शहरं
Join us  
Trending Stories
1
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
2
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
3
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
4
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
5
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
6
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
7
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
8
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
9
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
10
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
11
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
12
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
13
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
14
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
15
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
16
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
17
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
18
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
19
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
20
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
Daily Top 2Weekly Top 5

खळबळजनक! लग्नासाठी 'तिने' तगादा लावला; बॉयफ्रेंडने 'मृत्यू'चं इंजेक्शन देत काटा काढला अन्...

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 29, 2022 19:23 IST

Crime News : एका खासगी रुग्णालयात एकत्र नोकरी करत असताना प्रेमप्रकरण सुरू झालं होतं. पण तिने लग्नाचा तगादा लावल्याने तरुणाने तिचा काटा काढला.

नवी दिल्ली - देशात अनेक धक्कादायक घटना समोर येत आहेत. अशीच एक भयंकर घटना समोर आली आहे. उत्तर प्रदेशमध्ये एका 22 वर्षीय तरुणीच्या मृत्यूप्रकरणी पोलिसांनी केलेल्या तपासात धक्कादायक खुलासा करण्यात आला आहे. तरुणीच्या मृत्यू प्रकरणाचं गूढ उकलण्यात पोलिसांना यश आलं आहे. लग्नासाठी दबाव आणल्याने बॉयफ्रेंडने तरुणीला विषारी इंजेक्शन दिल्याचं समोर आलं आहे. यामध्ये तिचा मृत्यू झाला. एका खासगी रुग्णालयात एकत्र नोकरी करत असताना दोघांचं प्रेमप्रकरण सुरू झालं होतं. पण तिने लग्नाचा तगादा लावल्याने तरुणाने तिचा काटा काढला. 

मिळालेल्या माहितनुसार, आरोपी बॉयफ्रेंडला पोलिसांनी अटक केली आहे. पोलीस या हत्या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. उत्तर प्रदेशच्या अलिगढमध्ये हा भयंकर प्रकार घडला आहे. राहत्या घरी तरुणीचा मृतदेह संशयास्पद अवस्थेत आढळला होता. पोलिसांची फॉरेन्सिक टीम घटनास्थळी पोहोचली. तिथल्या काही गोष्टी ताब्यात घेण्यात आल्या आहेत. तसेच दोन सीरिंज देखील जप्त करण्यात आल्या.

घटनास्थळी एकापेक्षा जास्त व्यक्ती उपस्थित होत्या, असं पोलिसांच्या प्राथमिक तपासात आढळून आलं आहे. तरुणीच्या नातेवाईकांनी दिलेल्या माहितीनुसार, तिचे रिझवान नावाच्या तरुणासोबत प्रेमसंबंध सुरू होते. दोघंही एका खासगी रुग्णालयात काम करत होते. तरुणी लग्नासाठी रिझवानवर दबाव आणत होती. मात्र त्याला लग्न करायचं नव्हतं. त्यामुळे इंजेक्शनमध्ये विषारी पदार्थ मिसळून तिला टोचलं. त्यानंतर तिचा मृत्यू झाला असं सांगत आरोपीने आपला गुन्हा कबूल केला आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 

 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी