शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
3
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
4
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
5
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
6
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
7
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
8
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
9
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
10
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
11
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
12
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
13
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
14
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
15
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
16
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
17
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
18
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
19
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
20
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
Daily Top 2Weekly Top 5

सावकाराच्या तगाद्याने खोतवाडीच्या तरुणाची आत्महत्या

By शीतल पाटील | Updated: October 9, 2022 20:22 IST

पत्नीची फिर्याद, सांगली ग्रामीण पोलिसांत गुन्हा दाखल

लोकमत न्यूज नेटवर्क, सांगली: खोतवाडी (ता. मिरज) येथील विशाल उर्फ अविनाश आनंदा कुरणे (वय ३४) या तरुणाने सावकाराच्या त्रासाला कंटाळून आत्महत्या केल्याची घटना घडली. याबाबत त्याची पत्नीने सांगली ग्रामीण पोलिसांत फिर्याद दिली आहे. फिर्यादीनंतर संजय वसंत माने (वय ४५, रा. शालीमार, सांगली) याच्याविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दहा टक्के व्याजदराने घेतलेल्या तीन लाख रुपयांचे व्याज वेळेत भरुनही माने याने पैशासाठी तगादा लावल्याचे तक्रारीत म्हटले आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की मयत अविनाश कुरणे यांनी संशयित संजय माने याच्याकडून दरमहा दहा टक्के व्याजदराने तीन लाख रुपयांचे कर्ज घेतले होते. कुरणे याने वेळोवेळी त्या रकमेचे व्याज दिले. जानेवारी ते सप्टेंबर २०२१ या कालावधीतील व्याज २ लाख ७० हजार आणि मुद्दल ३ लाख असे एकूण ५ लाख ७० हजार रुपये द्यावेत, याकरिता माने याने अविनाशच्या पाठीमागे तगादा लावला होता. रक्कम देण्यास शक्य होत नसेल तर घर, दुकान आणि जमीन नावावर करुन देण्यासाठी दबाव आणला होता. सततच्या मानसिक त्रासास कंटाळून अविनाश कुरणे याने खोतवाडी गावातील स्मशानभूमीनजीक असणाऱ्या पत्र्याच्या शेडमध्ये गळफास घेऊन आत्महत्या केली. याबाबतचे सांगली ग्रामीण पोलिस ठाण्यात संशयिताविरुद्ध अनुसूचित जाती जमाती अधिनियम व महाराष्ट्र सावकारी कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संशयिताला अद्याप अटक केलेली नाही.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीSangliसांगली