शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
4
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
5
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
6
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
7
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
8
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
9
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
10
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
11
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
12
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
13
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
14
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
15
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
16
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
17
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
18
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
19
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
20
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
Daily Top 2Weekly Top 5

Crime News: चौल भोवाळे येथील दत्त मंदिरात चोरी, ४० किलो चांदी नेली चोरून, चोरटा सीसीटीव्हीत कैद

By राजेश भोस्तेकर | Updated: December 16, 2022 16:18 IST

Crime News: अलिबाग तालुक्यातील चौल भोवाळे पर्वत निवासी श्री दत्त मंदिरात चांदी चोरी केल्याची घटना शुक्रवारी पहाटे दोन वाजण्याच्या सुमारास घडली आहे. श्री दत्त मूर्तीच्या मागे भिंतीला लावलेली ४० किलो चांदी चोरट्याने चोरली आहे.

अलिबाग -  अलिबाग तालुक्यातील चौल भोवाळे पर्वत निवासी श्री दत्त मंदिरात चांदी चोरी केल्याची घटना शुक्रवारी पहाटे दोन वाजण्याच्या सुमारास घडली आहे. श्री दत्त मूर्तीच्या मागे भिंतीला लावलेली ४० किलो चांदी चोरट्याने चोरली आहे. चोरी करणारा चोर हा सीसीटिव्ही मध्ये कैद झाला आहे. या चोरट्या विरोधात रेवदंडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. अप्पर पोलीस अधीक्षक अतुल झेंडे, स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलिस निरीक्षक दयानंद गावडे, रेवदंडा पोलीस यांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली आहे. सीसीटिव्ही चोरटा कैद झाल्याने लवकरच तपास लागला जाईल असा विश्वास जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांनी लोकमतशी बोलताना व्यक्त केला आहे. 

चौल भोवाळे पर्वत निवासी श्री दत्त मंदिर हे प्रसिद्ध आहे. डिसेंबर महिन्यात दरवर्षी मोठी यात्रा याठिकाणी भरत असते. नुकतीच ७ ते ११ डिसेंबर अशी पाच दिवस यात्रा संपन्न झाली होती. चारच दिवसांनी शुक्रवारी १६ डिसेंबर रोजी चोरट्याने मंदिरातील चांदीवर डल्ला मारला आहे. त्यामुळे एकच खळबळ तालुक्यात माजली आहे. शुक्रवारी पहाटे दोन वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली आहे. 

श्री दत्त मंदिरात चोरी झाल्याचे कळल्यानंतर त्वरित रेवदंडा पोलिसांना घटनेची माहिती स्थानिकांनी दिली. त्यानंतर रेवदंडा पोलिसांनी घटनास्थळी येऊन पंचनामा केला. मंदिरात असलेल्या सीसीटिव्हीमध्ये चोरी करणारा चोर कैद झाला आहे. चोर हा एक आहे की त्याचे अन्य साथीदार आहेत. याबाबत पोलीस तपास सुरू केला आहे. गेल्या आठवड्यात पाच दिवस यात्रा असल्याने या काळात चोरट्यांनी रेकी केली असल्याचा संशय आहे. त्यानंतर त्यांनी चांदिवर डल्ला मारला आहे. मंदिरात भिंतीला लावलेली ४० किलो चांदी ही अज्ञात चोरट्याने पळवली आहे. त्यामुळे या चोरट्यांना शोधण्याचे आव्हान रायगड पोलिसांना आहे. 

 चोरीचा तपास करण्यासाठी पथक तयारचोरीची घटना कळताच जिल्हा पोलिस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांच्या आदेशाने अप्पर पोलीस अधीक्षक अतुल झेंडे याच्या नेतृत्वाखाली स्थानिक गुन्हे विभाग आणि रेवदंडा पोलीस याचे पथक चोरीचा छडा लावण्यासाठी तयार केले आहे. अप्पर पोलीस अधीक्षक अतुल झेंडे यांनीही घटनास्थळी भेट दिली.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीRaigadरायगड