शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
2
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
3
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
4
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
5
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
6
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खोळतात? असं आहे यामागचं गुपित
7
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
8
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
9
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
10
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
11
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
12
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
13
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
14
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
15
VIRAL : लेकाच्या कष्टाचे फळ! मुलगा घरी घेऊन आला पहिला फ्रीज; आईच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून व्हाल भावुक 
16
Video - संतापजनक! फक्त एक पेरू तोडला म्हणून ४ वर्षांच्या मुलीला दोरीने बांधून बेदम मारहाण
17
भिवंडीत तरुणाचा मृत्यू झाल्यानंतर विशेष सुरक्षा; भाड्यात दरवर्षी १० टक्के वाढ
18
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
19
पाकच्या धमकीनंतर बंगालच्या सागरात भारताचं मोठं पाऊल; NOTAM जारी, ११-१२ एप्रिलला काय घडणार?
20
Monsoon Forecast 2026: यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस, जूनमध्ये स्थिर, तर जुलै ते सप्टेंबरदरम्यान...., स्कायमेटचा अंदाज 
Daily Top 2Weekly Top 5

Crime News: पत्नीनेच दिली पतीच्या हत्येसाठी सुपारी, आरोपींना ४८ तासांत अटक

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 2, 2023 11:33 IST

Crime News: पत्नीनेच पतीच्या हत्येची एक लाखाची सुपारी दिल्याचे उघड झाले आहे. सुपारी देणाऱ्या पत्नीसह तीन आरोपींना ४८ तासांत अटक करण्यात गुन्हे शाखेच्या युनिट दोनच्या पोलिसांना यश आले

नालासोपारा : पत्नीनेच पतीच्या हत्येची एक लाखाची सुपारी दिल्याचे उघड झाले आहे. सुपारी देणाऱ्या पत्नीसह तीन आरोपींना ४८ तासांत अटक करण्यात गुन्हे शाखेच्या युनिट दोनच्या पोलिसांना यश आले आहे, अशी माहिती गुन्हे शाखेचे पोलिस उपायुक्त अविनाश अंबुरे यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत दिली. ही हत्या अनैतिक संबंधातून झाली असल्याची चर्चा असल्याने पोलिस त्याच दृष्टीने तपास करत आहेत. 

२७ जानेवारीला संध्याकाळी नायगाव रिक्षा स्टँडजवळील ब्रिजखाली खाडीच्या पाण्यात एका व्यक्तीचा मृतदेह आढळला होता. पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने खाडीत फेकून दिल्याने फुगलेल्या, कुजलेल्या अवस्थेत सापडलेल्या मृतदेहाची ओळख पटविणे व आरोपींचा शोध घेणे हे पोलिसांसमोर मोठे आव्हान होते. वरिष्ठांनी दिलेल्या सूचना व मार्गदर्शनाप्रमाणे गुन्हे शाखा युनिट-२ चे पोलिस निरीक्षक शाहुराज रणवरे यांनी पाच पथके तयार केली होती. पोलिस आयुक्तालयातील सर्व पोलिस ठाण्यांतील मिसिंग रजिस्टर तपासले. मात्र, काहीही माहिती प्राप्त न झाल्याने मुंबई, ठाणे व नवी मुंबईतील पोलिस ठाण्यांतील मिसिंग रजिस्टर चेक केले. यातील मृताने परिधान केलेल्या कपड्यांचे वर्णन मुंबईतील बांगूरनगर पोलिस ठाण्यात मिसिंग व्यक्तीच्या कपड्याशी जुळले. त्याचे नाव कमरुद्दीन मोहम्मद उस्मान अन्सारी (३५) हे असल्याचे निष्पन्न केले. 

पैशांच्या हव्यासापोटी केला प्रकारn गोरेगाव येथे राहणाऱ्या कमरुद्दीन यांच्या शेजारी राहणारे आरोपी बिलाल उर्फ मुल्ला पठाण (४०), त्याची पत्नी सौफिया पठाण (२८) हे घटना घडल्यापासून परिसरातून निघून गेल्याची माहिती मिळाली. n ते वापी येथे असल्याची माहिती मिळाली. त्यांना त्या ठिकाणावरून ताब्यात घेऊन सखोल चौकशी केल्यावर त्यांनी पैशाच्या हव्यासापोटी गुन्हा केल्याचे निष्पन्न झाले. n तसेच पतीच्या हत्येसाठी प्रेरणा देणारी त्याची पत्नी आशिया अन्सारी हिला वालीव पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी