शहरं
Join us  
Trending Stories
1
'ऑपरेशन सिंदूरदरम्यान काँग्रेस पाकिस्तानी सैन्याच्या बाजूने होती', पंतप्रधान मोदींचा हल्लाबोल
2
"मी शिव भक्त, सर्व विष गिळून टाकतो...", पंतप्रधान मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल; म्हणाले...
3
Video - अग्निकल्लोळ! गुजरातच्या संघवी ऑर्गेनिक्स फॅक्ट्रीमध्ये भीषण आग, धुराचं साम्राज्य
4
टीम इंडियाला धक्का! पाकिस्तानविरूद्धच्या सामन्याआधी शुबमन गिलच्या हाताला दुखापत, अपडेट काय?
5
Sushila Karki: 'आम्ही सत्तेचा आस्वाद घेण्यासाठी आलेलो नाही, ६ महिन्यांतच...' पंतप्रधान सुशीला कार्की 'अ‍ॅक्शन मोड'मध्ये!
6
निष्काळजीपणाचा कळस! सरकारी शाळेत मध्यान्ह भोजन खाल्ल्यानंतर ९० मुलं पडली आजारी
7
तुमचे LPG गॅस सिलेंडरचे अनुदान बंद झाले? घरबसल्या मोबाईलवरुन करता येईल सुरू
8
अलर्ट मोड ऑन! फेस्टिव्ह सेलच्या स्वस्ताईला भुलू नका; एक चूक अन् गमवाल आयुष्यभराची कमाई
9
शेतकऱ्यांनो, दिवाळीआधी PM किसानचा २१वा हप्ता येणार का? वाचा कधी जमा होणार पैसे?
10
Mumbai: विरार- दादर लोकलच्या दरवाज्यात मनोरूग्णाचा धुडगूस, महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्‍न ऐरणीवर
11
GST कपातीनंतर ५, १०, २० रुपयांच्या बिस्किट, चिप्सची किंमतही घटणार की…?, कंपन्यांनी दिली अशी माहिती  
12
लोकप्रिय 'दामिनी' मालिका पुन्हा येतेय प्रेक्षकांच्या भेटीला, ही अभिनेत्री मुख्य भूमिकेत, या चॅनेलवर होणार प्रसारण
13
चालकाचं नियंत्रण सुटलं अन् कार थेट उड्डाणपुलावरून खाली रेल्वे रुळावर पडली!
14
निम्न तेरणा प्रकल्पातून ७६३६ क्युसेक पाण्याचा विसर्ग, नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा
15
'चुल्लूभर पानी में डूब मरो...' भारत-पाकिस्तान क्रिकेट सामन्यावरून ओवैसी भाजपवर संतापले!
16
नफा वाढूनही फ्लिपकार्टला ५,१८९ कोटी रुपयांचा तोटा! एक निर्णय कंपनीच्या अंगलट?
17
खूशखबर! Instagram ची मोठी घोषणा; आता पटापट वाढेल रीच, पोस्ट करा अनलिमिटेड स्टोरी
18
‘सॉरी... आम्ही हे जग सोडतोय’, CA च्या पत्नीनं मुलासह १३ व्या मजल्यावरून मारली उडी, समोर आलं धक्कादायक कारण
19
पंजाब की शेरनी! चालत्या ऑटोमध्ये चोरांशी लढली, जीव धोक्यात घालून मदत मागितली अन्...
20
Pakistan: पाकिस्तानात दहशतवाद्यांच्या हल्ल्यात १९ सैनिकांचा मृत्यू; ४५ दहशतवाद्यांचा खात्मा

डी गँग आता टॉलिवूडमध्ये! एनआयएने केला पर्दाफाश

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 16, 2023 05:55 IST

छोटा शकीलशी कनेक्शन?

आशिष सिंह

लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : बॉलिवूडला मागे टाकत टॉलिवूडची उलाढाल वाढताच अंडरवर्ल्डने तेथेही पाय रोवले असून आपल्या नात्यातील आणि मर्जीतील अभिनेते, अभिनेत्रींमार्फत मोठया प्रमाणात पैशांची गुंतवणूक केल्याचे राष्ट्रीय तपास यंत्रणेला (एनआयए) आढळून आले आहे. छोटा शकीलने आपल्या कुटुंबीयांमार्फत ही उलाढाल केली असून त्यांना यासाठी नेमकी कोणी, कशी मदत केली त्याचा पर्दाफाश सुरू केला आहे.

मल्याळी, तेलुगू, तमीळ, कन्नड यासारख्या दाक्षिणात्य भाषांतील चित्रपटांची नगरी टॉलिवूड नावाने ओळखली जाते. तिची उलाढाल अब्जावधींच्या घरात आहे. हिंदीत डब केलेले या भाषांतील सिनेमे तिकीटबारीवर प्रचंड कमाई करत आहेत. त्यामुळे आता अंडरवर्ल्ड डॉन दाऊन इब्राहिमने आपला मोर्चा टॉलिवूडकडे वळविल्याचे समोर आले आहे. डी राँगने टॉलिवूडमध्ये आपले वस्तानही वसविल्याचा सुगावा राष्ट्रीय तपास यंत्रणेला लागताच त्यांनी तपास केला आणि त्यातून पैशांच्या उलाढाली सोबतच टॉलिवूडमधील अनेक बड़े कलाकारांचा डी गंगशी संबंध असल्याचे समोर आले.

त्यामुळे डी कंपनीशी संबंधित अनेक गोष्टींचा तपास एनआयएने केला. या ऑपरेशनमधून अनेक बाबी उपड झाल्या. छोटा शकीलच्या कुटुंबातील एक अभिनेत्री सध्या टॉलिवूडमध्ये नवीन ओळख तयार करून काम करत आहे.

विशेष म्हणजे छोटा शकीलची आवडती अभिनेत्री असलेल्या मुमताजच्या नावाचा वापर करून ती टॉलिवूडमध्ये प्रसिद्धीही मिळवत आहे. इतकेच नाही, तर गेल्या वर्षी फेब्रुवारीत तिच्या बँक खात्यात छोटा शकीलच्या कुटुंबाकडून लाखो रुपयांचा व्यवहार झाल्याची धक्कादायक बाबही एनआयएच्या निदर्शनास आली आहे.

छोटा शकीलशी कनेक्शन?

डी कंपनीतील छोटा शकीलचा मेहुणा आणि सध्या अटकेत असलेला शेख ऊर्फ आरिफ भाईजान याच्या दुसया पलींच्या मुलीने चेन्नईतून टॉलिवूडमधून करिअरला सुरुवात केली. तिच्याबद्दल फारसे कुणालाच माहीत नव्हते. तिला मुमताजच्या नावाचा वापर करून टॉलिवूडमध्ये ब्रेक मिळाला. त्यानंतर तिने मागे वळून पाहिले नाही, टॉलिवूडच्या अनेक हीट चित्रपटांत काम करून ती प्रसिद्ध अभिनेत्री बनली. २०२२ च्या फेब्रुवारी-मार्चमध्ये तिच्या खात्यात आधी सहा लाख आणि नंतर चार लाख असे १० लाख रुपये टाकण्यात आले होते.

टॅग्स :Chhota Shakeelछोटा शकील