शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
6
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
7
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
8
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
9
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
10
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
11
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
12
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
13
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
14
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
15
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
16
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
17
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
18
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
19
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
20
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
Daily Top 2Weekly Top 5

ATM घेऊन पळून जात होते चोरटे; तितक्यात झाला भीषण अपघात, ट्रकला जोरदार धडक अन्...

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 14, 2023 17:46 IST

गुन्हेगारांनी स्टेट बँकेचं पैसे असलेलं एटीएम लुटण्याचा प्रयत्न केला.

झारखंडच्या जामतारा जिल्ह्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे, जिथे गुन्हेगारांनी दरोडा टाकण्याचा प्रयत्न केला पण त्यांना त्यांच्या कामात यश मिळालं नाही. हे प्रकरण जिल्ह्यातील करमाटांड पोलीस ठाण्याच्या हद्दीतील कालाझारियाजवळचं आहे. बुधवारी रात्री गुन्हेगारांनी स्टेट बँकेचं पैसे असलेलं एटीएम लुटण्याचा प्रयत्न केला. गुन्हेगारांनी मोठ्या कष्टाने पैशांनी भरलेले एटीएम मशिन उखडून काढलं आणि ते त्यांनी सोबत आणलेल्या बोलेरोमध्ये टाकलं. 

एटीएम गाडीत ठेवलं आणि तेथून पळ काढला. गुन्हेगार तेथून भरधाव वेगाने जात होते. याच दरम्यान, नारायणपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील गोविंदपूर-साहिबगंज महामार्गावरील बांसपहाडी गावाजवळ बोलेरो रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या ट्रकवर आदळली. त्यामुळे वाहनाचं पूर्ण नुकसान झालं. त्याचवेळी घटनास्थळी पकडले जाण्याच्या भीतीने गुन्हेगारांनी एटीएमसह वाहन तिथेच सोडून पळ काढला आहे.

एटीएम लुटल्याची माहिती पोलिसांना मिळताच त्यांनी रात्रीच या प्रकरणाचा तपास सुरू केला. यावेळी त्यांना बांसपहाडी गावाजवळील रामलखन लाईन हॉटेलसमोर बोलेरोचा अपघात झाल्याची माहिती मिळाली. पोलीस घटनास्थळी पोहोचले असता बोलेरो पाहून त्यांना मोठा धक्का बसला. अपघातग्रस्त बोलेरोमध्ये पैशांनी भरलेले एटीएम मशीन पडलेले असल्याचे त्यांनी पाहिले. पोलिसांनी मशीन ताब्यात घेतली. सध्या पोलिसांनी एटीएम मशीन आणि बोलेरो नारायणपूर पोलीस ठाण्यात ठेवली आहे. पोलिसांनी या प्रकरणाचा तपास केला असता, पोलिसांना चकमा देण्याच्या उद्देशाने गुन्हेगारांनी बोलेरो गाडीत बनावट नंबर प्लेट लावल्याचे उघड झाले, ज्याद्वारे त्यांनी एटीएम मशीन पळवून नेले होते. या प्रकरणाचा तपास करताना बोलेरोमध्ये ठेवलेल्या ड्रायव्हिंग लायसन्सशिवाय इतर अनेक कागदपत्रेही पोलिसांनी ताब्यात घेतली आहेत. तसेच हा गुन्हा करणाऱ्या गुन्हेगारांना पकडण्यासाठी पोलीस सातत्याने छापे टाकत असून त्यांना लवकरच अटक करण्याची कारवाई करण्यात येत आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.  

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी