शहरं
Join us  
Trending Stories
1
'...तर हिंदूंसाठी एकही देश शिल्लक राहणार नाही'; मुस्लीम लोकसंख्या वाढीवरून भाजपचा काँग्रेसवर निशाणा
2
BANW vs INDW : भारतीय महिलांनी रचला इतिहास; बांगलादेशला त्यांच्यात घरात ५-० ने नमवले
3
हरियाणातील BJP सरकार कोसळणार? काँग्रेसने केला बहुमताचा दावा, राज्यपालांना लिहिले पत्र...
4
"आम्हाला रस्त्यावर आणून तू विदेशात स्थायिक", पालकांची ४ पानी सुसाईड नोट, डोळ्यात येईल पाणी
5
संजू सॅमसनला बाद ठरवणाऱ्या Controversial  निर्णयाचा नवा Video, अखेर सत्य समोर आलेच... 
6
'सिकंदर' ची घोषणा झाल्यानंतर सलमान-रश्मिकाचा जुना व्हिडिओ व्हायरल, भाईजानचं तेलुगू ऐका!
7
अब की बार, मतदान जोरदार!... कोल्हापुरातील वाढलेला टक्का कुणाला देणार धक्का? 
8
'12th Fail' फेम विक्रांत मेसीने टॅक्सी ड्रायव्हरला केली शिवीगाळ? अभिनेत्यावर गंभीर आरोप, व्हिडिओ व्हायरल
9
मोठी बातमी : एक चूक काय झाली, LSG च्या मालकांनी लोकेश राहुलच्या हकालपट्टीची तयारी सुरू केली
10
"निवडणूक प्रचार हा मूलभूत अधिकार नाही", केजरीवाल यांच्या जामीन अर्जाला ईडीचा विरोध
11
विराट कोहलीला पंजाबविरूद्धच्या सामन्यात मोठ्या विक्रमाची संधी; ठरू शकतो पहिलाच भारतीय!
12
मुग्धा गोडसे भडकली, मॉलमधील एका कॅफेत आईला मिळाली वाईट वागणूक; प्रकरण काय?
13
चंद्रासंदर्भात आली आणखी एक आनंदाची बातमी, सुरू आहे Moon Express ची तयारी; NASA थेट रेल्वेच चालवणार!
14
"देशात भाजपा एकटीच 370 पेक्षा जास्त जागा जिंकेल..."; शिवराज सिंह चौहान यांचा मोठा दावा
15
हरियाणामध्ये राजकीय हालचालींना वेग, 'बहुमत चाचणी घ्या', माजी उपमुख्यमंत्र्यांची राज्यपालांकडे मागणी
16
“पराभवाच्या भितीने भांबावल्यानेच नरेंद्र मोदींकडून दररोज असत्य विधाने”; काँग्रेसची टीका
17
राम मंदिराच्या पहिल्या मजल्याचे काम वेगाने सुरु; ‘असा’ असेल राम दरबार, कधी होणार पूर्ण?
18
नफ़रत नहीं, नौकरी चुनो! 'इंडिया'चे सरकार बनतंय; ३० लाख रिक्त सरकारी पदे भरणार : राहुल गांधी
19
"आमचे अणुबॉम्ब कायम सज्ज असतात"; रशियन राष्ट्राध्यक्ष पुतीन यांची अमेरिकेला खुली धमकी
20
‘पैसे मिळाले नाहीत का तुला? मिळाले नसतील तर...’, भरसभेत अजित पवार यांनी विचारलं आणि...

बापरे! सासूच्या टोमण्यांना वैतागून अग्निपरीक्षा दिली; पेटत्या निखाऱ्यांवरून सून चालली; Video व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Published: August 25, 2021 10:27 AM

Daughter in law agnipariksha due to mother in law : सासूच्या टोमण्यांना वैतागून एका सुनेने अग्निपरीक्षा दिली आहे. पेटत्या निखाऱ्यांवरून चालणाऱ्या सुनेचा व्हिडीओ सध्या जोरदार व्हायरल झाला आहे.

नवी दिल्ली - देश सध्या कोरोनासारख्या महाभयंकर संकटाचा सामना करत आहे. याच दरम्यान अनेक धक्कादायक घटना या सातत्याने समोर येत आहेत. अशीच एक भयंकर घटना समोर आली आहे. सासूच्या टोमण्यांना वैतागून एका सुनेने अग्निपरीक्षा दिली आहे. पेटत्या निखाऱ्यांवरून चालणाऱ्या सुनेचा व्हिडीओ सध्या जोरदार व्हायरल झाला आहे. या घटनेने एकच खळबळ उडाली आहे. स्वतःला निर्दोष सिद्ध करण्यासाठी ती चक्क पेटत्या निखाऱ्यांवरून चालली आहे. मध्य प्रदेशच्या छिंदवाडा जिल्ह्यातील सौसर परिसरात ही नात्याला काळीमा फासणारी घटना घडली आहे.  

सासूच्या टोमण्यांना वैतागलेल्या सुनेने अखेर सासूच्या छळापासून मुक्ती हवी म्हणून पेटत्या निखाऱ्यांवरून चालत अग्निपरीक्षाही दिल्याची घटना समोर आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, गेल्या कित्येक दिवसांपासून सासू आणि सुनेचं पटत नव्हतं. त्यांच्यामध्ये छोटे मोठे वाद हे नेहमीच होत होते. आपल्या मुलाला काहीतरी खायला घालून सुनेने वश केलं आहे, असा आरोप सासूने केला. यावरून ती सुनेला सतत टोमणे मारायची. दररोजच्या या कटकटीला सून इतकी वैतागली की अखेर यातून मुक्ती मिळवण्यासाठी ती भोंदूबाबाच्या जाळ्यात अडकली. 

भोंदूबाबाने सुरुवातीला धर्मग्रंथावर सुनेला हात ठेवायला सांगितला. तिच्या सासूला ती निर्दोष आहे, हे पटवून देण्याचा प्रयत्न केला. पण सासू काही ऐकायला तयार नाही. ती तरी देखील सुनेला टोमणे मारत असे. मग भोंदूबाबाने महिलेला अग्निपरीक्षेचा मार्ग सांगितला. सुनेला पेटत्या निखाऱ्यावर चालत आपण निर्दोष आहोत हे सर्वांसमोर सिद्ध करायला सांगितलं. सासूच्या रोजच्या छळाला सून इतकी कंटाळली होती की ती त्यातून आपली सुटका व्हावी म्हणून ती चक्क पेटत्या निखाऱ्यांवर चालायला देखील तयार झाली. ही बातमी सगळीकडे वाऱ्यासारखी पसरली. 

महिलेचं कुटुंब, नातेवाईक, शेजारी, ग्रामस्थ हे सुनेला पाहण्यासाठी जमा झाले. जमिनीवर पेटते निखारे ठेवण्यात आले. त्यावरून आधी भोंदूबाबाने चालण्याचं नाटक केलं. त्यानंतर त्याने त्या महिलेला त्याच्यावरून चालायला सांगितलं. महिला एकदा नव्हे तर दोनदा या निखाऱ्यांवरून चालली. मोठ्या संख्येने लोक हा धक्कादायक प्रकार पाहत होते. सोशल मीडियावर या घटनेचा एक व्हिडीओ तुफान व्हायरल झाला असून अनेक जण यावर टीका करत आहेत. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीMadhya Pradeshमध्य प्रदेश