शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

खळबळजनक! दोन नातवंडांना घेऊन आजीने मारली विहिरीत उडी; कारण ऐकून बसेल मोठा धक्का

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 12, 2022 12:01 IST

Crime News : एका 65 वर्षीय महिलेने आपल्या दोन नातवंडांना घेऊन विहिरीत उडी मारत आत्महत्या केली.

नवी दिल्ली - देशात अनेक भयंकर घटना घडत आहेत. अशीच एक मन सुन्न करणारी घटना आता समोर आली आहे. एका 65 वर्षीय महिलेने आपल्या दोन नातवंडांना घेऊन विहिरीत उडी मारत आत्महत्या केली. विहिरीत पडल्याने आजींसह दोन्ही नातवंडांचा मृत्यू झाला आहे. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली असून सर्वांनाच मोठा धक्का बसला आहे. राजस्थानच्या सिरोही जिल्ह्यातील कालंद्री पोलीस ठाण्य़ाच्या परिसरात ही धक्कादायक घटना घडली. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत. 

मिळालेल्या माहितीनुसार, महिलेची मानसिक अवस्था ठीक नव्हती. तसेच कुटुंबाची परिस्थिती देखील अत्यंत बिकट आहे. गावातील 65 वर्षीय जत्तू देवी या आपला मुलगा मंगलाराम, त्याची पत्नी आणि पाच नातवंडांसोबत राहत होत्या. या कुटुंबाची आर्थिक स्थितीही चांगली नसल्याची माहिती समोर आली आहे. आर्थिक परिस्थिती चांगली नसल्याने मंगलाराम हे आपल्या आईवर उपचार सुद्धा करू शकत नव्हते. सोमवारी जत्तू देवी यांचा मुलगा मंगलाराम आणि सून शेतात काम करत होते. 

जत्तू देवी यांनी आपला नातू भाया आणि नात ममता यांना घेऊन विहिरीत उडी मारली. बराचवेळा झाला आपली मुलं आणि आई दिसत नसल्याने मंगलाराम यांनी त्यांना आवाज देण्यास सुरुवात केली. मात्र, तरीही कुठलाच प्रतिसाद न आल्याने त्यांनी शोधाशोध सुरू केली. शोधाशोध सुरू असतानाच विहिरीत डोकावून पाहिले असता आजी जत्तू देवी आणि दोन्ही नातवंड विहिरीत आढळून आले. ग्रामस्थांनी या तिघांनाही बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरू केले. 

घटनेची माहितीही पोलिसांना दिली. पोलीस घटनास्थळी दाखल झाल्यानंतर तिघांनाही विहिरीतून बाहेर काढण्यात आले. मात्र, तिघांचाही मृत्यू झाला होता. तिघांचेही मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवण्यात आले आहेत. शवविच्छेदन अहवाल आल्यानंतर मृत्यूचं नेमकं कारण हे स्पष्ट होईल. मात्र, या घटनेने संपूर्ण गावात एकच खळबळ उडाली आहे. तसेच संपूर्ण गावावर शोककळा पसरली आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी