeपोलिस