शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

सायबर फसवणुकीचा क्लास, फी १ लाख! बेरोजगार युवकांना ओढले जाळ्यात, २०० जण ताब्यात

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 1, 2023 06:23 IST

सायबर फसवणुकीचे प्रशिक्षण देणाऱ्या क्लासेसनी अभ्यासक्रम ठरवण्याबरोबरच गणवेशही निश्चित केला आहे.

चंडीगड - सायबर फसवणुकीचे हरयाणात चक्क प्रशिक्षणच दिले जात असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. याचा क्लास उघडला असून, त्यासाठी ४० हजार ते १ लाख रुपयांपर्यंत फी वसूल केली जात आहे. नूंह जिल्ह्यात पकडलेल्या २०० सायबर ठकांची चौकशी सुरू असून, त्यातून ही माहिती बाहेर येत आहे. मेवात परिसरामध्ये घेतल्या जात असलेल्या कोचिंग सेंटरवर आता पोलिसांची नजर आहे.

सायबर फसवणुकीचे प्रशिक्षण देणाऱ्या क्लासेसनी अभ्यासक्रम ठरवण्याबरोबरच गणवेशही निश्चित केला आहे. विशेष म्हणजे अवैध कामांसाठी चालवले जात असलेले प्रशिक्षण ऑनलाइनही देण्याची व्यवस्था केली आहे. प्रशिक्षणासाठी प्रवेश घेण्यापूर्वी युवकांना प्रश्नोत्तराच्या मोठ्या प्रक्रियेतून जावे लागते. तुम्ही काम का करू इच्छिता, असे प्रश्न विचारले जातात. प्रशिक्षण घेणारे बहुतांश युवक बेरोजगार आहेत. पोलिस आता या प्रशिक्षण केंद्रांचा पर्दाफाश करण्याच्या तयारीत आहेत. नूंहमध्ये अलीकडेच ५००० पेक्षा जास्त पोलिसांनी एकाचवेळी १४ गावांत ३०० ठिकाणी छापेमारी केली.  

इतर राज्यांत लागेबांधे? पोलिस अधीक्षक वरुण सिंगला यांनी सांगितले की, सायबर फसवणुकीचे प्रशिक्षण घेण्यासाठी युवकांकडे त्यांचा स्वत:चा लॅपटॉप व एखाद्या कॉल सेंटरमधील कामाचा अनुभव क्लासवाल्यांनी आवश्यक केलेला आहे. अटक केलेल्या युवकांच्या सिम कार्डमधून मिळालेली माहिती भारतीय सायबर क्राईम समन्वय केंद्राला पाठवण्यात आली आहे. या फसवणुकीचा इतर राज्यांतही काही लागेबांधे आहेत का, याची माहिती घेतली जात आहे.

अनेक जण गायब ४७ जणांना अटक केली होती व १६० जणांना ताब्यात घेतले होते. छापेमारीनंतर अटकेपासून बचाव करण्यासाठी अनेक युवक शेजारी जिल्ह्यांतील आपल्या नातेवाइकांकडे गेले आहेत.

टॅग्स :cyber crimeसायबर क्राइम