शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
2
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
3
"होर्मुझच्या समुद्रधुनीत अमेरिका...!"; युद्धविरामानंतर ट्रम्प यांचा इराणला नवा संदेश; तेहरानमध्ये पुन्हा उभ्या राहणार इमारती?
4
युद्ध संपले, आता मदतीचा हात! २४ तासांत ट्रम्प यांचा 'यू-टर्न'; इराणच्या पुनर्निर्माणासाठी अमेरिका करणार सहकार्य
5
नेपाळमध्ये भारतीय वाहनांसाठी नवा नियम, सीमेवरून वाहतुकीला निर्बंध; स्थानिकांमध्ये संताप
6
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
7
विकृतीचा कळस! महिलांची अंतर्वस्त्रे चोरून कॅमेऱ्यासमोरच करायचा अश्लील कृत्य; रहिवाशांनी सीसीटीव्ही पाहिला अन्...
8
IPL 2026: मुंबईविरुद्धच्या सामन्यात जयस्वालची 'स्पेशल' सेंच्युरी; याआधी असं फक्त तिघांनाच जमलंय!
9
लवकरच येणार स्वस्त मोबाईल प्लॅन! केवळ कॉल आणि एसएमएस करणाऱ्यांना मिळणार गिफ्ट; कंपन्या दिलासा देणार?
10
समरजित घाटगे यांची भाजपात घरवापसी, शरद पवार गटाला धक्का, कागलमधील समीकरणं बदलणार
11
तुमच्या नगरसेवकांना नियम शिकवा; अधिकारी, विरोधकांनी गणेश नाईकांना घेरले, नेमके काय घडले?
12
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
13
"जी व्यक्ती मालिकेतच नव्हती...", 'लक्ष्य'मधून बाहेर काढण्याच्या दिगंबर नाईकांच्या आरोपांवर आदेश बांदेकरांचं उत्तर
14
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
15
SHOCKING! इराण-अमेरिका युद्धातून डोनाल्ड ट्रम्पची दोन्ही मुलंच उकळताहेत प्रचंड पैसा!
16
RR vs MI: मुंबईच्या रणनीतीचा पालापाचोळा! पराभवानंतर जयवर्धने यांनी सांगितलं नेमकं कुठं गणित बिघडलं?
17
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
18
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
19
Mumbai Local: मध्य रेल्वेची कमाल, १६४ कोटी प्रवाशांचा प्रवास; ८.१६ लाख ट्रेन, १ वर्षांत किती सेवा वाढल्या?
20
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
Daily Top 2Weekly Top 5

दीड वर्ष 2 बहिणींवर 7 जणांकडून बलात्कार; छोटी बहीण गर्भवती राहिल्याने भयंकर प्रकार उघड

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 26, 2022 14:04 IST

Crime News : सामूहिक बलात्काराची धक्कादायक घटना घडली आहे. सात नराधमांनी दोन सख्या बहिणींवर बलात्कार केला.

नवी दिल्ली - देशात महिलांवरील अत्याचाराच्या आणि बलात्काराच्या घटनांमध्ये वाढ होत आहे. अशीच एक माणुसकीला काळीमा फासणारी घटना समोर आली आहे. राजस्थानमधील झुंझुनूच्या जिल्ह्यात सामूहिक बलात्काराची धक्कादायक घटना घडली आहे. सात नराधमांनी दोन सख्या बहिणींवर बलात्कार केला. आरोपी अनेक महिन्यांपासून दोन्ही बहिणींचे शोषण करत होते. त्या दोघींमधील धाकटी बहीण गरोदर राहिल्यानंतर हा संतापजनक प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी पीडितेच्या भावाने सात तरुणांविरोधात तक्रार दाखल केली आहे. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडितेच्या भावाने सांगितले की, मागील दीड वर्षांपासून हे आरोपी त्याच्या बहिणींसोबत दुष्कृत्य करत आहेत. आरोपींनी आधी मोठ्या बहिणीचा व्हिडीओ बनवला आणि जर याबाबत कुणाला सांगितले तर हा व्हिडीओ व्हायरल करण्यात येईल, अशी धमकी दिली. तसेच मोठ्या बहिणीवर दबाव टाकत म्हटले की, तुझ्या छोट्या बहिणीला बोलावले तर आम्ही तुला सोडून देऊ. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. 

आरोपींनी फेब्रुवारी 2021 मध्ये एका लग्नादरम्यान छोट्या बहिणीसोबत दुष्कृत्य केले. त्यावेळी ती अल्पवयीन होती. त्यानंतरही तिचे लैंगिक शोषण करण्यात आले. यामुळे ती गर्भवती राहिली. ही छोटी बहिण ही दहावीत आहे. मात्र, गरोदर असल्यामुळे तिला परीक्षेला बसता आले नाही. हा प्रकार कळताच आरोपी ढोलू खान याने तिला गर्भपाताची गोळी आणून दिली आणि कुणाला सांगितल्यास जीवे मारण्याची धमकी दिली.

23 एप्रिल रोजी लहान बहिणीच्या पोटात दुखू लागल्याने कुटुंबीयांना ही बाब कळाली. पोलिसांनी आरोपींविरुद्ध पॉक्सो कायदा आणि एससी-एसटी कायद्याच्या कलमांतर्गत गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे. पोलिसांनी दोन्ही पीडित बहिणींचे मेडिकल केले आहे. या संपूर्ण प्रकरणाचा पोलीस तपास करत आहेत. तसेच कुटुंबीयांना यामुळे मोठा धक्का बसला आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.  

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी