शहरं
Join us  
Trending Stories
1
'मला आवडतो पाकिस्तान, पण मोदी महान'; मुनीर भेटीदरम्यान काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प?
2
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
3
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
4
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
5
Pune Crime News: लिपस्टिकने चिठ्ठी लिहिली अन् विवाहितेने चिमूरड्यासह पाचव्या मजल्यावरून स्वतःला झोकून दिलं
6
Viral Video : कशासाठी तो हट्ट? चिमुकल्याला सिंहाच्या पाठीवर बसवत होता बाबा, पुढे जे झालं ते बघाच... 
7
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
8
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
9
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
10
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
11
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
12
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
13
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
14
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
15
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
16
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
17
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
18
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
19
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
20
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...

धक्कादायक! 'ती' टीव्ही पाहत बसली अन् घरात मोठी चोरी झाली; 19 लाखांच्या दागिन्यांवर मारला डल्ला

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 29, 2021 11:45 IST

Crime News : घरामध्ये दोन महिला असूनही चोरट्यांनी घरातल्या दागिन्यांवर डल्ला मारला. चोरीच्या प्रकरणात चोरट्यांनी तब्बल 19 लाख रुपयांचे दागिने लंपास केले आहेत. 

नवी दिल्ली - देशात अनेक धक्कादायक घटना घडत आहेत. याच दरम्यान एका महिलेला घरामध्ये TV सिरियल पाहणं चांगलंच महागात पडलं आहे. घरामध्ये मोठी चोरी झाली असून चोरट्यांनी तब्बल 19 लाखांच्या दागिन्यांवर डल्ला मारला आहे. तामिळनाडूतील (Tamil Nadu) कांचीपुरम (Kanchipuram) येथे चोरीची घटना समोर आली आहे. घरामध्ये दोन महिला असूनही चोरट्यांनी घरातल्या दागिन्यांवर डल्ला मारला. चोरीच्या प्रकरणात चोरट्यांनी तब्बल 19 लाख रुपयांचे दागिने लंपास केले आहेत. 

मिळालेल्या माहितीनुसार, कांचीपुरम येथे रात्री मोठ्या आवाजात टीव्ही लावून मालिका पाहण्यात व्यस्त असलेल्या महिलेच्या घरात घुसून चोरट्यांनी 19 लाखांचे दागिने चोरले आणि आणि ते पसार झाले. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दोन्ही महिला रात्री उशिरा टीव्ही पाहत होत्या, त्यादरम्यान टीव्हीचा आवाज खूप मोठा होता. महिला टीव्ही पाहण्यात एवढ्या व्यस्त होत्या की त्यांच्या घरात चोर शिरल्याचे त्यांना समजलंच नाही.

पोलीस अधिकाऱ्यांनी दोन्ही महिलांनी टीव्ही पाहण्यापूर्वी घराचा मुख्य दरवाजा बंद केला नाही. महिलांच्या या चुकीमुळे मुखवटा घातलेल्या चोरट्यांनी घरात घुसून महिलेला आणि तिच्या नातेवाईकाला चाकूच्या धाक दाखवून बंधक बनवलं आणि नंतर घर लुटलं असं म्हटलं आहे. तामिळनाडूची ही घटना सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. सोशल मीडिया यूजर्स एकमेकांना घरी कसे सुरक्षित राहायचं आणि चुकूनही चोरी होऊ नये म्हणून गोष्टी कुठे लपवल्या पाहिजेत याची सिक्रेट शेअर करत आहेत.

एका युजरने यावर कमेंट करताना लिहिले की, जर तुम्हाला जास्त सामान घरात कुठेतरी ठेवायचे असेल तर ते कपाट किंवा तिजोरीत नाही तर किचन किंवा बाथरूमच्या बॉक्समध्ये ठेवा. त्याच वेळी, एका युजरने म्हटलं की, प्रत्येकाने घरात प्रवेश करताच मुख्य दरवाजा लॉक करण्याचा सल्ला दिला आहे. या चोरीच्या घटनेची सर्वत्र जोरदार चर्चा रंगली आहे. पोलीस या घटनेचा अधिक तपास करत आहेत. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 

 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीTamilnaduतामिळनाडू