शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

सीआरपीएफ जवानाची गोळ्या घालून हत्या; कावड यात्रेदरम्यान झालेल्या वादाने घेतला जीव

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 2, 2025 16:42 IST

हरियाणामध्ये एका जवानाची गोळ्या घालून हत्या करण्यात आली आहे.

Haryana Crime: हरियाणातील सोनीपतमध्ये केंद्रीय राखीव पोलिस दलाच्या एका जवानाची गोळ्या घालून हत्या करण्यात आली. मंगळावीर रात्री उशिरा मारेकऱ्यांनी त्याला त्याच्या घरातून बाहेर बोलावून गोळ्या घातल्या. क्षुल्लक कारणावरुन आरोपींनी सीआरपीएफ जवानाला गोळ्या घालून ठार केलं. कावड यात्रेवरुन झालेल्या भांडणानंतर आरोपींनी जवानावर गोळीबार केला आणि पळ काढला. त्यानंतर आता पोलिसांनी याप्रकरणातील आरोपींना अटक केली आहे.

हरिद्वारमधील कावड यात्रेदरम्यान झालेल्या भांडणानंतर २८ जुलै रोजी हरियाणाच्या सोनीपत येथे केंद्रीय राखीव पोलिस दलाच्या जवानाची त्याच्या घराबाहेर गोळ्या घालून हत्या करण्यात आली होता. जवान कृष्ण कुमार याच्या हत्येप्रकरणी तीन आरोपींना अटक करण्यात आली. ३० वर्षीय कृष्ण कुमार  एक महिन्याच्या सुट्टीसाठी घरी आले होते. सोमवारी पहाटे घरी परतणाऱ्या कृष्णावर गोळीबार करून दोन्ही संशयित पळून गेले. कावड यात्रेदरम्यान, काही दिवसांपूर्वी गावातील काही तरुणांनी त्याच्याशी वाद घातला होता अशी माहिती पोलिसांनी दिली.

कृष्ण कुमार छत्तीसगडमध्ये सीआरपीएफ ड्युटीवर तैनात होते आणि काही दिवसांपूर्वीच रजेवर घरी आले होते. २५ जुलै रोजी त्यांच्या पत्नीने मुलाला जन्म दिला. या आनंदात ते त्यांच्या कुटुंबाला भेटण्यासाठी आले होते. १७ जुलै रोजी ते घरी आले आणि त्याच्या मित्रांसह हरिद्वारला डाक कावड आणण्यासाठी गेले होते. गावातील आणखी एक गटही कावड आणण्यासाठी गेला होता. २२ जुलै रोजी डाक कावड घेऊन परतत असताना, कृष्णाचा दुसऱ्या गटातील तरुणांशी वाद झाला. 

रुग्णालयातून पत्नीला भेटून परतल्यानंतर ते तीन मित्रांसह गावातील जॉली रोडवर फिरायला गेले. तिथे गावातील दोन तरुण कारमधून आले. भांडणामुळे एका तरुणाने पिस्तूल काढून कृष्णाच्या छातीत गोळी झाडली आणि त्याचा जागीच मृत्यू झाला. कृष्णाच्या मित्रांनी कुटुंबाला घटनेची माहिती दिली. कुटुंबाने आणि पोलिसांना घटनास्थळी पोहोचून कृष्णाला रुग्णालयात आणलं. मात्र तपासणीनंतर डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.

टॅग्स :HaryanaहरयाणाCrime Newsगुन्हेगारी