शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

सायबर गुन्हेगारांच्या गळाला लागून नफ्याच्या आमिषाने पनवेलमधील वृद्धाला ५२ लाखांचा गंडा

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 6, 2025 12:52 IST

सदर व्यक्तीने त्यांना व्हाॅट्सॲप ग्रुपमध्ये घेऊन त्या ठिकाणी इतरांना होणारा आभासी नफा दाखवला

लोकमत न्यूज नेटवर्क

पनवेल, नवी मुंबई : शेअर ट्रेडिंगचा अनुभव असतानाही सायबर गुन्हेगारांच्या गळाला लागून वृद्धाने ५२ लाख रुपये गमावल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी सायबर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पनवेल परिसरात राहणाऱ्या ६२ वर्षीय व्यक्तीसोबत हा प्रकार घडला आहे.

सप्टेंबर २०२४ मध्ये त्यांना पहिल्यांदा अज्ञात व्यक्तीने शेअर मार्केटमध्ये पैसे गुंतवण्यास सांगितले असता त्यांनी नकार दिला होता. मात्र त्यानंतरही सदर व्यक्तीने त्यांना व्हाॅट्सॲप ग्रुपमध्ये घेऊन त्या ठिकाणी इतरांना होणारा आभासी नफा दाखवला. त्यामुळे पुढील काही दिवसांत टप्प्याटप्प्याने त्यांनी ५२ लाख ७५ हजार रुपये भरले. त्यापैकी ७५ हजार रुपये त्यांना अधूनमधून गळाला लावण्यासाठी नफ्याच्या स्वरूपात परत दिले.  त्यांनी गुंतवणूक थांबवली असता टॅक्स किंवा इतर कारणांनी अधिक पैशाची मागणी होऊ लागली आणि त्यांची फसवणूक झाली. 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी