शहरं
Join us  
Trending Stories
1
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
2
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
3
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
4
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
5
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
6
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
7
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
8
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
9
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
10
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
11
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
12
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
13
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
14
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
15
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
16
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
17
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
18
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
19
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
20
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
Daily Top 2Weekly Top 5

वरळी परिसरात महिलेचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलिसांना गळ्याभोवती आढळला व्रण

By पूनम अपराज | Updated: December 26, 2020 21:23 IST

Murder : या प्रकरणी वरळी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला असून पोलीस अधिक तपास करत आहेत.

ठळक मुद्दे वरळी परिसरातील जी बी खेर मार्गावरील तात्पुरत्या लेबर कॅम्पच्या पत्र्याच्या कंम्पाऊडमध्ये शिखा ही राहत होती. गुरूवारी रात्री शिबु भौमिक याच्यासोबत तिला शेवटचे अनेकांनी पाहिले असल्याचं निष्पन्न झालं आहे.

वरळी परिसरात एका ४४ वर्षीय महिलेची निर्घृण हत्या केल्याची खळबळजनक घटना शुक्रवारी उघडकीस आली आहे. शिखा नारायण मंडल असे या मृत महिलेचे नाव आहे. वरळीच्या जी बी खेर मार्गावरील तात्पुरत्या लेबर कॅम्पच्या पत्र्याच्या कंम्पाऊडमध्ये तिचा मृतदेह आढळून आला. या घटनेनंतर एकच खळबळ माजली होती. या प्रकरणी वरळी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला असून पोलीस अधिक तपास करत आहेत.वरळी परिसरातील जी बी खेर मार्गावरील तात्पुरत्या लेबर कॅम्पच्या पत्र्याच्या कंम्पाऊडमध्ये शिखा ही राहत होती. गुरूवारी रात्री शिबु भौमिक याच्यासोबत तिला शेवटचे अनेकांनी पाहिले असल्याचं निष्पन्न झालं आहे. त्यानंतर गुरूवारी सायंकाळी शिखा रक्ताच्या थारोळ्यात लेबर कॅम्पच्या पत्र्याच्या कंम्पाऊडमध्ये आढळून आल्याने एकाच खळबळ उडाली. याची माहिती स्थानिकांनी पोलीस कंट्रोल रूमला दिल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी वरळी पोलिसांचे पथक दाखल झाले.

शिखाच्या गळ्याभोवती एक व्रण आढळून आला आहे. तसेच तिच्या नाकावर आणि कपाळावर हत्याराने वार केले असल्याचे देखील दिसून आले आहे. शिखाला तातडीने नायर रुग्णालयात नेले असता. तिचा मृत्यू झाला असल्याचे डाँक्टरांनी घोषित केले. शिखाच्या हत्येचे कारण अद्याप पुढे आले नसून पोलिसांनी संशयित आरोपी शिबु भौमिक विरोधात ३०२ भा.द.वि कलमांसह गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणी वरळी पोलीस शिबुचा शोध घेत आहेत.

टॅग्स :MurderखूनWomenमहिलाPoliceपोलिसMumbaiमुंबई