शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

खळबळजनक! ऑपरेशन करताना महिलेचा मृत्यू; रुग्णालयाला ताळं लावून पळाले डॉक्टर अन्...

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 9, 2022 14:33 IST

Crime News : एका खासगी रुग्णालयात प्रसुतीसाठी आलेल्या 25 वर्षीय महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.

नवी दिल्ली - उत्तर प्रदेशमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. एका खासगी रुग्णालयात प्रसुतीसाठी आलेल्या 25 वर्षीय महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. यामुळे गोंधळ होईल या भीतीने डॉक्टर आणि कर्मचारी रुग्णालयाला ताळं लावून पळून गेल्याची भयंकर घटना समोर आली आहे. या घटनेने एकच खळबळ उडाली आहे. घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत. पोलिसांनी रुग्णालयाला लावलेलं ताळं तोडून रुग्णालयात उपचारासाठी दाखल असलेल्या इतर रुग्णांना दुसऱ्या ठिकाणी शिफ्ट केलं आहे. तसेच हे रुग्णालय सील करून कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. 

मिळालेल्या माहितीनुसार, उत्तर प्रदेशच्या इटावामध्ये एका खासगी रुग्णालयात हा धक्कादायक प्रकार घडला. एका महिलेला प्रसुतीसाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र ऑपरेशन दरम्यान तिचा मृत्यू झाला. रुग्णालय प्रशासनाने भीतीमुळे मृत महिला आणि तिच्या नातेवाईकांना रुग्णालयाबाहेर काढलं. यानंतर महिलेचे नातेवाईक चिडले. त्यांना गोंधळ घालण्यास सुरुवात केली. तेव्हा रुग्णालयातील कर्मचाऱ्यांनी मुख्य गेटला ताळं लावलं आणि ते पळून गेले. रुग्णालयात उपचारासाठी इतरही रुग्ण दाखल होते. सुचना मिळताच पोलीस आणि आरोग्य अधिकारी रुग्णालयात आले. त्यांनी ताळं तोडलं. 

"रुग्णालयातील कर्मचाऱ्यांनी धक्के मारून आम्हाला बाहेर काढलं"

मृत महिलेच्या नातेवाईकांनी दिलेल्या माहितीनुसार, 25 वर्षीय महिलेला मोहब्बतपूर गावातून डिलिव्हरीसाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. रुग्णालयाने 50 हजार रुपयांत नॉर्मल डिलिव्हरी होईल असं सांगितलं. त्यानुसार 30 हजार जमा केले होते. पण ऑपरेशन दरम्यान तिची प्रकृती बिघडली आणि मृत्यू झाला. यानंतर रुग्णालयातील कर्मचाऱ्यांनी धक्के मारून आम्हाला बाहेर काढलं. तसेच रुग्णालयाला ताळं लावून ते पळून गेले. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत असून अनेकांची चौकशी करण्यात येत आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 

 

टॅग्स :doctorडॉक्टरhospitalहॉस्पिटल