शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
2
इतिहासाची पुनरावृत्ती... तारीख, दिवस अन् घटनाही त्याच; ८४ वर्षापूर्वी घडलेले, सेम टू सेम...
3
'मनसेसोबत युती केली तरच फायदा होईल'; उद्धव ठाकरेंच्या बैठकीत राज ठाकरेंसोबत जाण्याचा 'सूर'
4
महापालिका निवडणुकीचे वारे वाहताच, उल्हासनगरात ठाकरेसेनेच्या पदाधिकाऱ्याच्या घरावर पेट्रोल टाकून पेटविण्याचा प्रयत्न
5
'आमच्यावर युद्ध लादले; आत्मसमर्पण करणार नाही', खमेनी यांचा इस्रायसह अमेरिकेलाही थेट इशारा
6
राजा रघुवंशी नव्हे, 'या' व्यक्तीशी होणार होतं सोनमचं लग्न, २५ गुणही जुळलेले! मग का मोडलं नातं? 
7
जिद्दीला सॅल्यूट! २३ वेळा अपयश पण मानली नाही हार; शेतकऱ्याचा लेक झाला असिस्टंट कमांडंट
8
आमच्या कार चालवायचे थांबवा! सिट्रोएनने C3 साठी युरोपमध्ये जारी केला इशारा
9
भाजपा सरकारच्या ‘या’ निर्णयाचे जयंत पाटलांनी केले स्वागत; गडकरींचा उल्लेख करत म्हणाले...
10
कुंडलीतच पतीच्या हत्येचा योग...! राजापूर्वी दुसऱ्याच मुलासोबत ठरलं होतं सोनमचं लग्न, पंडितजींनी वाचवलं
11
Ashadhi Ekadashi 2025: विठ्ठल नामोच्चारात हृदयविकार टाळण्याची ताकद? वैद्यकीय संशोधन सांगते...
12
उत्पन्न वाढलं, महागाईही नियंत्रणात पण खिशात पैसेच शिल्लक राहत नाहीत; बचत झाली कमी, कर्ज वाढली
13
Anaya Sanjay Bangar, IND vs ENG: अनाया बांगरचे वडील संजय बांगरने इंग्लंड दौऱ्यावर टीम इंडियाकडून केलेली धमाकेदार खेळी
14
Share Market Update : सलग दुसऱ्या दिवशी बाजार घसरला! निफ्टी बँक तेजीत, पण इतर ठिकाणी विक्रीचा जोर, पाहा आजचे आकडे!
15
नोकरीला कंटाळलात? फक्त २०,००० रुपयांमध्ये सुरू करा 'हे' ४ छोटे व्यवसाय, दरमहा बंपर कमाईची संधी!
16
Raj Kushwaha : "सोनमने तिच्या पतीला खाल्लं आणि आता..." असं म्हणणाऱ्या राजच्या आजीचा झाला मृत्यू
17
Glenn Maxwell Video: याला म्हणतात 'कमबॅक'... ग्लेन मॅक्सेवलने मारले तब्बल १३ षटकार, ४८ चेंडूत केलं शतक
18
सोशल मीडियावर व्हायरल झालेले खान सर निवडणूक लढवणार?,'आप'च्या संजय सिंह यांची भेट घेतली
19
२४ वर्षाच्या युवतीचा कारनामा, ८ बॉयफ्रेंडकडून लुटले २५ लाख; नवव्याला फसवणार होती, पण... 

Crime: बदलापुरात तरुणावर गावगुंडांचा गोळीबार

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 29, 2022 09:11 IST

Crime: बदलापुरात चिकनचे दुकान चालवणाऱ्या एका तरुणावर सहा ते सात जणांच्या गटाने जीवघेणा हल्ला करण्याचा प्रयत्न केला. यावेळी त्या तरुणावर गावगुंडांनी गोळीबारही केला.

बदलापूर : बदलापुरात चिकनचे दुकान चालवणाऱ्या एका तरुणावर सहा ते सात जणांच्या गटाने जीवघेणा हल्ला करण्याचा प्रयत्न केला. यावेळी त्या तरुणावर गावगुंडांनी गोळीबारही केला. या गोळीबारातून हा तरुण थोडक्यात बचावला आहे. पोलिसांना टिप देत असल्याचा संशय मनात ठेवून हा हल्ला करण्यात आल्याचे संबंधित तरुणाने स्पष्ट केले आहे.    बदलापूर गावातील कैफ शेख याचे गावातच चिकनचे दुकान आहे. तो शनिवारी रात्री बोराड पाड्यावरून बदलापूर गावाच्या दिशेने येत होता.   बदलापूर गावाच्या वेशीवरच गाड्यांतून आलेल्या अमन सिंग, सचिन खंडागळे, शेखर गडदे, पाठक बिल्डर, लक्ष्मण नवगिरे, रावत्या आणि इतर तीन ते चार जणांच्या गटाने कैफवर हल्ला केला. 

थोडक्यात बचावला     हल्ल्यातून कैफ आणि त्याच्या इतर साथीदारांनी वाचण्याचा प्रयत्न केला. त्याच वेळी हल्लेखोरांपैकी एकाने कैफच्या दिशेने गोळीबारही केला. ही गोळी चुकल्याने त्याचा जीव थोडक्यात बचावला. याप्रकरणी बदलापूर पोलीस ठाण्यात आरोपींच्या विरोधात गुन्हा दाखल झाला आहे.    तीन वर्षांपूर्वी हल्लेखोरांच्या काही साथीदारांना बेकायदा बंदुकीसह पोलिसांनी ताब्यात घेतले होते. त्याची टिप कैफने दिल्याचा संशय हल्लेखोरांना हाेता.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी