शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वातंत्र्यानंतरचा सर्वात मोठा निर्णय, काँग्रेसच्या काळात...; जीएसटी बदलावर पंतप्रधानांची पहिली प्रतिक्रिया
2
अजित पवारांना नडलेल्या IPS अधिकारी अंजना कृष्णा कोण आहेत?
3
GST: जीएसटी कपातीच्या बैठकीत मोठे राजकारण रंगले; विरोधी राज्यांचे अर्थमंत्री अडून बसले, गोष्ट मतदानापर्यंत गेलेली...
4
मोठा गाजावाजा करत मुंबईकडे कूच करणार त्याआधीच वैभव खेडेकरांचा भाजपा पक्षप्रवेश स्थगित; कारण काय?
5
नाशिक मंडळ : अल्प उत्पन्न गटासाठी म्हाडाची ४७८ घरे
6
पुरामुळे भारत-पाकिस्तान सीमेचे मोठे नुकसान; ११० किमीच्या कुंपणाची पडझड, बीएसएफच्या ९० चौक्या पाण्यात
7
PM मोदींच्या मणिपूर दौऱ्यापूर्वी मोठे यश; राज्य आणि केंद्राने कुकी समूहाशी केला शांतता करार
8
'ऑपरेशन सिंदूर'मध्ये उद्ध्वस्त झालेल्या नूर खान एअरबेसच्या दुरुस्तीचे काम सुरू; भारताने ब्राह्मोस टाकून उद्ध्वस्त केले होते
9
फार्महाऊसवर सीक्रेट बैठक, असीम मुनीरचा तगडा प्लॅन; पुढील १० वर्ष पाकिस्तानवर करणार 'राज्य'
10
बस फक्त पेट्रोल, डिझेल तेवढे जीएसटीमध्ये आणायचे राहिले...; तिजोरीत फक्त २० रुपयेच आले असते...
11
शिक्षक दिनानिमित्त मराठी Messages, Quotes, Whatsapp Status आणि Greetings शेअर करुन द्या लाडक्या शिक्षकांना शुभेच्छा!
12
"विकास हा संतुलितपणे हवा"; व्हायरल व्हिडीओनंतर सर्वोच्च न्यायालयाने टोचले कान, केंद्राला नोटीस
13
मुंबई उपनगरात ईद-ए-मिलाद निमित्त सुट्टीच्या तारखेत बदल, ५ सप्टेंबरची सुट्टी कधी? जाणून घ्या
14
Delhi Flood: खवळलेल्या यमुनेचं भयावह रुप, पुराचं पाणी मंत्रालयाच्या उंबरठ्यावर, फोटो पहा
15
“हैदराबाद गॅझेटला सरकार अनुकूल, तेलंगणाप्रमाणे ४२ टक्के आरक्षण देणार का?”: हर्षवर्धन सपकाळ
16
GST च्या उत्साहानंतर बाजारात नफावसुली! सेन्सेक्स-निफ्टी उच्च पातळीवरून खाली, सर्वाधिक घसरण कुठे?
17
देवाची प्रत्यक्ष भेट! उपेंद्र लिमये यांना भेटले सुपरस्टार रजनीकांत, थलायवाला पाहून अभिनेत्याचा आनंद गगनात मावेना
18
खराब सर्व्हिस, समस्या...! बजाज चेतक पाचव्या नंबरवर फेकली गेली! ऑगस्टमध्ये स्कूटर खपविताना आले नाकीनऊ...
19
US Open 2025: अमेरिकन ओपन स्पर्धेत भारतीयाचा जलवा! जेतेपदाच्या अगदी जवळ पोहचलाय; आता फक्त...
20
पीएम किसानचा २१ वा हप्ता अडकणार? 'ही' चूक तात्काळ दुरुस्त करा, अन्यथा २००० रुपये मिळणार नाहीत!

विष प्यायलेल्या विवाहितेला घरातच ठेवल्याने मृत्यू; पतीसह सासूविरोधात गुन्हा

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 14, 2022 08:43 IST

वेदना असह्य झाल्याने दुसऱ्या दिवशी तिने आपण विष प्यायल्याची माहिती फोनवरून आईला दिली. 

नवी मुंबई : सासरच्या त्रासाला कंटाळून विष प्यायलेल्या विवाहितेला उपचारासाठी देखील मदत न करता घरातच ठेवल्याची घटना समोर आली आहे. अखेर दोन दिवसांनी विवाहितेनेच आपण विष प्यायल्याने माहेरच्यांना कळविल्यानंतर त्यांनी तिला रुग्णालयात दाखल केले. मात्र, तोपर्यंत संपूर्ण अंगात विष पसरल्याने उपचारादरम्यान १५ दिवसांनी तिचा मृत्यू झाला.

कोपरखैरणे सेक्टर १२ डी येथे राहणाऱ्या कुटुंबात हा प्रकार घडला आहे. मानसी भगत (३६) असे मृत पावलेल्या विवाहितेचे नाव असून ती मूळची बुलढाणा येथील गवई कुटुंबातील आहे. आठ महिन्यांपूर्वी तिचा विवाह कोपरखैरणे येथे राहणाऱ्या अजय योगीराज भगत याच्यासोबत झाला होता. विवाहानंतर मानसी ही कोपरखैरणेत पती व सासू कमलाबाई यांच्यासह राहायला होती. मात्र, लग्नाच्या एक महिन्यानंतरच तिला पती व सासूकडून त्रास देण्यास सुरुवात झाली होती. याबाबत ती माहेरच्यांकडे सतत तक्रार करत होती. त्यावरून तिच्या माहेरच्यांनी मानसी हिच्या सासरी येऊन त्यांची समजूत देखील काढली होती. त्यानंतरही छोट्या-छोट्या गोष्टींवरून पती व सासूकडून होणाऱ्या त्रासाला मानसी कंटाळली होती. या त्रासातून सुटकेसाठी तिने १४ जानेवारीला उंदीर मारण्याचे औषध पिऊन आत्महत्येचा प्रयत्न केला. त्यामुळे तिला त्रास होऊ लागला असतानाही पती व सासूने तिला उपचारासाठी रुग्णालयात घेऊन न जाता तिच्याकडे दुर्लक्ष केले. अखेर विषारी औषध शरीरात पसरू लागले असता मानसीचा त्रासदेखील वाढू लागला. 

रुग्णालयांनी दाखल करण्यास दिला नकारवेदना असह्य झाल्याने दुसऱ्या दिवशी तिने आपण विष प्यायल्याची माहिती फोनवरून आईला दिली. त्यानंतर औरंगाबाद येथील मावशीने मानसीच्या मदतीसाठी धाव घेतली. मात्र, तीन ठिकाणी रुग्णालयात नेऊनही वेगवेगळ्या कारणांनी तिला दाखल करून घेतले नाही. अखेर २० जानेवारीला तिला घाटकोपरच्या राजावाडी रुग्णालयात दाखल केल्यानंतर उपचार सुरू झाले. संपूर्ण शरीरात विष पसरले होते. यामुळे २९ जानेवारीला उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी