उल्हासनगर : महापालिका आरोग्य विभागाच्या तक्रारीवरून विठ्ठलवाडी पोलीस ठाण्यात २९ नोव्हेंबर रोजी तीन बोगस डॉक्टरांवर गुन्हा दाखल झाला. मात्र, पोलीस कारवाई झाली नसल्याची माहिती वैद्यकीय अधिकारी डॉ. मोहिनी धर्मा यांनी दिली. तसेच, २६ डॉक्टरांची तपासणी सुरु असल्याच्या डॉ. धर्मा म्हणाल्या आहेत.
उल्हासनगर महापालिका हद्दीत बोगस डॉक्टरांचा सुळसुळाट झाला असल्याची चर्चा होती. कॅम्प नं-४ पेन्सिल फॅक्टरी परिसरात नोंदणीकृत वैद्यकीय व्यवसाय परवाना नसताना कचवानी नावाचे एकूण तीन डॉक्टर क्लिनिक चालवीत, असल्याची माहिती वैद्यकीय अधिकारी डॉ.धर्मा यांना मिळावी. त्यांनी याप्रकाराची पडताडणी सहाय्यक डॉ. उत्कर्षा शिंदे यांच्यासह इतरांच्या मदतीने केली.
चौकशीत बोगस डॉक्टर असल्याचे उघड झाल्यावर, २९ नोव्हेंबर रोजी विठ्ठलवाडी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलिसांनी भारतीय न्याय संहिता २०२३ नुसार ३१९(२), ३१८(४) तसेच वैद्यकीय व्यवसाय अधिनियमन १९६१ नुसार ३३ व ३६ नुसार गुन्हा दाखल केला. गुन्हा दाखल हाऊन २० दिवस उलटूले. मात्र, विठ्ठलवाडी पोलिसांनी डॉक्टरावर कारवाई करून दवाखाना बंद केला नसल्याची खंत वैद्यकीय अधिकारी डॉ. धर्मा यांनी व्यक्त केली.
महापालिका आरोग्य विभागाच्या तक्रारीवरून ३ बोगस डॉक्टरांची तक्रार केल्यानंतर विठ्ठलवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. मात्र, पोलिसांनी वेळीच कारवाई केली नसल्याने, बोगस डॉक्टरांचे क्लिनिक सरासपणे सुरु असल्याची माहिती डॉ. धर्मा यांनी दिली. तसेच, यापूर्वी एका बोगस डॉक्टरवर कारवाई झाली. त्याचेही क्लिनिक सुरु असल्याचे डॉ. धर्मा म्हणाल्या. याशिवाय एकूण २६ डॉक्टरांची चौकशी सुरु असून त्यामध्येही बोगस डॉक्टर असल्याची शंका डॉ.धर्मा यांनी व्यक्त केली.
एकूणच महापालिका आरोग्य विभागाने बोगस डॉक्टरा विरोधात भूमिका घेतली असताना, पोलीस कारवाई करीत नसल्याची खंत डॉ. धर्मा यांनी व्यक्त केली. याबाबत विठ्ठलवाडी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल पडवळ यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी कारवाई केल्याचे सांगितले. तसेच, क्टरांची पदवी तपासणे व दवाखाना बंद करणे. हे काम पोलिसांचे नसून त्या डॉक्टरांकडे इलेक्ट्रोपथीक पदवी असल्याचे अनिल पडवळ म्हणाले.