शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
3
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
4
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
5
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
6
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
7
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
8
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
9
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
10
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
11
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
12
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
13
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
14
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
15
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
16
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
17
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
18
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
19
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
20
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
Daily Top 2Weekly Top 5

Video : अनैतिक संबंधामुळे पतीने प्रेयसीच्या सहाय्याने काढला पत्नीसह चिमुकल्या मुलीचा काटा  

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 1, 2019 18:36 IST

शाहू नगर पोलिसांनी पती इलियाज आणि त्याची प्रेयसी आफरीनबानोला केली अटक 

ठळक मुद्देडायमंड अपार्टमेंट राहणाऱ्या तेहसिन (३४), अडीज वर्षीय मुलगी आलिया उर्फ फातिमा यांचा गळा चिरून पतीने निर्घृण हत्या केली. तसेच पुरावे नष्ट करण्यासाठी प्रेयसीच्या मदतीने मृतदेह जाळले. पोलिसी खाक्या दाखवल्यानंतर इलियाजने खुनाची कबुली दिली. त्यानंतर त्याच्या प्रेयसीला देखील अटक करण्यात आली.

मुंबई - धारावी परिसरातील शाहू नगर येथे काल अतिशय धक्कादायक घटना घडली होती. डायमंड अपार्टमेंट राहणाऱ्या तेहसिन (३४), अडीज वर्षीय मुलगी आलिया उर्फ फातिमा यांचा गळा चिरून पतीने निर्घृण हत्या केली. तसेच पुरावे नष्ट करण्यासाठी प्रेयसीच्या मदतीने मृतदेह जाळले. याप्रकरणी शाहू नगर पोलिसांनी पती इलियाज (३८) आणि त्याची प्रेयसी आफरीनबानोला ( अटक केली आहे. 

इलियाज सय्यद आणि आफरीनबानो फय्याज हुसेन सय्यद यांचे विवाहबाह्य संबंध होते. या संबंधाबाबत  इलियाज सय्यद याचा पत्नीला तेहसिनला सुगावा लागला होता. त्यानंतर त्यांच्या वारंवार भांडणाचे खटके उडत. आपल्या  अनैतिक संबंधांच्या आड येणाऱ्या पत्नी आणि चिमुकल्या मुलीची प्रेयसीच्या मदतीने केली हत्या करून मृतदेह जाळून पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न इलियाज आणि आफरीनबानोने केला. काल हे दुष्कृत्य करून इलियाज हा दरवाजा आतून बंद (लॅच ) करून निघून केला होता. त्यानंतर त्याच्या मेहुणीने घरातून धूर येताना पाहून इलियाजला बोलावून घेतले. त्यानंतर पोलिसांनी संशयित म्हणून इलियाजला आपल्या ताब्यात घेतले होते. मात्र, आपल्याला काहीच माहित नसल्याचा आव इलियाजने आणला होता. पोलिसी खाक्या दाखवल्यानंतर इलियाजने खुनाची कबुली दिली. त्यानंतर त्याच्या प्रेयसीला देखील अटक करण्यात आली. पोलिसांनी या तपासासाठी पाच ते सहा पथकं तयार केली असल्याची माहिती सहाय्यक पोलीस आयुक्त आजिनाथ सातपुते यांनी लोकमतशी बोलताना दिली. 

Video : हृदयद्रावक! आईसह ४ वर्षाच्या मुलीची केली गळा चिरून हत्या

आफरीनबानोशी इलियाजची कशी झाली ओळख 

इलियाज हा वडाळा येथील एका जरीच्या कारखान्यात काम करतो. या कारखान्याजवळच आफरीनबानो राहत होती. त्यावेळी त्याची ओळख तिच्याशी झाली. तसेच आफरीनबानो ही इलियाजच्या गावातील दूरची नातेवाईक आहे. त्यानंतर ओळखीचे रूपांतर विवाहबाह्य संबंधात झाले. 

टॅग्स :MurderखूनArrestअटकPoliceपोलिस