शहरं
Join us  
Trending Stories
1
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने सहज जिंकला सामना, गुजरात टायटन्सला नमवून Mumbai Indians ला दिला धक्का 
2
२५ धावांत ६ विकेट्स ! RCB ने पायावर धोंडा मारला, जॉश लिटल GT चा नायक ठरला 
3
जम्मू-काश्मीर: हवाई दलाच्या वाहनांवर दहशतवाद्यांचा गोळीबार; लष्कराचे काही जवान जखमी
4
विराट कोहलीचा भीमपराक्रम! उत्तुंग षटकार पाहताच भारी होती अनुष्का शर्माची रिॲक्शन, Video
5
मोठी बातमी: लैंगिक शोषण आणि अपहरण प्रकरणात एचडी रेवन्ना यांना SITकडून अटक
6
विझण्यापूर्वी RCB ची फडफड! गुजरात टायटन्सविरुद्ध दाखवली 'पॉवर'; यंदाच्या पर्वात रचला इतिहास
7
अरे तुला फरक पडत नाही, मग कशाला उत्तर देतोस? सुनील गावस्कर संतापले, विराट कोहलीला सुनावले
8
PHOTOS : क्रिकेट म्हणजे जीवन आणि क्रिकेट हेच जीवन; IPL मध्ये जान्हवी कपूरचा जलवा!
9
'घेऊद्या तारीख, ईडीच्या प्रकरणात कुठे जामीन मिळतो'; न्यायाधिशांचे कोर्टरुमबाहेर धक्कादायक वक्तव्य
10
लोकसभेचा निकाल लागताच चित्र बदलणार; थरूर यांनी सांगितला 'इंडिया' आघाडीचा प्लॅन
11
"अरविंद केजरीवालांनी वाराणसीतून नरेंद्र मोदींच्या विरोधात निवडणूक लढवावी"; सपा नेत्याची मागणी
12
मला धमक्या देऊ नका, मी मनात आणलं तर..., नारायण राणे यांचा उद्धव ठाकरेंना इशारा
13
पाकिस्तानच्या माजी मंत्र्यांकडून दुसऱ्यांदा राहुल गांधींचं कौतुक; भाजपानं घेरलं
14
IPL 2024 मधील दोन भारतीय स्टार गोलंदाज स्पर्धेत आता पुढे कदाचित नाही खेळू शकणार 
15
NSE Share : एकावर ४ बोनस शेअर्स, ९०००% डिविडंड; 'या' एक्सचेंजनं गुंतवणूकदारांना दिलं डबल गिफ्ट
16
"हार्दिक पांड्याबद्दल आदर दिसत नाही", इरफान पठाणकडून MI च्या कॅप्टनची बिनपाण्याने धुलाई
17
T20 World Cup : यजमान विडिंजने उतरवला तगडा संघ; IPL गाजवणाऱ्यांना संधी, नवे चेहरेही मैदानात!
18
रोहित शर्माबद्दल 'ती' अफवा पसरवली; आकाश चोप्रा भडकला, दिली संतप्त प्रतिक्रिया
19
कांदा निर्यातबंदी उठवण्याच्या निर्णयावर काँग्रेसची टीका, बाळासाहेब थोरात म्हणाले...
20
Kotak Mahindra Bank Q4: नफा वाढून ४१३३ कोटींवर, व्याजातून होणारी कमाई १३.३% वाढली

आई रागावल्यामुळे मुलीने केली आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 20, 2021 12:35 AM

भिवंडी येथील घटना : गळफास घेतला

लोकमत न्यूज नेटवर्क भिवंडी : सध्या कोरोनाचे संकट असल्याने शासनाने कडक निर्बंध लागू केले असून नागरिकांना घरीच राहण्याचे आवाहन केले आहे. त्यामुळे घरात राहून कुटुंब टीव्ही किंवा मोबाइलमध्ये व्यस्त असल्याचे पाहावयास मिळत आहे. भिवंडी शहरात अशीच एक धक्कादायक घटना समोर आली आहे. १५ वर्षीय मुलगी टीव्ही पाहत असताना मोबाइलवर गेम खेळत होती. त्यावेळी आईने टीव्ही पाहत असताना मोबाइलवर गेम नको खेळू असे दरडावले. मात्र आई आपल्यावर रागावल्यामुळे या मुलीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना न्यू टावरे कम्पाउंड येथे रविवारी घडली.कोमल रवींद्र सलादल्लू (१५) हे आत्महत्या केलेल्या मुलीचे नाव आहे. ती घरामध्ये टीव्ही पाहत होती. त्याचवेळी ती मोबाइलवर गेमसुद्धा खेळत होती. त्यावेळी तिची आई रेखा रागावली. त्याचा  कोमलला राग आल्याने तिने पहिल्या मजल्यावर जाऊन सिलिंग फॅनला ओढणीने गळफास घेऊन आत्महत्या केली. याची माहिती मिळताच भोईवाडा पोलीस ठाण्याच्या पथकाने तातडीने घटनास्थळी धाव घेऊन कायदेशीर कारवाई केली.

तक्रार नाही आत्महत्या केलेल्या कोमल सलादल्लू हिचा मृतदेह स्व. इंदिरा गांधी उपजिल्हा रुग्णालयात उत्तरीय तपासणीसाठी पाठवण्यात आला आहे. या मुलीच्या आईने कोणतीही तक्रार दिली नसल्याने भोईवाडा पोलीस ठाण्यात याप्रकरणी आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. याबाबत पुढील तपास सुरु असल्याचे पोलिसांनी सांगितले.