शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियानं घेतला '171' आकड्याचा धसका; अहमदाबाद दुर्घटनेनंतर इतिहासजमा होणार संख्या
2
Air India Plane Crash: विमानाच्या अपघाताचा लाईव्ह व्हिडिओ कसा बनला?; व्हिडिओ रेकॉर्ड करणारा समोर आला
3
नशिबाचा क्रूर खेळ! विजय रुपाणी यांच्या मृत्यूमागचे हैराण करणारे हे ३ दुर्दैवी योग
4
Air India Plane Crash: हॉस्टेलच्या छतावर अडकलेल्या विमानाच्या शेपटीमध्ये सापडला मृतदेह
5
Sonam Raghuwanshi: राजाची हत्या केली अन् सोनम इंंदूरमध्ये आली, नंतर बुरखा घालून पळाली; जिथे लपली होती तो फ्लॅट सापडला!
6
इराणने केलेल्या हल्ल्यात इस्राइलची प्रचंड वित्तहानी, तेल अवीवमधील विध्वंसाचे फोटो आले समोर
7
Corona Vaccine : लस घेतलेल्यांना कोरोनाला घाबरण्याची गरज नाही?, तज्ज्ञांनी स्पष्टच सांगितलं, दिला मोलाचा सल्ला
8
"शेतकरी कर्जमाफी आणि लाडक्या बहिणीला २१०० रुपये देणे जमत नसेल तर खुर्च्या खाली करा’’, काँग्रेसचा सरकारला टोला
9
'इधर से जाने का नहीं', नंतर फरशी घातली डोक्यात', उल्हासनगर रेल्वे स्कायवॉकवर एकाला बेदम मारहाण
10
SBI नं ग्राहकांना दिला झटका, 'या' स्कीमचे व्याजादर केले कमी; ग्राहकांचं होणार नुकसान
11
Shalini Agnihotri : बस कंडक्टरची लेक झाली IPS; आईसोबत घडलेल्या घटनेने बदललं आयुष्य, घेतला मोठा निर्णय
12
'इस्रायल-अमेरिका मानवतेचे शत्रू...', इराणवरील हल्ल्यावरून शिया धर्मगुरू मौलाना यासूब अब्बास भडकले
13
लटकलेल्या अवस्थेत मृतदेह आढळला अन्...; कसा झालेला सुशांत सिंह राजपूतचा मृत्यू? ५ वर्षांनीही मृत्यूचं गूढ कायम
14
₹३१,००० कोटींच्या कंपनीचे मालक संजय कपूर यांचं 'हे' स्वप्न राहिलं अपूर्ण, कोणता होता त्यांचा व्यवसाय?
15
Air India Plane Crash: 'नो थ्रस्ट', अपघातापूर्वी पायलट सुमित सभरवालांचा ATC ला मेसेज; विमान का कोसळले?
16
Sanjay Raut : "अपघात झाला कसा, एकाच वेळेला २ इंजिन कशी बंद पडली, सायबरच्या माध्यमातून हायजॅक केली का?"
17
Ahmedabad Plane Crash : "तू हो पुढे, मी हात धुवून येतो"; मित्र मेसमधून बाहेर पडला, पण आर्यन आतच राहिला, गमावला जीव
18
"विमान पाहून महिला बेशुद्ध पडल्या, पायलटचे आभार मानते"; प्रत्यक्षदर्शींनी सांगितला भयानक अनुभव
19
७८ हजार कोटींची नेटवर्थ, कोणालाही नाव माहीत नाही.., कोण आहेत २,५०,००० कोटींची कंपनी शीनचे मालक 
20
Ahmedabad Plane Crash : हृदयद्रावक! "MY LOVE...", विमान अपघातात गर्लफ्रेंडचा मृत्यू, डोळे पाणावणारा Video

नागपुरातील काछीपुऱ्यात गुन्हेगाराची हत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 25, 2020 23:34 IST

एका हत्याकांडात आरोपी असलेल्या गुन्हेगाराची घातक शस्त्राने गळा कापून सशस्त्र गुंडांनी निर्र्घृण हत्या केली. बजाजनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत काछीपुऱ्यात शुक्रवारी मध्यरात्रीनंतर ही थरारक घटना घडली.

ठळक मुद्देगळा कापला, दगडानेही ठेचले : बजाजनगरात गुन्हा, आरोपी फरार

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : एका हत्याकांडात आरोपी असलेल्या गुन्हेगाराची घातक शस्त्राने गळा कापून सशस्त्र गुंडांनी निर्र्घृण हत्या केली. बजाजनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत काछीपुऱ्यात शुक्रवारी मध्यरात्रीनंतर ही थरारक घटना घडली. हरीश रघुनाथ पटेल (वय २५) असे मृताचे नाव आहे. त्याची हत्या कुणी केली, ते स्पष्ट झाले नाही.हरीश गुन्हेगारी वृत्तीचा होता. त्याने आठ वर्षांपूर्वी योगेश पट्टा नामक तरुणाची हत्या केली होती. कारागृहातून बाहेर आल्यानंतर त्याने काछीपुºयात चायनीजचा ठेला लावला होता. मध्ये मध्ये तो दारूच्या नशेत गुन्हेगारी करायचा. विनाकारण शिवीगाळ करून दमदाटी करायचा, असे समजते. काही दिवसांपूर्वी त्याने एका तरुणाला बेदम मारहाण केली होती. या पार्श्वभूमीवर, शुक्रवारी नेहमीप्रमाणे तो चायनीजच्या ठेल्यावर गेला. वडील आणि अन्य मंडळी रात्री ११ च्या सुमारास घरी परतले. काही वेळेनंतर तो घरी येईल, अशी अपेक्षा होती. मात्र, तो घरी परतलाच नाही. त्याचे वडील रघुनाथ पटेल नेहमीप्रमाणे शनिवारी पहाटे फिरायला निघाले. घरापासून काही अंतरावर त्यांना रक्ताच्या थारोळ्यात हरीशचा मृतदेह आढळला. त्यांनी आरडाओरड करून शेजाऱ्यांना गोळा केले. एकाने नियंत्रण कक्षाला माहिती दिल्यानंतर बजाजनगर पोलीस तेथे पोहचले. आरोपींनी हरीशचा गळा कापल्यानंतर त्याच्या डोक्यावर दगडाने ठेचले होते. रघुनाथ पटेल यांची तक्रार नोंदवून पोलिसांनी हत्येचा गुन्हा दाखल केला.योगेशच्या हत्येचा सूड?हरीशने योगेश पट्टा नामक तरुणाची हत्या केली होती. तेव्हापासून योगेशचे साथीदार घात लावून बसले होते. हरीशचा गेम करून योगेशच्या हत्येचा सूड घेण्याची भाषाही ते वापरत होते. हे हत्याकांड त्याचेच पर्यवसान असल्याचे बोलले जाते. दरम्यान, बजाजनगर पोलिसांनी हरीशच्या हत्येच्या आरोपात दोन संशयितांना ताब्यात घेतले. वृत्त लिहिस्तोवर त्यांची चौकशी सुरू होती. अद्याप आरोपींची नावे उघड झाली नसल्याचे बजाजनगर पोलीस सांगत होते.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीMurderखून