शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
2
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
3
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
4
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
5
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
6
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
7
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
8
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
9
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
10
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
11
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
12
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
13
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
14
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
15
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
16
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
17
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
18
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
19
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
20
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
Daily Top 2Weekly Top 5

खळबळजनक..! शीतपेयात दारू मिसळून विवाहितेवर सामूहिक बलात्कार 

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 10, 2019 21:20 IST

लग्नाच्या वाढदिवसाचा स्वयंपाक करण्याच्या बहाण्याने विवाहितेला बोलावून तिच्यावर सॉफ्ट ड्रिंकमध्ये दारू मिसळून सामूहिक बलात्कार केल्याची खळबळजनक प्रकार समोर आला आहे.

ठळक मुद्देबारामती शहर परिसरातील घटना : अनोळखी युवकासह पाच जणांवर गुन्हा दाखल 

बारामती : लग्नाच्या वाढदिवसाचा स्वयंपाक करण्याच्या बहाण्याने विवाहितेला बोलावून तिच्यावर सॉफ्ट ड्रिंकमध्ये दारू मिसळून सामूहिक बलात्कार केल्याची खळबळजनक प्रकार समोर आला आहे. ही घटना बारामती शहरातील तांदुळवाडी परिसरात घडली आहे. या करणी बारामती तालुक्यातील बागायती गावात राहणाऱ्या ३४ वर्षीय पीडित विवाहितेने पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार याप्रकरणी एका युवकासह पाच जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या प्रकरणी रेश्मा अमोल भुजबळ, अमोल बबन भुजबळ, चेतन मोरे (पूर्ण नाव माहिती नाही), काका जोगदंड (पूर्ण नाव माहिती नाही), व ३० ते ३५ वर्षे वयोगटातील अनोळखी व्यक्तीविरुद्ध फिर्याद दिली असून, त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  पीडित महिला ही तालुक्यातील बागायती गावात पती आणि दोन मुलींसह वास्तव्यास आहे. बुधवारी (दि. ८) सायंकाळी ६ च्या सुमारास पीडितेची मैत्रीण रेश्मा अमोल भुजबळ (रा. तांदूळवाडी) हिने तिला फोन करून लग्नाचा वाढदिवस असल्याने जेवण बनविण्यासाठी ये, जाताना जेवण करून जा, असे सांगून बोलाविले. त्यावर पीडित महिला तांदूळवाडी परिसरातील भुजबळ याच्या घरी रात्री साडेसात वाजता गेली. तिने रेश्माला शुभेच्छा दिल्या. त्यावर त्यांनी या कार्यक्रमात जेवण द्यायचे आहे, तू स्वयंपाक करण्यास मदत कर, असे सांगितले. पीडित महिला आतील खोलीत गेल्यावर तेथे इतर बायका स्वयंपाक करत होत्या. त्यानंतर सर्वांनी जेवण केले. त्यानंतर पीडिता घरी जाण्यास निघाली. यावर रेश्माने, रात्र भरपूर झाली, तू घरी जाऊ नकोस, असे म्हणून तिचा पती अमोल बबन भुजबळ यांनी मिळून तिला शीतपेय पिण्यासाठी दिले. शीतपेय पीत असताना त्याची चव कडवट लागल्याने त्या दोघांना याबाबत तिने विचारणा केली. यावर या दांपत्याने आमच्या लग्नाचा वाढदिवस असल्याने  शीतपेयात दारू टाकल्याचे सांगून काही होत नाही, तू ते पी  आणि इथेच झोप, असे सांगितले आणि ते तिला जबरदस्तीने प्यायला लावले. त्यानंतर थोड्याच वेळात चक्कर येऊ लागल्याने त्या दांपत्याने त्यांच्या घरातील एका रूममध्ये पीडितेला झोपविले. दुसºया दिवशी गुरुवारी (दि. ९ मे ) पहाटे साडेपाचच्या सुमारास पीडितेला जाग आली. त्यानंतर महिलेवर सामूहिक अत्याचार झाला असल्याचे जाणवले. पीडित महिलेवर रुग्णालयात उपचार सुरू आहे. उपविभागीय पोलीस अधिकारी नारायण शिरगावकर अधिक तपास करत आहेत.

टॅग्स :BaramatiबारामतीRapeबलात्कारPoliceपोलिसWomenमहिलाhospitalहॉस्पिटल