शहरं
Join us  
Trending Stories
1
युतीबाबत एक पाऊल पुढे! शिवतीर्थावर उद्धव-राज यांच्यात अडीच तास चर्चा, बंधुऐक्याची ‘फ्रेम’ ठरली 
2
Maratha Reservation: हैदराबाद गॅझेटियर अधिसूचनेला मुंबई उच्च न्यायालयात आव्हान; काय आहे याचिकेत?
3
सोने-चांदीने गुंतवणूकदार मालामाल, गेल्या एका वर्षात मिळाले सोन्यातून ४४ तर चांदीतून ४५ टक्के रिटर्न
4
अग्रलेख: राधाकृष्णन आता देशाचे! नव्या उपराष्ट्रपतींनी हे लक्षात ठेवायला हवेच
5
विम्याचा हप्ता दहा वर्षांत दुप्पट! कंपन्यांकडून ग्राहकांची लूट; भीती दाखवून प्रीमियमवाढ
6
Maratha Reservation: राज्यात आजपर्यंत दिलेल्या कुणबी प्रमाणपत्रांची श्वेतपत्रिका काढावी; ओबीसी मंत्रिमंडळ उपसमितीची भूमिका
7
विशेष लेख: एका परिवर्तनशील, सहृदय नेतृत्वाचा अमृतमहोत्सव
8
नेपाळमध्ये देशभरात संचारबंदी लागू; महाराष्ट्रातील १०० पर्यटकांसह शेकडो प्रवासी अडकले 
9
भारत-अमेरिका यांच्यात चर्चेची दारे खुली होणार; पंतप्रधान मोदी म्हणाले, "ट्रम्प यांच्याशी..."
10
नेपाळनंतर फ्रान्समध्येही जनतेचा उद्रेक; २५० निदर्शकांना अटक 
11
Asia Cup 2025 : बुमराहच्या परफेक्ट यॉर्करशिवाय ही गोष्ट ठरली लक्षवेधी; कारण ६ वर्षांनी असं घडलं
12
सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान; बालेंद्र शाहांचा पाठिंबा, आंदोलकांना केले आवाहन...
13
नागपुरातील कडबी चौकाजवळ भर रस्त्यावर व्यापाऱ्यावर गोळीबार, ५० लाखांची लूट
14
IND vs UAE : अभिषेकनं षटकारासह उघडलं खातं! गिलनं खणखणीत चौकार मारत पॉवरप्लेमध्ये संपवली मॅच
15
रुमाल पडला; तो क्रीजमध्ये यायला विसरला! सूंजचा डायरेक्ट थ्रो; पण Out बॅटरला सूर्यानं दिलं Not Out
16
'तुमचा वापर केला जातोय...', नेपाळमधील सत्तापालटानंतर केपी शर्मा ओलींची पहिली प्रतिक्रिया
17
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल कोण? सीपी राधाकृष्णन राजीनामा देणार; १२ सप्टेंबरला उपराष्ट्रपतीपदाची शपथ घेण्याची शक्यता
18
शोरुममधून बाहेर पडताच नवीन कारचा अपघात झाला तर विमा मिळतो का? जाणून घ्या...
19
दात घासताना ८० वर्षीय वृद्धाच्या अन्ननलिकेत झाडाची काडी अडकली; ७ दिवस उपाशी राहिले अन्...
20
नेपाळमधील सत्तापालटावर चीनची पहिली प्रतिक्रिया; माजी पंतप्रधान ओलींचं नाव घेणं टाळलं!

अ‍ॅपद्वारे सायबर गुन्हेगारांनी ८७ लाख लोकांना ४५७२ कोटी रुपयांना लावला चुना 

By पूनम अपराज | Updated: March 3, 2021 18:51 IST

Cyber Crime : इतकेच नाही तर एका अ‍ॅपने ८७.१५ लाख लोकांकडून ४५७२ कोटी रुपये वसूल केले आहेत. यावरून अंदाज बांधता येतो की, किती भारतीयांची या फसव्या अ‍ॅप्सने फसवणूक केली असावी.

ठळक मुद्दे चिनी सर्व्हरवरून हॅक झालेल्या २.१८ जीबी डेटाच्या फाईलमधून ही माहिती प्राप्त झाली.

लोन अ‍ॅप्समुळे आत्महत्या. आरबीआयच्या लोन अ‍ॅप्सकडून कर्ज न घेण्याच्या जाहिराती. प्ले स्टोअरमध्ये अशा प्रकारच्या शेकडो अ‍ॅप्स हटविण्याच्या अधिसूचना. हे सर्व केले गेले आहे, परंतु ऑनलाइन फसवणूक सुरूच आहे. अ‍ॅप स्टोअरवर सुमारे १५० लोन अ‍ॅप्स उपलब्ध आहेत. त्यांच्या जाहिराती ओटीटी सिरीजच्या मध्येच येत आहेत.हे अ‍ॅप्स केवळ लोकांकडूनच मोठ्या प्रमाणात वसुलीच करत नाहीत तर ते त्यांची संपूर्ण माहिती चिनी सर्व्हरकडे पाठवित आहेत, जी बेकायदेशीर आहे आणि देशासाठी धोकादायक आहे. इतकेच नाही तर एका अ‍ॅपने ८७.१५ लाख लोकांकडून ४५७२ कोटी रुपये वसूल केले आहेत. यावरून अंदाज बांधता येतो की, किती भारतीयांची या फसव्या अ‍ॅप्सने फसवणूक केली असावी.या अ‍ॅपवर ५०० ते ८० हजार रुपयांपर्यंतचे ८० लाखाहून अधिक व्यवहार आहेत. चिनी सर्व्हरवरून हॅक झालेल्या २.१८ जीबी डेटाच्या फाईलमधून ही माहिती प्राप्त झाली. दै. भास्करने सायबर सुरक्षा संशोधक राजशेखर राजरिया यांच्या सहकार्याने ही फाईल मिळविली आहे. नुकतीच आरबीआयच्या सूचनेनुसार  स्टोअरमधून अ‍ॅप आणि ५०० अ‍ॅपवर बंदी घातली गेली.अ‍ॅपची नावे आकर्षक ठेवली जातात10 मिनटलोन, कॅशगुरू, रूपीक्लिक, फाइनेंसबुद्धा, स्नेपइट लोन, होप लोन, क्विकरूपी, फ्लाईकॅश, मनी बॉक्स, मास्टरमेलन, क्विक कॅश, रुफीलो, क्रेडिटजी, रुपी होमदै. भास्करने उघडकीस आणले

१ लाख ६८ हजारात १६६ पानांची ही एक स्लाइड आवडली असून ५०० ते ८० हजार रुपयांदरम्यान लुटीचे ८० लाखाहून अधिक ट्रॅन्जेक्शन.८० टक्के पीडित लोक मोबाईल बंद करतातदै. भास्करने अ‍ॅप डेटामध्ये उपलब्ध असलेल्या ५० नंबरवर कॉल केले, तेव्हा असे आढळले की ८० टक्के लोकांनी त्यांचा नंबर बंद केला आहे. अ‍ॅप्स कंपन्यांच्या छळामुळे त्रस्त झालेल्यांनी असे केले.तरुणीने लग्न देखील या फोनमुळे मोडले 

कपिलने (नाव बदलले आहे) सांगितले की, त्याच्या बहिणीने अ‍ॅपमधून कर्ज घेतले, त्याबाबत सांगितले देखील नाही. ब्लॅकमेलिंग सुरू केल्यावर याबाबत माहिती उघड झाली. महिनाभरापूर्वीच तिचे लग्न झाले. तोपर्यंत कर्ज देणाऱ्यांनी प्रियाच्या सासरच्यांना मेसेजेस आणि फोटो पाठविणे सुरू केले होते. त्याचा परिणाम असा झाला की, तिचे लग्न संसार मांडण्याआधी मोडले.लोकेशन ट्रेस करून ठार मारण्याची धमकी दिलीउदयपूरच्या राहुल मेघवाल यांच्या मोबाइलवरून अॅपने संपर्क, फोटो इत्यादी चोरून घेतले आणि वसुलीसाठी शिव्यागाळ करण्याबरोबरच जिवे ठार मारण्याची धमकी देखील दिली. ते त्याचे लोकेशन ट्रेस करण्याबाबत दावाही करीत होते. त्यानंतर राहुलने गुन्हा दाखल केला. तथापि, या नंतरही धमक्या मिळत आहेत.

नातेवाईक आणि मित्रांकडूनसुद्धा वसुली सुरू झाली

हावडा जिल्ह्यातील  स्नेहाशीष   मंडळाने ३ हजारांचे कर्ज घेतले. फक्त 2200 रुपये कर्ज स्वरूपात मिळाले. मात्र, वसुलीचे 4200 रुपये होते. अजूनही कर्ज संपलेले नाही. वसुलीसाठी एजंटांनी त्रास देणे सुरू केले. यासाठी मित्र व नातेवाईकांचा संपर्क क्रमांक मंडळाच्या मोबाइलवरून चोरी केले होते. या संपर्क क्रमांकावर मित्र आणि नातेवाईकांना धमकावणे व शिवीगाळ करण्यास सुरवात केली.आतापर्यंत ३ डझन लोकांना मदर केलेली व्यक्ती आत्महत्या करणार होती

स्नेहा (गांधीनगर) कित्येक महिन्यांपासून ऑनलाइन सावकारांविरूद्ध कायदेशीर लढाई लढत आहे. बरेच पीडित त्यांच्याशी जोडलेले आहेत. यापूर्वी तिने स्वत: आत्महत्येचा प्रयत्न केला होता. वास्तविक, लॉकडाऊन दरम्यान तिने तीन अ‍ॅप्सवर 11,500 रुपयांच्या कर्जासाठी अर्ज केला. पहिल्यावेळी 3500 कर्जाऐवजी 2000, दुसऱ्यांदा 5000 कर्जाऐवजी  3525  आणि तिसर्‍या वेळी 3000 कर्जाऐवजी 3000 रुपये देण्यात आले.7325 रुपये खात्यात आले. उर्वरित रक्कम फाइल शुल्क किंवा प्रक्रिया शुल्क म्हणून वजा करण्यात आली. गरज लक्षात घेऊन त्या काहीही बोलल्या नाही आणि कर्ज परतफेड केले. पण नंतर मोबाईल कॉल, व्हॉट्सअ‍ॅप, मेसेंजरवर शिवीगाळ केली गेली. 

थोड्या थोड्या अवधीनंतर हा प्रकार घडत होता. त्यानंतर कुटुंब, ओळखीचे, मित्र किंवा नातेवाईकांच्या मोबाइलवर धमक्या येऊ लागल्या. अगदी फोनबुक नंबरचा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप बनवून त्याने स्नेहाला चोर म्हणायला सुरवात केली. त्यामुळे तिने आत्महत्येचा विचार करण्यास सुरवात केली. पण त्यानंतर सायबर तज्ञाला नवीन मार्ग सापडला. पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केल्यानंतर पोलिसांच्या सतत मदतीने बळ मिळाल्याने इतरांना मदत करण्याचा निर्णय घेतला. आतापर्यंत सुमारे तीन डझन पीडितांच्या मदतीने स्नेहाने गुन्हा दाखल केला आहे. कर्नाटकात त्यांच्यामुळे चार जणांना अटक करण्यात आली आहे.

टॅग्स :cyber crimeसायबर क्राइमMobileमोबाइलChinese Appsचिनी ऍपfraudधोकेबाजीPoliceपोलिस