कांदळवनचा ऱ्हास करणाऱ्या १३९ बांधकाम धारकांसह पालिका अधिकारी, ठेकेदारांवर गुन्हे दाखल 

By ऑनलाइन लोकमत | Published: March 12, 2021 09:31 PM2021-03-12T21:31:55+5:302021-03-12T21:32:53+5:30

Revenue Department Action : भाईंदरमध्ये महसूल विभागाची मोठी कारवाई 

Crimes filed against 139 construction holders, contractors and contractors for degrading Kandalvan | कांदळवनचा ऱ्हास करणाऱ्या १३९ बांधकाम धारकांसह पालिका अधिकारी, ठेकेदारांवर गुन्हे दाखल 

कांदळवनचा ऱ्हास करणाऱ्या १३९ बांधकाम धारकांसह पालिका अधिकारी, ठेकेदारांवर गुन्हे दाखल 

Next
ठळक मुद्देगुन्हे दाखल झाले पण पालिका तोडक कारवाई कधी करणार असा सवाल केला जात आहे . 

मीरारोड -  भाईंदरच्या राई येथील शिवनेरी नगर ह्या सरकारी जागेवर अतिक्रमण करून वसलेल्या तसेच कांदळवनचा मोठा ऱ्हास करून सदरची बांधकामे झालेली असल्याने महसूल विभागाने भाईंदर पोलीस ठाण्यात १३९ बांधकाम धारकांसह महापालिकेचे अधिकारी , ठेकेदार आदींवर गुन्हा दाखल केला आहे . गुन्हे दाखल झाले पण पालिका तोडक कारवाई कधी करणार असा सवाल केला जात आहे . 

सीआरझेड अधिनियम आणि मुंबई उच्च न्यायालयाने कांदळवनची तोड , भराव व बांधकामे करण्यावर बंदी घातली असून कांदळवन पासून ५० मीटर पर्यंत कोणताही भराव - बांधकाम करण्यास मनाई आहे . तसे असताना राई चे शिवनेरी नगर हे कांदळवनचा ऱ्हास करून सीआरझेड व सरकारी जागेत वसलेले आहे . ह्या बेकायदेशीर बांधकामांना महापालिकेसह स्थानिक नगरसेवकांचा नेहमीच वरदहस्त राहिल्याने येथे अनधिकृत बांधकामांचे पेव फुटलेले आहे . 

सरकारी जमिनीची विक्री व बांधकामे करून विक्री किंवा भाड्याने देणारे माफिया सक्रिय आहेत . येथील बेकायदा बांधकामांवर पालिका कारवाई करत नाहीच उलट कर आकारणी , पाणी पुरवठा करण्यासह शौचालये , गटार , रस्ते आदी सर्व सुविधा बेकायदेशीरपणे करून देत आली आहे . कर आकारणी व नळ जोडणी करून देण्यासाठी काही दलालच पालिकेत सक्रिय आहेत . बनावट कागदपत्रांच्या आधारे सुद्धा नळ जोडण्या, कर आकारणी केली जाते . वीज पुरवठा सुद्धा कंपन्या सहज देतात . त्यामुळे या भागात कांदळवनची सतत तोड होत असून भराव करून बेकायदा बांधकामे सुरूच आहेत . 

 सततच्या तक्रारी नंतर काही प्रमाणात बांधकामे तोडली जात असली तरी ती पुन्हा बांधून होण्यासह नवीन बांधकामे सुरूच आहेत . या भागातील तक्रारीच्या अनुषंगाने कांदळवन समितीची स्थळ पाहणी करण्यात आली होती . त्या अनुषंगाने महापालिकेने कांदळवन व कांदळवन पासून ५० मीटर अंतरा पर्यंत येणाऱ्या बांधकामांची कर आकारणी नुसारची यादी महसूल विभागाला सादर केली होती . पालिकेने दिलेल्या यादी नुसार अपर तहसीलदार नंदकिशोर देशमुख यांच्या निर्देशा नुसार मंडळ अधिकारी प्रशांत कपडे यांनी  सरकारी जागेतील  कांदळवनाचा ऱ्हास करून परिसरात भराव व बांधकामे केल्या प्रकरणी १३९ बांधकाम मालक - भाडेकरू व बांधकाम ठेकेदार आदींवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे . या शिवाय शौचालये आदी बांधकामे करणारे पालिकेचे अधिकारी , ठेकेदार याना सुद्धा आरोपी करण्यात आले आहे .

Web Title: Crimes filed against 139 construction holders, contractors and contractors for degrading Kandalvan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.