शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
3
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
4
Ravindra Erande : खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
5
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
6
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
7
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
8
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
9
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
10
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
11
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
12
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
13
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
14
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
15
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
16
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
17
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
18
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
19
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
20
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
Daily Top 2Weekly Top 5

घटस्फोटासाठी सासरची माणसं १ कोटी मागताहेत! व्हिडीओ रेकॉर्ड करत तरुणाची आत्महत्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 28, 2021 14:10 IST

पत्नी आणि सासरच्या लोकांकडून होत असलेल्या त्रासाला कंटाळून तरुणानं जीवन संपवलं

भोपाळ: मध्य प्रदेशच्या खरगोनमध्ये ४० फूट उंचावरून उडी मारून एका तरुणानं आत्महत्या केली आहे. नर्मदा नदीवर असलेल्या पुलावरून उडी घेत तरुणानं आपलं जीवन संपवलं. त्याआधी त्यानं एक व्हिडीओ रेकॉर्ड केला. घटस्फोटासाठी पत्नीसोबत सासरची मंडळी एक कोटी रुपये मागत असल्याचा आरोप त्यानं व्हिडीओमध्ये केला. पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे.

तरुणाच्या आत्महत्येनंतर त्याच्या कुटुंबियांनी तरुणाची पत्नी आणि तिच्या माहेरच्या मंडळींविरोधात छळाचा आरोप केला आहे. जिल्हा मुख्यालयापासून ८० किलोमीटर दूर असलेल्या बडवाह येथील नर्मदा नदीच्या पुलावरून उडी मारून तरुणानं आत्महत्या केली. अजय द्विवेदी असं तरुणाचं नाव आहे. त्याचे वडील डेप्युटी रेंजर आहेत. अजयचा मृतदेह नदीत तरंगताना आढळून आला.

रिवामध्ये वास्तव्यास असलेला अजय द्विवेदी इंदूरहून स्कूटीवरून त्याच्या मित्रासोबत ओमकारेश्वरला जात होता. त्याच दरम्यान त्यानं नर्मदा नदीवर असलेल्या पुलावरून उडी घेतली. तीन दिवसांपासून त्याचा शोध सुरू होता. अखेर शनिवारी त्याचा मृतदेह आढळून आला. स्थानिकांनी दिलेल्या माहितीनंतर अजयचा मृतदेह सापडला.

अजयचा मृतदेह सापडल्याचं समजताच त्याचं नातेवाईक नर्मदा नदीच्या पात्राजवळ पोहोचले. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन तो शवविच्छेदनासाठी पाठवला. अजयचे वडील प्रमोद द्विवेदी रिवा जिल्ह्यातील सिरमौरचे डेप्युटी रेंजर आहेत. त्यांनी अजयच्या सासरच्या व्यक्तींच्या विरोधात छळाची तक्रार दाखल केली आहे. सासरचे लोक पैशांची मागणी करत असल्यानंच अजयनं आत्महत्या केली. त्यामुळे त्यांच्याविरोधात कारवाई करण्याची मागणी त्यांनी केली.

व्हिडीओत नेमकं काय?अजय द्विवेदीनं आत्महत्या करण्यापूर्वी एक व्हिडीओ चित्रित केला. 'प्रार्थना तिवारी माझ्या मृत्यूला जबाबदार आहे. ३ वर्षांपासून माझ्या कुटुंबाविरोधात केस केली आहे. ३ वर्षांपासून केस सुरू आहे. माझ्याकडून १ कोटी रुपये मागितले आहेत. त्यांनी खूप मोठा कट आखला आहे. त्यामुळे कंटाळून मी आत्महत्या करत आहे. माझ्या आत्महत्येला जबाबदार असणाऱ्यांना कोर्टानं शिक्षा द्यावी,' असं अजयनं आत्महत्येपूर्वी चित्रित केलेल्या व्हिडीओत म्हटलं आहे.