शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
6
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
7
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
8
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
9
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
10
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
11
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
12
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
13
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
14
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
15
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
16
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
17
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
18
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
19
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
20
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

सायबर गुन्हेगारांचा नागपुरातील दोघांना गंडा : रोकड लंपास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 16, 2020 00:16 IST

सायबर गुन्हेगारांनी नागपुरातील एका वृद्धासह दोघांना थाप मारून त्यांच्या खात्यातून रक्कम काढून घेतली. अजनी आणि नंदनवन पोलीस ठाण्यात या संबंधाने वेगवेगळे गुन्हे दाखल झाले आहेत.

ठळक मुद्देअजनी आणि नंदनवन ठाण्यात गुन्हा दाखल

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : सायबर गुन्हेगारांनी नागपुरातील एका वृद्धासह दोघांना थाप मारून त्यांच्या खात्यातून रक्कम काढून घेतली. अजनी आणि नंदनवन पोलीस ठाण्यात या संबंधाने वेगवेगळे गुन्हे दाखल झाले आहेत.अजनीच्या हनुमाननगरात राहणारे राजेशकुमार गुरुदासराम ओवानहरी (वय ६५) हे २४ जानेवारीला सकाळी त्यांच्या घरी असताना त्यांच्या मोबाईलवर ८१०१४३२३८८ क्रमांकावरून फोन आला. पेटीएममधून बोलतो, असे सांगून सायबर गुन्हेगाराने केवायसी पूर्ण करण्यासाठी सपोर्ट अ‍ॅप डाऊनलोड करण्यास सांगितले. त्याद्वारे ५ रुपये जमा करा, असेही म्हटले. केवळ पाच रुपये जमा करायचे आहेत, असे समजून ओवानहरी यांनी आरोपीने पाठविलेले अ‍ॅप डाउनलोड करून क्रेडिट कार्डच्या माध्यमातून ५ रुपये जमा केले. काही वेळेतच त्यांच्या मोबाईलवर एक मेसेज आला. त्यात ओवानहरी यांच्या खात्यातून १ लाख, ८८ हजार, ५०० रुपये काढून घेण्यात आल्याचे नमूद होते. आरोपीने चारवेळा व्यवहार (ट्रान्जॅक्शन) करून रक्कम काढली होती. फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर ओवानहरी यांनी सायबर शाखेत तक्रार नोंदवली. तेथून तपास झाल्यानंतर अजनी पोलिसांकडे हे प्रकरण पाठविण्यात आले. अजनी पोलिसांनी शुक्रवारी या प्रकरणी फसवणुकीचा गुन्हा दाखल केला.परस्पर रक्कम काढून घेतलीरितूराज दामोधर मोरे (वय ४८, रा. निर्मलनगरी, नंदनवन) यांच्या खात्यातून अज्ञात आरोपीने ३० जानेवारी ते १३ फेब्रुवारी २०२० च्या दरम्यान ६१ हजार रुपये परस्पर काढून घेतले. हा गैरप्रकार लक्षात आल्यानंतर मोरे यांनी नंदनवन ठाण्यात तक्रार नोंदवली. पोलिसांनी फसवणुकीचा गुन्हा दाखल केला. आरोपीचा शोध घेतला जात आहे.

टॅग्स :cyber crimeसायबर क्राइमnagpurनागपूर