शहरं
Join us  
Trending Stories
1
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
2
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
3
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
4
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
5
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
6
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
7
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
8
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
9
Uber: उबर चालकांच्या उत्पन्नात वाढ; कंपनीकडून कमिशन कपात, भाडं वाढणार का?
10
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
11
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
12
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
13
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
14
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
15
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
16
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
17
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
18
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
19
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
20
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
Daily Top 2Weekly Top 5

Crime News: बायकोपेक्षाही ‘हॉट’ दिसतेस! नराधमाने अल्पवयीन मुलीचा केला पाठलाग; विनयभंगाचा गुन्हा दाखल

By प्रदीप भाकरे | Updated: January 15, 2023 13:54 IST

Crime News: बायकोपेक्षाही हॉट दिसतेस, असे म्हणून एका १५ वर्षीय शाळकरी विद्यार्थीनीचा विनयभंग करण्यात आला. १३ जानेवारी रोजी सायंकाळी ६.४५ च्या सुमारास कुऱ्हा बसस्टॉपवर ही घटना घडली.

अमरावती - बायकोपेक्षाही हॉट दिसतेस, असे म्हणून एका १५ वर्षीय शाळकरी विद्यार्थीनीचा विनयभंग करण्यात आला. १३ जानेवारी रोजी सायंकाळी ६.४५ च्या सुमारास कुऱ्हा बसस्टॉपवर ही घटना घडली. याप्रकरणी कुऱ्हा पोलिसांनी आरोपी पवन मोहन बडेरे (३२, मारडा, ता. तिवसा) याच्याविरूध्द विनयभंग व पॉक्सो अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला.

तिवसा तालुक्यातील एका गावातील रहिवाशी असलेली १५ वर्षीय मुलगी शुक्रवारी सायंकाळच्या सुमारास ट्युशन संपवून घरी जाण्याकरीता बसली असताना आरोपीने तिची छेड काढली. तुझे चुंबन घ्यावेसे वाटते, असे म्हणून तिच्या सोबत लज्जास्पद वर्तन केले. त्यामुळे ती भेदरली. घरी आल्यानंतर तिने पालकांकडे आपबिती कथन केली. अखेर १४ जानेवारी रोजी तीने पालकांसमवेत कुऱ्हा पोलीस ठाणे गाठले. पोलिसांनी तत्काळ गुन्हा नोंदविला.शाळकरी विद्यार्थीनीचे बळजबरीने चुंबनधारणी: तालुक्यातील एका गावातील रहिवासी तथा आठवीत शिकणाऱ्या १३ वर्षीय मुलीचे बळजबरीने चुंबन घेऊन पाठलाग केल्याची घटना एका शाळेशेजारी घडली. ती अल्पवयीन मुलगी शाळेत ये जा करताना आरोपी मोहम्मद रेहान मो. अजीज (२४, कुसुमकोट) हा तिच्याकडे पाहून हसतो. जुलै २०२२ पासून त्याने तिचा पाठलाग चालविला असून, तो तिच्याशी दरडावून, धमकीच्या सुरात बोलतो. मॅसेज देखील करतो. अलिकडे त्याने स्वत:ला संपविण्याची धमकी तिला दिली. तो त्रास असह्य झाल्याने १३ जानेवारी रोजी सायंकाळी तिने त्याच्याविरूद्ध तक्रार नोंदविली. धारणी पोलिसांनी याप्रकरणी आरोपी मो. रेहानविरूध्द विनयभंग व पॉस्को अन्वये गुन्हा दाखल केला.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीAmravatiअमरावती