शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
4
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
5
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
6
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
7
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
8
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
9
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
10
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
11
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
12
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
13
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
14
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
15
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
16
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
17
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
18
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
19
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
20
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

क्रूरतेचा कळस! झाड तोडलं म्हणून जमावाची तरुणाला अमानूष मारहाण; जिवंत जाळलं अन्...

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 5, 2022 15:51 IST

Crime News : गावाजवळ असणाऱ्या जंगलातील झाड तोडल्याचा आरोप करत एका ग्रामस्थाला गावातील जमावाने अमानूष मारहाण करत जिवंत जाळल्याचा भयंकर प्रकार समोर आला आहे.

नवी दिल्ली - देशात अनेक धक्कादायक घटना घडत आहेत. याच दरम्यान आता एक संतापजनक घटना समोर आली आहे. झाड तोडल्याच्या रागातून जमावाने एक व्यक्तीला बेदम मारल्याचा प्रकार घडला आहे. झारखंडच्या सिमडेगा भागात माणुसकीला काळीमा फासणारी ही घटना घडली. गावाजवळ असणाऱ्या जंगलातील झाड तोडल्याचा आरोप करत एका ग्रामस्थाला गावातील जमावाने अमानूष मारहाण करत जिवंत जाळल्याचा भयंकर प्रकार समोर आला आहे. संजू प्रधान असं या व्यक्तीचं नाव होतं. 

मिळालेल्या माहितीनुसार, गावातील संजू प्रधान नावाचा तरुण जंगलातून वाळलेली झाडं तोडून त्याचं लाकूड घेऊन जात होता. त्यावेळी गावकऱ्यांनी त्याला रोखलं आणि जाब विचारला. संजूचं काहीही म्हणणं ऐकून न घेता जमावाने त्याला बेदम मारहाण करायला सुरुवात केली. गावातील सुमारे 250 ते 300 जणांनी त्याच्यावर हल्ला केला आणि त्याला लाठ्या-काठ्यांनी मारहाण करायला सुरुवात केली. 

ग्रामस्थांनी आई, पत्नीसमोर घेतला तरुणाचा जीव

संजूला गावकरी मारत असल्याचं पाहून त्याची आई आणि पत्नी समोर आल्या आणि गावकऱ्यांना विनंती करू लागल्या. त्याने जरी काही चूक केली असेल तरी त्याला आता सोडून द्या, असं गावकऱ्यांना म्हटलं. मात्र गावकरी काहीही ऐकण्यासाठी तयार नव्हते. काही लोकांनी पोलिसांना याची कल्पना दिल्यावर पोलीस घटनास्थळी दाखल झाले. मात्र सुरुवातीला ग्रामस्थ पोलिसांनाही गावात येऊ देत नव्हते. पोलिसांना काही अंतर दूरच ग्रामस्थांनी रोखून धरलं.

माणुसकीला काळीमा फासणारी घटना

अमानूष मारहाण करूनही ग्रामस्थांचा राग काही शांत झाला नाही. त्यांनी काही लाकडं गोळा केली, ती पेटवली आणि संजूच्या अंगावर ती टाकून त्याला जिवंत जाळलं. पत्नी आणि आईच्या डोळ्यांदेखत संजूला गावकऱ्यांनी पेटवून मारलं. हे पाहून दोघींनाही मोठा मानसिक धक्का बसला आहे. पोलिसांनी ग्रामस्थांवर गुन्हा दाखल करून घटनेचा तपास सुरू केला आहे. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.  

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी