शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

एसीबीच्या पोलीस निरीक्षकावर गुन्हा दाखल: लाचेच्या गुन्ह्यात अडकविण्याचा धाक दाखवला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 24, 2019 22:23 IST

महिला अधिकाऱ्याला गुन्ह्यात अडकविण्याचा धाक दाखवून एसीबीच्या एका पोलीस निरीक्षकाने अडीच लाखांची लाच मागितली. हा धक्कादायक प्रकार उघड झाल्यानंतर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या (एसीबी) वरिष्ठांनी नागपूर एसीबीत कार्यरत पोलीस निरीक्षक पंकज शिवरामजी उकंडे याच्याविरुद्ध मंगळवारी गुन्हा दाखल केला.

ठळक मुद्देअडीच लाखांची लाच मागितली : महिला अधिकाऱ्याची तक्रार : मुंबई मुख्यालयातून कारवाईचे आदेश

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : महिला अधिकाऱ्याला गुन्ह्यात अडकविण्याचा धाक दाखवून एसीबीच्या एका पोलीस निरीक्षकाने अडीच लाखांची लाच मागितली. हा धक्कादायक प्रकार उघड झाल्यानंतर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या (एसीबी) वरिष्ठांनी नागपूर एसीबीत कार्यरत पोलीस निरीक्षक पंकज शिवरामजी उकंडे याच्याविरुद्ध मंगळवारी गुन्हा दाखल केला. या घडामोडीमुळे एसीबीत प्रचंड खळबळ उडाली आहे.भूमापन कार्यालयातील आश्रय मधुकर जोशी (वय ४०) नामक आरोपीविरुद्ध एक लाखाची लाच मागण्याच्या आरोपावरून एसीबीने १५ नोव्हेंबरला जोशीला अटक केली होती. या प्रकरणाचा तपास पोलीस निरीक्षक पंकज उकंडे याच्याकडे होता. तपास करताना उकंडे जोशीच्या कार्यालयात जायचा. तेथील महिला अधिकारी (तक्रारदार) हॉटेल हेरिटेजच्या मागे राहतात. तो त्यांच्या घरीही गेला होता. त्यांच्यासोबत गुन्ह्याच्या संबंधाने चर्चा करताना त्या घाबरत घाबरत बोलत असल्याने उकंडेने त्यांच्याकडून रक्कम उकळण्यासाठी डाव टाकला. तुम्हाला या गुन्ह्यात जोशीसोबत सहआरोपी करणार आहोत, असा त्याने धाक दाखवला. जर तुम्हाला गुन्ह्यात आरोपी व्हायचे नसेल तर त्यासाठी दोन लाखांची लाच द्यावी लागेल, असे उकंडे म्हणाला. दुसरे म्हणजे, जोशी याचा पीसीआर वाढविला तर तो तुमचे नाव घेईल आणि नंतर प्रकरण हाताबाहेर जाईल. त्यामुळे त्याचा पीसीआर न वाढवण्यासाठी ५० हजारांची लाच मागितली.जोशीच्या गुन्ह्यात कसलाही संबंध नसताना उगाच धाक दाखवून अडीच लाख रुपयांची लाच मागितल्या जात असल्याने महिला अधिकाऱ्याने आपल्या एका निकटस्थताच्या मदतीने एसीबीच्या अधीक्षक रश्मी नांदेडकर आणि अप्पर अधीक्षक राजेश दुद्धलवार यांची भेट घेतली आणि त्यांच्याकडे १६ नोव्हेंबरला उकंडेची त्यांनी तक्रार नोंदवली. या तक्रारीची शहानिशा केल्यानंतर उकंडेविरुद्ध कारवाईच्या मंजुरीसाठी स्थानिक वरिष्ठांकडून एसीबीच्या मुंबई मुख्यालयात प्रकरण पाठविण्यात आले. सोमवारी तेथून कारवाईची परवानगी मिळाली. त्यानुसार एसीबीचे उपअधीक्षक मिलिंद तोतरे यांनी मंगळवारी सदर पोलीस ठाण्यात आरोपी पोलीस निरीक्षक उकंडे याच्याविरोधात गुन्हा दाखल केला. कारवाईची कुणकुण लागताच उकंडे फरार झाला. एसीबीच्या पथकाने त्याच्या त्रिमूर्तीनगरातील घरी झाडाझडती घेतली. मात्र, फारसे काही मिळाले नाही. उकंडेचा शोध घेतला जात आहे.दोन वर्षे, दुसरा गुन्हा !एसीबीच्या अधिकाऱ्यांनी त्यांच्याच खात्यातील अधिकाऱ्याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्याची दोन वर्षांतील ही दुसरी घटना होय. यापूर्वी एसीबीचे तत्कालीन अधीक्षक पी. आर. पाटील यांच्यावर असाच गुन्हा दाखल झाला होता. त्यामुळे नागपूर एसीबीच्या कार्यालयाभोवती संशयाचे वलय निर्माण झाले होते. विशेष म्हणजे, त्याहीवेळी सदर पोलीस ठाण्यातच गुन्हा दाखल झाला होता अन् याही वेळी सदर ठाण्यातच गुन्हा दाखल झाला आहे.

टॅग्स :Anti Corruption Bureauलाचलुचपत प्रतिबंधक विभागCorruptionभ्रष्टाचार