शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
6
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
7
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
8
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
9
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
10
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
11
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
12
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
13
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
14
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
15
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
16
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
17
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
18
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
19
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
20
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
Daily Top 2Weekly Top 5

लग्नाच्या नावाखाली 200 मुलींना भामट्याने घातला लाखोंचा गंडा; स्वत:लाच करायचा मृत घोषित

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 6, 2022 11:18 IST

Crime News : देशातील अनेक राज्यांमधील 200 हून अधिक मुलींची लाखोंची फसवणूक केल्याचा आरोप केला आहे.

नवी  दिल्ली - उत्तर प्रदेशातील बस्ती पोलीस आणि सर्विलान्स टीमने एका गुन्हेगाराला अटक केली आहे. या भामट्यावर देशातील अनेक राज्यांमधील 200 हून अधिक मुलींची लाखोंची फसवणूक केल्याचा आरोप केला आहे. एका तरुणीची या गुन्हेगाराने फसवणूक केली. यानंतर हा खुलासा झाला. मुलीने तक्रार केल्यानंतर तपास सुरू झाला. यावेळी पोलिसांच्या लक्षात आलं की, यात केवळ एकच मुलगी नाही तर अशा शेकडो मुलींना आरोपीने धोका दिला आहे. या घटनेने एकच खळबळ उडाली आहे. 

मिळालेल्या माहितीनुसार, हा नटवरलाल मुलींच्या कुंडलीत दोष दूर करणे, चांगला मुलगा मिळावा असं सांगून मुलींकडून बँक अकाऊंटमध्ये पैसे मागवून पूजा-पाठ करण्याचं नाटक करीत होता. साध्या मुलींना तो आपल्या जाळ्यात अडकवत होता. गाजियाबाद येथे राहणाऱ्या तरुण कुमारने कोरोना काळात इंटरनेटवर मेट्रिमोनियल एपच्या माध्यमातून एक प्लॅन बनवला होता.

वेबसाईटवर ऑनलाईन रजिस्ट्रेशन करून लोकांकडून पैसे उकळवण्यास सुरुवात केली. तो मेट्रिमोनियल साइटवर मुलीची फसवणूक करीत होता. कुंडली मिळवणं आणि ज्योतिषीकडून दूर करून घेण्याच्या नावाखाली अकाऊंटमध्ये पैसे जमा करण्यास सांगत होता. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या गुन्हेगाराने आतापर्यत विविध राज्यांमधील 200 हून अधिक मुलींची मेट्रीमोनियल साइटच्या माध्यमातून फसवणूक केली आहे. 

लग्न ठरवणं आणि नातं जोडून देण्याच्या नावाखाली मुलींकडून हळूहळू पैसे काढत होता. जेव्हा मुली त्याच्यावर दबाव आणत तर तो स्वत:ला मृत घोषित करत होता. डीपीवर फूल चढवलेला फोटोदेखील ठेवत होता. मुलीदेखील यावर विश्वास ठेवत होत्या. त्यांना खरचं याचा मृत्यू झाला आहे असं वाटायचं. पण आता आरोपीची पोलखोल झाली असून त्याला अटक करण्यात पोलिसांना यश आलं आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.  

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी