शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

संतापजनक! जन्मदाता बापच झाला हैवान; चिमुकल्याला केली अमानुष मारहाण, Video व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 30, 2021 17:27 IST

Crime News : मुलाने नातेवाईकांच्या घरी मस्ती केल्याचा राग अनावर झाल्याने त्याला बेदम मारहाण करण्यात आली आहे.

नवी दिल्ली - लहान मुलं ही मस्ती करतात. त्यावेळी अनेकदा पालक त्यांना ओरडतात तर कधी कधी मारतात. पण काही वेळा मुलांना मारण्याऐवजी समजून सांगितल्यास ती ऐकतात. काही पालक मुलांना शिस्त लागावी म्हणून कठोर शिक्षा देतात. अशीच एक धक्कादायक घटना आता समोर आली आहे. हैदराबादमध्ये एक संतापजनक घटना घडली आहे. जन्मदाता बापच हैवान झाला असून त्याने आपल्या चिमुकल्याला अमानुष मारहाण केली आहे. सोशल मीडियावर या घटनेचा एक व्हिडीओ सध्या जोरदार व्हायरल होत आहे. यामध्ये वडील मुलाला मारहाण करताना दिसत आहेत. 

मुलाने नातेवाईकांच्या घरी मस्ती केल्याचा राग अनावर झाल्याने त्याला बेदम मारहाण करण्यात आली आहे. याप्रकरणी मुलाच्या आईने पोलिसांत धाव घेत आपल्या पतीविरोधात तक्रार दाखल केली आहे. त्यानंतर आता पतीला अटक करण्यात आली आहे. अशोक घंटे असं आरोपीचं नाव असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. आयएएस अधिकारी अवनीश शरण यांनी देखील हा व्हिडीओ शेअर केला असून आरोपीला कडक शिक्षा देण्याची मागणी केली आहे. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.

रागावलेल्या वडिलांनी केली मुलाला बेदम मारहाण

मिळालेल्या माहितीनुसार, हैद्राबादमध्ये राहणाऱ्या या कुटुंबातील मुलाचा त्याच्या मावशीकडे सोडण्यात आलं होतं. पण मुलगा मावशीकडे खूप मस्ती करायचा. त्यामुळे मावशीने मुलाच्या वडिलांना फोन केला आणि मुलगा त्रास देत असल्यामुळे त्याला घेऊन जाण्याची विनंती केली. या प्रकारामुळे संतापलेल्या बापाने मुलाला ओढत ओढत घरी आणलं. घरात असलेला एक ऊस घेऊन त्याला मारहाण करायला सुरुवात केली. तसेच मुलाला मारहाण करण्यापूर्वी मुलीच्या हातात मोबाईल देत या घटनेचं रेकॉर्डिंगही करायला सांगितलं. 

आईने उचललं टोकाचं पाऊल, केलं असं काही...

रागाच्या भरात अशोकने मुलाला अमानूषपणे मारहाण करायला सुरुवात केली. मुलगा ओरडत होता आणि आपल्याला मारहाण न करण्याची विनंती करत होता. शूटिंग करणारी त्याची बहीणदेखील भावाला सोडून देण्याची विनंती तिच्या वडिलांना करत होती. मात्र त्याने मारहाण सुरूच ठेवली. मुलाच्या शरीरावर मारहाण केल्याच्या अनेक जखमा आहेत. याच दरम्यान पत्नीने पोलिसांत तक्रार केली. पोलिसांनी अशोकला अटक केली असून ते याप्रकरणाची चौकशी करत आहेत. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.  

 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीArrestअटक