शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

माझ्या जीवाला धोका; क्रूझवरील कारवाईवेळी मी तिथे नव्हतो; मनीष भानुशाली यांनी दिली प्रतिक्रिया

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 6, 2021 18:16 IST

Manish Bhanushali Reaction : १ तारिखच्या दुपारी माझ्या काही गुप्त माहिती मिळाली. त्यानंतर आपल्या देशाच्या युवा पिढीला कमजोर करणारी ही घटना असल्याने मी ही माहिती एनसीबीला दिली.

ठळक मुद्देमाझं नाव पुढं आल्यानंतर माझ्या जीवाला धोका निर्माण झाला आहे. कारवाईच्यादिवशी मी ग्रीन गेटजवळ गेलो होतो. पण क्रूझवर नव्हतो.

क्रूझवर छापा टाकून एनसीबीनं आर्यन खानला अटक केली. यावेळी एका व्यक्तीनं त्याच्यासोबत फोटो काढला. त्या व्यक्तीचा आणि आर्यन खानचा एक सेल्फीदेखील व्हायरल झाला. मात्र तो आमचा अधिकारी नव्हता, असं एनसीबीनं सांगितलं. मग हा व्यक्ती कोण होता? तो आर्यन खानसोबत काय करत होता? एनसीबीनं याची उत्तरं द्यायला हवीत, असे अनेक सवाल राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी केले. नवाब मलिक यांनी ज्या मनीष भानुशाली यांच्यावर आरोप केले. त्यांनी पहिली प्रतिक्रिया देताना माझ्या जीवाला धोका असून मी क्रूझवर केलेल्या कारवाईवेळी क्रूझवर नव्हतो असं सांगितलं. 

 

तसेच १ तारिखच्या दुपारी माझ्या काही गुप्त माहिती मिळाली. त्यानंतर आपल्या देशाच्या युवा पिढीला कमजोर करणारी ही घटना असल्याने मी ही माहिती एनसीबीला दिली. मी भाजपाचा एक कार्यकर्ता आहे. २ ऑक्टोबरला सकाळी ९ वाजता मी एनसीबी कार्यालयाला गेलो आणि माहिती दिली. त्यावेळी समीर वानखेडे यांनी मला तुम्हाला ही माहिती कशी आणि कोणी दिली असं विचारलं. त्यावर मी माहिती देणाऱ्याचे नाव जर सांगितले तर माझ्या जीवाला धोका होऊ शकतो असं मी सांगितलं. त्यावेळी एनसीबीकडे देखील याबाबत माहिती होती. पण माझ्याकडे थोडी अधिक माहिती होती. मी देशहीतासाठी काम करणारा माणूस म्हणून मी माहिती एनसीबीला दिली अशी प्रतिक्रिया भानुशाली यांनी दिली. माझं नाव पुढं आल्यानंतर माझ्या जीवाला धोका निर्माण झाला आहे. कारवाईच्यादिवशी मी ग्रीन गेटजवळ गेलो होतो. पण क्रूझवर नव्हतो. एवढी लोक पकडली जातील अस वाटलं नव्हती म्हणून गरजेनुसार मदत केली. गाड्या देखील कमी पडल्या होत्या. मला देखील माझा जबाब नोंदवण्यासाठी एनसीबी कार्यालयात जायचं होतं. दरम्यान एनसीबीच्या अधिकाऱ्यांनी आमच्या गाड्यांचीही आरोपींना एनसीबी कार्यालयात नेण्यासाठी मदत घेतली. मी आरोपींना आणताना मदत केली हे सत्य आहे.

टॅग्स :Drugsअमली पदार्थMumbaiमुंबईNCBनार्कोटिक्स कंट्रोल ब्यूरोBJPभाजपा