शहरं
Join us  
Trending Stories
1
अचानक राजीनामा दिल्यानंतर, काय करतायत जगदीप धनखड? पत्नी वारंवार का जात आहे राजस्थानला?
2
पंजाबमध्ये पुरामुळे कहर, नवोदय विद्यालयात ४०० मुले आणि शाळेतील कर्मचारी अडकले; पालक प्रशासनावर संतापले
3
"खू्प कर्ज झालंय..."; सचिन-शिवानीने आधी चार वर्षाच्या मुलाला विष दिलं अन् स्वतःला संपवलं; चिठ्ठीत काय?
4
युतीचा श्रीगणेशा! उद्धव ठाकरे सहकुटुंब राज ठाकरेंच्या 'शिवतीर्थ'वर दाखल; गणपतीचं घेतले दर्शन
5
भारतावर 50% टॅरिफ लावून ट्रम्प यांनी स्वतःच्याच पायावर कुऱ्हाड मारली, आता लागणार अमेरिकेची 'लंका'! आला असा अहवाल
6
R Ashwin: आर. अश्विन आयपीएलमधून निवृत्त, फक्त विदेशी क्रिकेट लीगमध्ये खेळणार!
7
ऑनलाईन App वरुन ऑर्डर केलं जेवण अन् डिलिव्हरी बॉयच्याच पडली प्रेमात, आता केलं लग्न
8
अष्टविनायक चित्रपटातील साधीभोळी गणेशभक्त वीणा आता दिसते अशी, अनेक वर्षे होती चित्रपटांपासून दूर
9
"सूनेने गोळी मारून हत्या केली, माझा मुलगा रक्ताच्या थारोळ्यात पडलेला होता"; तीन महिन्यातच पतीची हत्या
10
अर्चनानंतर आता श्रद्धा तिवारी गायब...; कुटुंबानं मुलीचा उलटा फोटो दरवाजाच्या चौकटीला लावला
11
खळबळजनक! कॉन्स्टेबलने कुटुंबीयांच्या मदतीने पत्नीला जिवंत जाळलं, प्रकृती गंभीर
12
ChatGPT ने मुलाला आयुष्य संपवण्याचे ट्यूशन दिले, पालकांनी न्यायालयात सगळीच माहिती सांगितली
13
मुंबईच्या दिशेने मराठा मोर्चा: "शांततेचं आंदोलन कुणीच रोखू शकत नाही," मनोज जरांगेंचा निर्धार
14
"लोक ओरडत होते, मी दगड पडताना पाहिले, मला..."; वैष्णोदेवी मार्गावर नेमकं काय घडलं?
15
३६ दिवस डिजिटल अरेस्ट; सायबर ठगांनी निवृत्त एअरफोर्स अधिकाऱ्याकडून ३.२२ कोटी लुटले...
16
बाप्पाला आणताना, नेताना, पूजा करताना मूर्तीचा भाग 'दुभंगला' तर अशुभ? धर्मशास्त्र सांगते... 
17
गणेशोत्सवानिमित्त सांस्कृतिक कार्य विभागाच्या वतीने रील स्पर्धेचे आयोजन, प्रथम क्रमांकाला एक लाखांचे बक्षीस
18
बिहारमध्ये मंत्री श्रवण कुमार यांच्यावर जीवघेणा हल्ला; अनेक किलोमीटर पाठलाग, बॉडीगार्ड जखमी
19
भारतासमोर 'ट्रम्प'नीती अयशस्वी; मोदी फोन न उचलण्याचं कारण काय, अमेरिकन एक्सपर्ट सांगतात..
20
वैष्णोदेवी भूस्खलनात आतापर्यंत ३० मृत्युची नोंद; बचावकार्य सुरू, मृतांची संख्या वाढण्याची शक्यता

नागपुरात सायबर गुन्हेगाराकडून विद्यार्थ्याची फसवणूक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 22, 2020 23:37 IST

अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यासोबत २० हजारांत अ‍ॅक्टिव्हा विकत देण्याचा ऑनलाईन सौदा करून सायबर गुन्हेगाराने त्याच्याकडून ८३,५८० रुपये उकळले.

ठळक मुद्दे२० हजारांत अ‍ॅक्टिव्हा विकत देण्याचा सौदा : ८४ हजार हडपूनही दुचाकी दिलीच नाही

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यासोबत २० हजारांत अ‍ॅक्टिव्हा विकत देण्याचा ऑनलाईन सौदा करून सायबर गुन्हेगाराने त्याच्याकडून ८३,५८० रुपये उकळले. नवीन दुचाकीच्या किमतीएवढी रक्कम हडपूनही आरोपीने त्याला दुचाकी दिलीच नाही. उलट पुन्हा पुन्हा त्याला आपल्या खात्यात रक्कम जमा करण्यास सांगून रडकुंडीला आणले. एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडलेल्या या घटनेचा गुन्हा चार महिन्यानंतर पोलिसांकडे दाखल झाला.सुमनराज राजअन्ना अंकारी (वय २२) हा भोपाळ येथील रहिवासी असून तो प्रियदर्शिनी अभियांत्रिकी महाविद्यालयात शिकतो. सुमनराज हिंगण्याला भाड्याच्या खोलीत राहतो. महाविद्यालयात जाण्यासाठी त्याला दुचाकीची गरज असल्याने तो ओएलएक्सवर दुचाकी शोधत होता. २८ ऑक्टोबर २०१९ ला रात्री त्याला आशिष खंडेलवाल (नागपूर) नामक व्यक्तीची अ‍ॅक्टिव्हा २० हजारात विकायची आहे, असे दिसले. तेथे नमूद कथित खंडेलवालच्या ६२६५ ८४९४०८ क्रमांकावर सुमनराजने संपर्क केला. त्यावेळी आरोपीने त्याला आपण आर्मीत असून एअरपोर्टवर सेवारत असल्याचे सांगितले. २० हजारात अ‍ॅक्टिव्हाचा सौदा केल्यानंतर आरोपीने सुमनराजला आधी आर्मी ट्रान्सपोर्ट पेटीएम ९१८४२ ६८९१३८३ हा खातेक्रमांक देऊन त्यात १ हजार रुपये जमा करण्यास सांगितले. त्यानंतर सुमनराजला २९ ऑक्टोबरला मंगलमूर्ती चौकात बोलविले. ठरल्यावेळेप्रमाणे सुमनराज तेथे गेला मात्र कथित आरोपी खंडेलवाल बराच वेळ होऊनही तेथे आला नाही. त्यामुळे सुमनराजने त्याला फोन केला. एअरपोर्टमधून वाहन बाहेर काढण्यासाठी २०२० रुपये जमा करावे लागतील, असे सांगून ते गुगल पे मार्फत स्वत:च्या खात्यात भरण्यास सुमनराजला बाध्य केले. ही रक्कम जमा केल्यानंतर आरोपीने ९०९८४ ६९८१४ हा मोबाईल क्रमांक प्रवीणकुमार याचा आहे, असे सांगून त्याच्याशी बोलण्यास सांगितले. आरोपी प्रवीणकुमारने २० हजार रुपये जमा केल्याशिवाय गाडी मिळणार नाही, असे सांगितले. आधीच ३०२० रुपये जमा केल्यामुळे सुमनराजने आरोपीने सांगितल्याप्रमाणे पुन्हा ९१८४२ ६८९१३८३ क्रमांकाच्या खात्यात पुन्हा गुगल पे मार्फत १७ हजार रुपये जमा केले.त्यानंतरही आरोपींनी सुमनराजला वेगवेगळे कारण सांगून एकूण ८३, ५८० रुपये जमा करण्यास बाध्य केले. अवघ्या २० हजारात दुचाकीचा सौदा करणारे आरोपी ८३, ५८० रुपये घेऊनही पुन्हा पुन्हा रक्कम जमा करण्यास सांगत असल्याने सुमनराज रडकुंडीला आला.रक्कम परत हवी असेल तर पुन्हा रक्कम दे !आरोपींनी नवीन दुचाकीच्या किमतीएवढी रक्कम उकळल्याने, सुमनराजने त्यांना गाडी नको, आपले पैसे परत करा, असे म्हटले. निर्ढावलेल्या आरोपींनी ते परत हवे असेल तर पुन्हा काही रक्कम जमा करावी लागेल, असे सांगितले. त्याने ही बाब मित्रांना सांगितल्यानंतर आरोपीं धोकेबाजी करीत असल्याची बाब पुढे आली. परिणामी सुमनराजने पोलिसांकडे तक्रार नोंदवली. एमआयडीसी पोलिसांनी फसवणुकीचा गुन्हा दाखल केला. पुढील तपास सुरू आहे.

 

टॅग्स :cyber crimeसायबर क्राइमStudentविद्यार्थी