शहरं
Join us  
Trending Stories
1
Asia Cup 2025 : आधी टीम इंडियानं हँडशेक न केल्याची बोंब! आता UAE विरुद्धच्या मॅचआधी PAK चं नवं सोंग!
2
मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्याची विटंबना; CM देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
3
कुणबी प्रमाणपत्र कसे काढले जाते? १, २ नाही, १२ ते १६ कागदपत्रे आवश्यक; पाहा, पूर्ण प्रक्रिया
4
पंतप्रधान नरेंद्र मोदींना वाढदिवशी राहुल गांधींने पाठवले 'विशेष' पत्र; केली एक खास मागणी
5
"ह्या... हू... काय तुम्ही? कधी रे सुधारणार...? परत मी बोललो की...!" अजित दादांनी 'त्यांना' झाप-झाप झापलं
6
चलो दिल्ली! मनोज जरांगेंनी केली मोठी घोषणा; मराठा समाजाचे अधिवेशन घेणार, महत्त्वाचे कारण समोर
7
ह्युंदाईच्या या SUV ची किंमत ₹6 लाखही नव्हती, नव्या GST नंतर ₹86156 नं स्वस्त झाली; वरून ₹50000 चा डिस्काउंटही!
8
"क्लेमोर, वायर, पावडर... सगळं तयार होतं !" गुप्त माहितीने गडचिरोली पोलिसांनी रोखला भीषण कट
9
पाक आशिया कप स्पर्धेतून Out? सामान बसमध्ये अन् पाक खेळाडू हॉटेलमध्ये! नेमकं काय घडलं?
10
वाघाला घोरताना कधी पाहिलंय? VIDEO पाहून नेटकरी म्हणतायत, "हे तर आमच्या बाबांसारखेच..."
11
नवरात्रीचा मुहूर्त? पंतप्रधान मोदी नव्या ठिकाणाहून कामकाज पाहणार; PMOचा पत्ता बदलणार
12
"भेटायला येतो असा मी मित्रासारखा हट्ट केला होता पण...", प्रियाच्या आठवणीत अभिजीत भावुक
13
Video - पैशांचा पाऊस! चालत्या ट्रेनमधून उडवल्या ५०० च्या नोटा; गोळा करण्यासाठी लोकांची झुंबड
14
बच्चू कडूंना कधीच सोडणार नाही म्हणणारे माजी आमदार सोडून गेले; काँग्रेसमध्ये पक्ष प्रवेश
15
सारख्या नावाचे दिवस गेले... सेम चेहराही शोधावा लागणार; यापुढे EVM वर उमेदवाराचा रंगीत फोटो छापणार...
16
प्रसिद्धीचा मुद्दा, अजितदादांचा फडणवीसांकडे रोख;  म्हणाले, “जाहिरात करावी तर देवाभाऊंसारखी”
17
समुद्रात दडलाय सोन्याचा खजिना; किंमत 2000 अब्ज डॉलर्सपेक्षा जास्त, काढणार कसा?
18
आरोपीला पकडण्यासाठी गेलेल्या पोलिसांवर प्राणघातक हल्ला: अनेक पोलिस एम्समध्ये दाखल
19
कार अन् ट्रकचा भीषण अपघात; एकाच कुटुंबातील सात जणांचा जागीच मृत्यू
20
ICC T20I Rankings : नंबर वन अभिषेक शर्मानं साधला मोठा डाव; कॅप्टन सूर्यासह तिलक वर्मा घाट्यात

खळबळजनक! औषध आणायला घराबाहेर पडली अन् जीव गमावून बसली; प्रियकरासह आढळला मृतदेह

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 24, 2022 16:34 IST

Crime News : औषध आणायला एक तरुणी घराबाहेर पडली पण नंतर ती परतलीच नाही. प्रियकरासह तिचा मृतदेह आढळला

नवी दिल्ली - देशात अनेक धक्कादायक घटना घडत आहेत. अशीच एक मन सुन्न करणारी घटना घडली आहे. एका कपलची हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. हरदोई जिल्ह्यातील बिलगाव येथे ही घटना घडली. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत. हत्या की आत्महत्या असा प्रश्न अनेकांना पडला आहे. औषध आणायला एक तरुणी घराबाहेर पडली पण नंतर ती परतलीच नाही. प्रियकरासह तिचा मृतदेह आढळला

मिळालेल्या माहितीनुसार, बिलगावातील मोहल्ला रफायत गंज येथील रहिवासी झाकीर यांची 26 वर्षीय मुलगी तबस्सुम उर्फ ​​मुन्नी ही शनिवारी रात्री 11 वाजण्याच्या सुमारास तापाचे औषध घेण्यासाठी घरातून बाहेर पडली होती. बराच वेळ होऊनही ती घरी न परतल्याने तिचा शोध सुरू झाला. याच दरम्यान, दुपारी शहरातील जुन्या सीएचसीमध्ये दोन मृतदेह सापडले. घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले.

पोलीस अधीक्षक राजेश द्विवेदी, एएसपी पूर्वी अनिल कुमार यादव, जिल्हाधिकारी आणि सीईओ यांच्यासोबत फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी दाखल झाली. तपासादरम्यान, मृतदेहाची ओळख पटली आहे. हे मृतदेह तबस्सुम उर्फ मुन्नी आणि रमेश राठोड या 27 वर्षीय तरुणाचा आहे. तर घटनास्थळी एक पिस्तूलही सापडले आहे. असे सांगण्यात येत आहे की, या दोघांची हत्या करण्यात आली आहे. मात्र, ही आत्महत्या असल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. लवकरच याबाबत खुलासा होईल, असे पोलिसांनी सांगितले आहे.

बिलगावातील मोहल्ला रफायत गंज येथील रहिवासी असलेल्या झाकीर यांना दोन मुली आणि तीन मुले आहेत. त्यांची आर्थिक परिस्थिती साधारण आहे. त्यांची मुलगी तबस्सुम उर्फ ​​मुन्नी हिचा विवाह मल्लवन गावात निश्चित झाला होता. 16 मे वरात येणार होती. विवाहाची सर्व तयारी पूर्ण झाली होती. मात्र, त्यापूर्वीचा तिचा प्रियकरासोबत मृतदेह आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. याप्रकरणी पोलीस अनेकांची चौकशी करत आहेत. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.  

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी