शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
3
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
4
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
5
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
6
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
7
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
8
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
9
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
10
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
11
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
12
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
13
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
14
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
15
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
16
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
17
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
18
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
19
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
20
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

धूमस्टाईलने येत तरुणाच्या हातातून मोबाईल हिसकावला, दोघांविरोधात गुन्हा

By देवेंद्र पाठक | Updated: November 6, 2022 17:47 IST

धुळे तालुक्यातील निकुंभे येथील तुषार प्रभाकर पारधी या शिक्षण घेणाऱ्या तरुणाने फिर्याद दाखल केली आहे.

धुळे - फोनवर बोलत पायी जात असलेल्या तरुणाच्या हातातून मोबाईल हिसकावून-दुचाकीवरून धूमस्टाईलने आलेल्या दोघांनी पोबारा केला. ही घटना शनिवारी रात्री सव्वाआठ वाजेच्या सुमारास देवपुरातील वाडीभोकर रोडवर घडली. याप्रकरणी पश्चिम देवपूर पोलीस ठाण्यात शनिवारी मध्यरात्री दोघांविरोधात जबरी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला. 

धुळे तालुक्यातील निकुंभे येथील तुषार प्रभाकर पारधी या शिक्षण घेणाऱ्या तरुणाने फिर्याद दाखल केली आहे. त्यानुसार, देवपुरातील वाडीभोकर रोडवरील स्वामी समर्थ पेट्रोल पंपाच्या जवळून शनिवारी रात्री सव्वाआठ वाजेच्या सुमारास तुषार पारधी हा फोनवर बोलत पायी जात होता. अंधाराचा फायदा घेऊन दोन तरुण दुचाकीवर धूमस्टाईलने वेगाने त्याच्याजवळ आले आणि दुचाकीवर मागे बसलेल्या एकाने हातातून बळजबरीने मोबाईल हिसकाविला आणि दोघांनी दुचाकीवरून पोबारा केला. आरडाओरड करूनही त्याचा काही उपयोग झाला नाही.

घटनेनंतर तुषार पारधी या तरुणाने पश्चिम देवपूर पोलीस ठाणे गाठत फिर्याद दाखल केली. त्यानुसार, शनिवारी मध्यरात्री बारा वाजेच्या सुमारास दोन तरुणाविरोधात भादंवि कलम ३९२, ३४ प्रमाणे गुन्ह्याची नोंद करण्यात आली. घटनेचा तपास सहायक पोलीस निरीक्षक सचिन बेंद्रे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक डी. एन. चव्हाण करीत आहेत. 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीDhuleधुळे