शहरं
Join us  
Trending Stories
1
इतर देशांवर अवलंबित्व हाच आपला खरा शत्रू; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिली स्वयंपूर्णतेची हाक
2
आजचे राशीभविष्य, २१ सप्टेंबर २०२५: आर्थिक निर्णय टाळा, भावनेच्या भरात मोठी चूक होण्याची शक्यता
3
एच-१ बी कर्मचाऱ्यांनो तातडीने अमेरिकेत परत या, अन्यथा मार्ग बंद; भारतीय आयटी कंपन्यांची धावपळ
4
डोनाल्ड ट्रम्प यांच्या निर्णयानं आता अमेरिकेत नोकरी करणे महाग; भारतीयांना बसणार फटका
5
IND vs PAK यांच्यातील मॅच आधी PCB अध्यक्ष मोहसीन नक्वी यांच्यावर आली पळ काढण्याची वेळ! कारण...
6
युरोपातील विमानतळांवर सायबर हल्ला; उड्डाणे विस्कळीत, वेळापत्रकावर परिणाम
7
BCCI New President : ठरलं! पुन्हा एकदा माजी क्रिकेटर होणार बीसीसीआयचा 'कारभारी'; पण कोण?
8
IND vs PAK Live Streaming : टीम इंडिया पुन्हा पाकचा बुक्का पाडणार? मैदानातील माहोल कसा असणार?
9
ST मध्ये नोकरी करणार का? १७,४५० जागांची संधी; भविष्यात येणाऱ्या ८ हजार बसेससाठी हवे मनुष्यबळ
10
डिसेंबरपर्यंत मुंबईत स्वयंचलित दरवाजांच्या नॉन एसी लोकल धावणार; रेल्वेमंत्र्यांची माहिती
11
कुजबुज! भाजपने आणला नवा ‘ब्रँड’; CM देवेंद्र फडणवीसांनी कौतुक करत राज ठाकरेंना लगावला टोला
12
गरब्यांमध्ये फक्त हिंदूंनाच प्रवेश, प्रत्येकाच्या कपाळी टिळा लावा; विश्व हिंदू परिषदेची भूमिका
13
राज्यात पावसाचा कहर, धरणे भरली, नद्यांना पूर; ३५ धरणांमधून ३ लाख १८,८५९ क्युसेकचा विसर्ग
14
‘शेतकऱ्यांनो, हताश होऊ नका, भरपाई लवकरच’; कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांची ग्वाही
15
“सरकारमधील मंत्र्यांचा बोगस दाखले देण्यासाठी यंत्रणांवर दबाव”; विजय वडेट्टीवारांचा आरोप
16
अमेरिकेने H-1B व्हिसाची घोषणा करताच शेकडो भारतीय विमानात बसलेले उतरले...; भारतात आलेले अडकले...
17
IND vs AUS : ऑस्ट्रेलियाविरुद्ध ४०० पारची लढाई; स्मृती मानधनाची विक्रमी खेळी
18
'सरकारने याबाबत माहिती द्यावी', पाकिस्तानच्या राफेल पाडल्याचा दाव्यावर काँग्रेसची प्रतिक्रिया...
19
IND vs PAK : टीम इंडियाच्या या कर्णधारानं पाक विरुद्ध Live मॅचमधून घेतलेली माघार! कारण...
20
‘वंदे भारत’ची नाचक्की, २०० जणांनीही केला नाही प्रवास; मोदींच्या बड्डेला सुरू, प्रवाशांची पाठ

सूटकेसमध्ये मृतदेह, शिर गायब, तब्बल १ वर्षांनी झाला हत्येचा खुलासा; पोलीस हादरले

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 5, 2022 15:49 IST

सानियाच्या घरच्यांनी पोलीस ठाणे गाठलं आणि तक्रार नोंदवली. २९ ऑगस्ट २०२२ रोजी सानिया बेपत्ता झाल्याचं तक्रार नोंदवत पोलिसांनी तपासाला सुरुवात केली.

मुंबई - वसई येथील एका बीचवर शिर नसलेला मृतदेह सापडला. हा मृतदेह एका मुलीचा होता. जिला काळ्या रंगाच्या सूटकेसमध्ये बंद केले होते. पोलिसांनी हा मृतदेह ताब्यात घेत पोस्टमोर्टमसाठी पाठवला त्याचसोबत मृतदेहाचं शिर शोधण्याचे प्रयत्न सुरु केले. मृतदेहाची ओळख पटवणे हे पोलीस तपासातील मोठं आव्हान होते. या घटनेला १ वर्ष झाले परंतु पोलिसांच्या हाती काहीच पुरावा लागला नाही. मात्र त्यानंतर अचानक एक व्यक्ती मुलीचा शोध घेत पोलीस स्टेशनला पोहचतो त्यानंतर शिर नसलेल्या मृतदेहाचं भयानक रहस्य ऐकून सर्वच हादरतात. 

२६ जुलै २०२१ वसई त्यादिवशी वसईच्या भूईगाव बीचवर चिखलात काळ्या रंगाची मोठी सूटकेस सापडते. ही बातमी पोलिसांपर्यंत पोहचते. पोलीस घटनास्थळी दाखल होतात. पहिल्याच नजरेत हे सगळं संशयास्पद वाटतं कारण निर्जनस्थळी बीचवर अशी सूटकेस सापडते. या सूटकेसमध्ये एका मुलीचा मृतदेह सापडतो मात्र तो मृतदेह शिर नसलेला असतो. 

हत्येचा गुन्हा दाखलप्रथमदर्शनी ही हत्या असल्याचं निदर्शनास आल्यानंतर वसई पोलिसांनी आयपीसी ३०२ अंतर्गत हत्येचा गुन्हा दाखल करतात. परंतु खूप प्रयत्नानंतरही पोलिसांच्या हाती काहीच लागत नाही. याचवेळी पोलीस मृतदेह, सूटकेस, मृतदेहावरील कपडे यांचे विविध फोटो राज्यभर पसरवतं. जेणेकरून फोटोवरून पोलिसांना पुरावा हाती लागेल. मात्र काहीच फायदा होत नाही. पोलीस मृतदेहाचं पोस्टमोर्टम करून डीएनए सॅम्पल सुरक्षित ठेवते. या तपासाला १ वर्ष पूर्ण होतात. मात्र मृतदेह कुणाचा याचा सुगावा लागत नाही. 

मुलीच्या शोधात कुटुंब मुंबईत येतंकर्नाटकमधून एक कुटुंब मुलीच्या शोधात मुंबईत पोहचतं. या मुलीचं नाव सानिया शेख असं होतं. जिचं लग्न नालासोपाऱ्यात राहणाऱ्या आसिफ शेखसोबत झाले होते. सोनिया लहान असतानाच तिच्या आईवडिलांचं निधन झालं होते. तिला काका-काकीने वाढवलं होते. मागील १ वर्षापासून काका पुतणीसोबत फोनवरून बोलण्याचा प्रयत्न करत होते. परंतु तिचा फोन स्विच ऑफ लागत होता. जावई आसिफला फोन केला तर तो रॉंग नंबर म्हणून कट करत होता. 

जेव्हा सानियाचे नातेवाईक नालासोपाऱ्याला मुलीच्या शोधात गेले तेव्हा आसिफ आणि तिचं कुटुंब तिथे राहत नसल्याचं पुढे आले. त्यानंतर सानियाच्या काकांनी प्रयत्न केल्यानंतर आसिफ आणि त्याच्या आईशी बोलणं झाले. त्यांनी नालासोपाऱ्याची संपत्ती विकून मुंब्रा इथे राहायला गेल्याचं म्हटलं. जेव्हा मुंब्रा येथे सानियाचे नातेवाईक पोहचले तेव्हा आसिफ आणि लहान मुलगी दिसली परंतु सानिया दिसली नाही. सानिया तिच्या बॉयफ्रेंडसोबत पळून गेल्याचं सासरच्या मंडळींनी सांगितले. परंतु त्याबाबत सानियाच्या नवऱ्याने तक्रारही दाखल केली नसल्याने कुटुंबाला संशय आला. 

त्यानंतर सानियाच्या घरच्यांनी पोलीस ठाणे गाठलं आणि तक्रार नोंदवली. २९ ऑगस्ट २०२२ रोजी सानिया बेपत्ता झाल्याचं तक्रार नोंदवत पोलिसांनी तपासाला सुरुवात केली. तेव्हा पोलिसांनी वसई येथील मृतदेहाचे फोटो दाखवले ते सानियाच्या नवऱ्याने आणि सासरकडील लोकांनी ओळख पटवण्यास नकार दिला. परंतु जेव्हा हे फोटो सानियाच्या नातेवाईकांनी पाहिले तेव्हा त्यांनी मृतदेहाची ओळख पटवली. मृतदेहावरील कपडे आणि अन्य खूणांमुळे ओळख पटली. पोलिसांनी अधिक तपास केला असता सासरकडच्यांनी उडवाउडवीची उत्तरे देण्यात सुरुवात केली. मात्र खाकीचा हिसका दाखवताच नवऱ्याने सत्य उलगडलं. आसिफनं वडील हनीफ, भाऊ यासीनसोबत मिळून आधी सानियाचे हात पाय बांधून तिला पाण्याच्या टबात टाकलं. त्यात बुडल्यामुळे तिचा जीव गेला. त्यानंतर पुरावे मिटवण्यासाठी आरोपी वडिलांनी सानियाचं शिर धडापासून वेगळे केले आणि वेगवेगळ्या ठिकाणी फेकून दिले. मुलीला दत्तक देण्यावरून आसिफ सानियात वाद झाला होता. त्यावरून आसिफने सानियाला संपवलं.

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी